Beed Fire News: बीडच्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राला भीषण आग; 1 हजार दुर्मिळ झाडे जळून खाक

बीडच्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राला भीषण आग; 1 हजार दुर्मिळ झाडे जळून खाक
Beed Fire News
Beed Fire NewsSaam Tv
Published On

Beed Fire News: बीडच्या शिरूर तालुक्यात असणाऱ्या पाडळी येथील सर्पराज्ञी वन्यजीव प्रकल्पाला भीषण आग लागली होती. या लागलेल्या भीषण आगीत दुर्मिळ असणारी 400 प्रजातीची, तब्बल 1000 झाडे जळून खाक झाले आहेत.

त्याचबरोबर प्रकल्पात असणारे काळवीट, ससे, रानडुकरे, मुंगूस यासह दोन गाई होरपळल्या आहेत. यासह परिसरात असणारे ठिबक, तुषार संच, सोलर देखील जळून खाक झाले आहे.

Beed Fire News
Sakal-Saam Mahasurvekshan: महाराष्ट्रात काँग्रेसचे स्थान बळकट होतंय का? राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली? जाणून घ्या

तर ही अचानक लागलेली भीषण आग सर्पराज्ञी परिसरात शेती असणाऱ्या शेतकरी सुदाम लव्हाळे यांच्या निष्काळजीपणामुळे लागल्याचं समोर आलंय. शेतकरी सुदाम लव्हाळे यांनी त्यांचा बांध पेटवला होता.

या दरम्यान अचानक जोरदार वारा आल्याने ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली. बघता बघता रौद्र रूप घेतलेल्या या आगीने सर्पराज्ञी परिसराला आग लागली. यामध्ये ही दुर्घटना घडल्याचं सर्पराज्ञी वन्यजीव प्रकल्पाचे संचालक सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले.   (Latest Marathi News)

Beed Fire News
Sakal-Saam Mahasurvekshan: कसा होता मोदी सरकारचा 9 वर्षांचा कारभार? जनता खुश की नाराज? सकाळच्या 'महासर्वेक्षणा'त समोर आली मोठी गोष्ट

भंडाऱ्यात गॅस लिकेजमुळे घराला आग

दरम्यान, भंडारा जिल्‍ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथेही आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. भाऊराव दिघोरे हे काही दिवसांपासून उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. पत्‍नी दररोज सकाळी पतीचा डबा घेवून रुग्णालयात जात असते. त्‍यानुसार दररोजप्रमाणे पत्‍नी आज देखील डबा करायला किचनमध्‍ये गेली. याचवेळी गॅस गळती होवून स्‍फोट झाला व आग (Fire) लागली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com