Farm Land: शेजारील शेतकरी वारंवार शेताचा बांध कोरत असेल तर? कायमचं टेन्शन कसं सोडवाल, काय आहे कायदा?

Farm Boundary Conflicts: शेताच्या बांधावरून अनेकवेळा शेतकऱ्यांमध्ये वाद होत असतो. जर कोणी शेतरस्ता अडवला असेल तर तहसीलदारांकडे मामलेदार न्यायालय अधिनियम १९६० नुसार अर्ज करावा.
Farm Boundary Conflicts:
Farm Boundary Conflictssaam tv
Published On

शेतजमिनीच्या हद्दी, बांध आणि शेतरस्त्यांवरून नेहमी वाद होत असतात.शेजाऱ्याने हद्द ओलांडणे, बांधावर अतिक्रमण करणे किंवा शेतात जाणारा रस्ता अडवणे यामुळे अनेकदा शेतशेजारील शेतकऱ्यांसह वाद भांडणं होत असतात. बहुतेकवेळा तर थेट हाणामारी होत असते. शेताच्या बांधावर अतिक्रमण करणे, बांध कोरून ट्रॅक्टर किंवा अन्य अवजारे चालवणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. या प्रकारांमुळे शेजारी शेतकऱ्यांमध्ये वाद वाढू शकतात.

Farm Boundary Conflicts:
Maharashtra Land Satbara: सामूहिक सातबारा उताऱ्यातून स्वतंत्र उतारा कसा काढायचा? कसा कराल अर्ज?

दरम्यान शासनाने शेतातील पारंपरिक रस्ते किमान १२ फूट रुंद करण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे ट्रॅक्टर, हार्वेस्टर आणि इतर शेती यंत्रसामग्री सहजपणे शेतात नेणे शक्य होते. परंतु जर शेतजमिनीवरून वाद होत असेल तर शेतकऱ्यांनी कायद्याचा आधार घेत वाद मिटवावा. तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी स्वतःहून वाद वाढवण्याऐवजी शासनाच्या अधिकृत यंत्रणांचा वापर करावा. योग्य कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया वापरल्यास वाद जलद आणि निष्पक्षपणे मिटू शकतात.

Farm Boundary Conflicts:
Tukadebandi Law: राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द; जमीनधारकांना नेमका कोणता फायदा होणार?

शेतजमिनीच्या वादांमध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे शासकीय मोजणी. यासाठी भूमी अभिलेख विभाग यांच्याकडे अर्ज करून अधिकृत सर्व्हे करावा लागतो. या प्रक्रियेत जमिनीची अचूक हद्द निश्चित केली जाते. यामुळे वाद टाळता येतात. जर वादाच्या दरम्यान भांडण, धमकी किंवा मारामारी झाली असेल तर त्वरित स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणं आवश्यक आहे. अनेक जिल्ह्यांत “बांधावर पोलीस” हा उपक्रम राबवला जातोय, त्याद्वारे पोलीस थेट शेतात जाऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात.

शेतरस्ता अडवल्यास

जर कोणी शेतरस्ता अडवला असेल तर तहसीलदारांकडे मामलेदार न्यायालय अधिनियम १९६० नुसार अर्ज करावा. या कायद्यानुसार तहसीलदारांना रस्ता मोकळा करण्याचे अधिकार आहेत. याचप्रमाणे जर जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद निर्माण झाला तर अंतिम पर्याय म्हणून दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा. न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मालकी हक्क स्पष्ट केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com