औषध खरेदीची सक्ती, मेडिकलला सील, अभिनेत्याची तक्रार, एफडीएची धडक कारवाई

Actor alleges forced medicine purchase in Solapur hospital: राज्यातील खाजगी रुग्णालयांकडून होणाऱ्या लुटीचा सामना एका अभिनेत्याला करावा लागलाय. इतकंच नव्हे तर या मनमानीमुळे अभिनेत्याला अश्रूदेखील अनावर झालेत. तर दुसरीकडे, अन्न आणि औषध प्रशासनानंही या रुग्णालयावर तात्काळ धाड टाकलीये. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
FDA officials seal medical store after actor alleges forced medicine purchase at Solapur hospital
FDA officials seal medical store after actor alleges forced medicine purchase at Solapur hospitalsaam tv
Published On

राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून विविध ठिकाणी धाडसत्र सुरु आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि औषधांची विक्री रोखण्यासाठी प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. अशातच आता राज्यातील एका खाजगी रुग्णालयाच्या मनमानीचा कारभाराचा फटका सैराट फेम अभिनेत्याला बसलाय. सोलापूरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये वडिलांच्या उपचाराकरिता आलेला अभिनेता अरबाज शेखला कसा लुटीचा सामना करावा लागलाय ऐका...

अरबाजनं केलेल्या आरोपानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं रुग्णालयावर धाड टाकलीये. त्यानंतर प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांना धाब्यावर बसवून रुग्णालयाचा कारभार सुरू असल्याचं उघडकीस आलंय....

इतकंच नव्हे तर प्रशासनानं रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून संलग्नित मेडिकलला औषध विक्री थांबवण्याचे आदेश दिलेत. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांनुसार, रुग्णांना कोणत्याही परवानाधारक मेडिकलमधून औषधं घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे विशिष्ट मेडिकलवरून औषध खरेदीची सक्ती करणे हा कायद्याचा भंग आहे. आता या कारवाईनंतर राज्यातील इतरही खाजगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप बसणार का, हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com