Nashik Accident News : नांदगाव-मालेगाव मार्गावर कार पुलावरुन थेट नदीत कोसळली; लहान बाळासह 3 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

Accident News : नांदगावमधील नाग्यासाक्या धरणासमोरील नांदगाव मालेगाव राज्यमार्गावर ही घटना घडली आहे.
Nashik Accident
Nashik Accident Saam TV

Nashik News : नाशिकमधील नांदगाव येथे इको कारचा भीषण अपघात झाला आहे. गाडी पुलावरून थेट नदीत कोसळली आहे. या अपघातात एका लहान बाळासह तिघांचा मृत्यू झाला आहे.

नांदगावमधील नाग्यासाक्या धरणासमोरील नांदगाव मालेगाव राज्यमार्गावर ही घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. गाडी नदीवरील कठडे नसलेल्या पुलावरुन थेट नदीत कोसळल्याने अपघात झाला. (Nashik News)

Nashik Accident
Congress MP Balu Dhanorkar Passed Away : काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन, वयाच्या 48व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातात एका लहान बाळासह तिघांचा मृत्यू आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Latest Political News)

Nashik Accident
Beed Fire News: बीडच्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राला भीषण आग; 1 हजार दुर्मिळ झाडे जळून खाक

अपघातातील जखमी आणि मृतांबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com