Maratha Reservation : मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्याचे समाधान : अदिती तटकरे, राम शिंदे, संग्राम जगताप

महाराष्ट्र सरकारने मनोज जरंगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने राज्यातील मराठा बांधव जल्लाेष करीत आहे.
aditi tatkare reaction on maratha reservation new gr
aditi tatkare reaction on maratha reservation new gr saam tv
Published On

Maratha Reservation News :

- संजय राठाेड / सुशील थोरात

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा निघाल्या नंतर आज (शनिवार) महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (aditi tatkare), आमदार राम शिंदे (ram shinde), आमदार संग्राम जगताप (sangram jagtap) यांनी सरकारने मराठा समाजाबद्दल योग्य पाऊल उचलल्याचे म्हटले. दरम्यान आज राज्यात विविध जिल्ह्यात मराठा समाज सरकारच्या निर्णयाचे स्वागत करु लागला आहे. (Maharashtra News)

कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण सरकारने मराठा समाजाला दिल्याची भावना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली. सरकारच्या प्रयत्नामुळे हे सर्व शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या प्रयत्नांमुळे सर्व शक्य झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची होती. आता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होत असल्याने आनंदाने आणि समाधान असल्याचेही तटकरेंनी नमूद केले.

aditi tatkare reaction on maratha reservation new gr
युवा पिढीने Social Media चा वापर सामाजिक ऐक्यासाठी करावा : पोलिस अधीक्षक श्रवण दत्त

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात ठीक ठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे. आमदार राम शिंदे, आमदार संग्राम जगताप यांनी सरकारने मराठा समाजाबद्दल योग्य पाऊल उचलले असून आम्ही त्याचे स्वागत करताे असे नमूद केले. मराठा आरक्षण मिळाल्याने मराठा बांधवांनी यावेळी ढोल ताशा, डिजे लाऊन जल्लोष केला.

Edited By : Siddharth Latkar

aditi tatkare reaction on maratha reservation new gr
Maratha Samaj Celebration : मराठ्यांचा जल्लाेष, परभणीत गुलालाची उधळण, हिंगाेलीत दूधाचे वाटप, बीडमध्ये पेढे भरवून आनंदाेत्सव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com