रत्नागिरी : उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईची भीषणता जाणविण्यास सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यानुसार रत्नागिरी शहरातील नागरिकांना पाणी टंचाईची समस्या जाणविण्याची शक्यता असल्याने त्याचे नियोजन म्हणून शहरात एप्रिल महिन्यापासून पाणी कपात केली जाणार आहे. अर्थात शहरवासीयांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे.
राज्यातील अनेक भागामध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवायला लागली आहे. ग्रामीण भागात देखील हि भीषणता अनुभवण्यास मिळत असून पाणी आणण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत आहे. तर उन्हाळा अधिक तीव्र झाल्यास शहरांमध्ये देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. रत्नागिरी शहरात देखील येत्या काही दिवसात पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने रत्नागिरी नगरपरिषदेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
पुढील तिन महिन्यांसाठी पाणी कपातीचा निर्णय
रत्नागिरी शहरातील पाणी कपातीचा निर्णय़ आता एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात येत आहे. पुढील तीन महिन्यासाठी हा निर्णय लागू करण्यात येत असून या तीन महिन्यांसाठी शहरातील नागरिकांना पाणी वापराचे काटकसरीचे नियोजन करावे लागणार आहे. याशिवाय रत्नागिरी नगरपरिषदेने आजपासून दर सोमवारी पाणी पुरवठा न करण्याचा निर्णय या महिन्यासाठी मागे घेतला आहे. दर सोमवारी पाणी पुरवठा बंद करण्याच्या निर्णयाला आजपासून सुरवात होणार होती. मात्र समजान आणि गुढीपाडवा अशा सणांमुळे नगरपालिकेनी आपला निर्णय पुढे ढकलला आहे.
बाष्पीभवनाने धरणातील पाणीसाठा कमी
रत्नागिरी शहरात ११ हजारपाण्याच्या नळ जोडण्या आहेत. शहराला शीळ धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत असतो. शीळ धरणात ३.६६६ दक्षलक्ष घनमिटर पाणी साठवण्याची क्षमता असनू सद्यस्थितीला शीळ धरणात २.०५१ दक्षलक्ष घनमिटर पाणीसाठा आहे. प्रखर उन्हामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. यामुळे पाण्याची पातळी घटत असून उन्हाचा जोर वाढत असल्याने एप्रिल महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शहराला पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.