महाराष्ट्रात न्याय हक्कासाठी लढणारा झुंजार नेता हरपला; आगरीसेना प्रमुख राजाराम साळवी यांचे निधन

rajaram salvi Death : आगरीसेना प्रमुख राजाराम साळवी यांचे निधन झाल्याची वार्ता समोर आली आहे. त्यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात न्याय हक्कासाठी लढणारा झुंजार नेता हरपला; आगरीसेना प्रमुख राजाराम साळवी यांचे निधन
Published On
Summary

आगरीसेना प्रमुख राजाराम साळवी यांचं निधन

वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राजाराम साळवी यांच्या निधनाने राजकीय-सामाजिक क्षेत्रात हळहळ

महाराष्ट्र राज्य आगरीसेना प्रमुख राजाराम साळवी यांचं शनिवार सायंकाळी अकस्मात निधन झालं. राजाराम साळवी यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी ओबीसी आणि आगरी समाजाच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या जाण्याने ठाणे परिसरात शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्रात न्याय हक्कासाठी लढणारा झुंजार नेता हरपला; आगरीसेना प्रमुख राजाराम साळवी यांचे निधन
West Bengal Violence : आणखी एका भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफळला

राजाराम साळवी यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी कळव्यातील निवासस्थानी आगरीसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यविधी करण्यात येणार आहे.

ठाण्यातील कळव्यात मनिषानगर येथे राहणारे राजाराम साळवी यांनी 1 ऑगस्ट 1986 रोजी आगरीसेनेची स्थापना केली. आगरीसेनेच्या माध्यमातून ओबीसी आणि आगरी समाजाच्या न्याय हक्कासाठी आक्रमक भूमिका मांडली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक आंदोलने केली होती. त्यांच्या शहाड येथील सेंच्युरी रेयॉनसह ठाणे जिल्ह्यात अनेक कारखान्यात कामगार युनियन कार्यरत आहेत.

महाराष्ट्रात न्याय हक्कासाठी लढणारा झुंजार नेता हरपला; आगरीसेना प्रमुख राजाराम साळवी यांचे निधन
महिलेच्या हत्येप्रकरणी भाजप आमदार दोषी; कोर्टाचा मोठा निर्णय, राजकीय वर्तुळात खळबळ

राजराम साळवी यांनी कळव्यात मनिषा शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी विविध राजकीय पक्षांत काम केले होते. राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचे अध्यक्षस्थानही भूषवले होते. ते 1 ऑगस्ट मे रोजी ठाण्यात आगरी सेनेचा वर्धापन दिन सोहळा साजरा करीत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजाराम साळवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुरेश म्हात्रे यांनी पोस्ट करत म्हटलं की, ' आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते, आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी साहेब यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. समाजहितासाठी अखंड कार्य करणारे, आगरी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे आणि समाजाला दिशा देणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे. त्यांच्या जाण्याने आगरी समाजाची मोठी हानी झाली असून निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे'.

'ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती प्रदान करो व साळवी परिवारास तसेच त्यांच्या आप्तस्वकीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. संपूर्ण म्हात्रे परिवार साळवी परिवाराच्या दुःखात सहभागी असून दिवंगत राजारामजी साळवी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे, असे सुरेश म्हात्रे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com