Maharashtra politics
aaditya thackeraySaam tv

विरोधी पक्षनेतेपदावरून शिंदेसेनेनं जाधवांना डिवचलं, आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद सत्य की अफवा?

aaditya thackeray : अनुभवी भास्कर जाधवांना डावलून आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद देण्याची चर्चा रंगलीय... त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायेत... मात्र या चर्चा ख-या की खोट्या ? पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट....
Published on

हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरून राजकीय वातावरण तापलंय...महायुती सत्तेत येऊन वर्ष पुर्ण झाल्यानंतरही विधानसभेला विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाही..मात्र आता अनुभवी भास्कर जाधवांना डावलून आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फिल्डिंग लावायला सुरु केल्याचा दावा शिंदेसेनेनं केलाय. शिंदेसेनेचे मंत्री विरोधी पक्षनेतेपदावरून नेमकं काय म्हणाले पाहूयात

दुसरीकडे भास्कर जाधवांनी मात्र संयमी भूमिका घेत सत्ताधाऱ्यांनी आधी विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु करावी असा पलटवार केलाय.....तर माझ्य़ा नावाची केवळ अफवा पसरवल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय.

Maharashtra politics
कायद्याच्या राज्यात धावत्या बसमध्ये दरोडे; प्रवाशांची लूटमार कधी थांबणार?

सरकार विरोधी पक्षनेतेपदाबाबत नियमावर बोट ठेवतंय....त्यामुळे विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळेल की नाही याची खात्री नाही...मात्र याचाच फायदा घेत शिंदेसेनेनं ठाकरेसेनेवर अंतर्गत दुफळी असल्याचं चित्र निर्माण करून कुरघोडी केल्याचं दिसतंय.

Maharashtra politics
खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com