Sakal-Saam Mahasurvekshan: महाराष्ट्रात काँग्रेसचे स्थान बळकट होतंय का? राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली? जाणून घ्या

महाराष्ट्रात काँग्रेसचे स्थान बळकट होतंय का? राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली? जाणून घ्या
Sakal-Saam survey On Rahul Gandhi
Sakal-Saam survey On Rahul GandhiSaam Tv

Narendra Modi Government Nine years Sakal-Saam survey: केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्ही न्यूज यांनी 'महासर्वेक्षण' (Sakal-Saam Survekshan) केलं आहे. या सर्वेक्षणात मोदी सरकारने आपल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांचा देशावर काय परिणाम झाला.

मोदींचा 9 वर्षांचा कारभार कसा राहिला? यावर जनता खुश आहे की नाराज, कोणत्या मुद्द्यावर जनतेचा सर्वाधिक रोष आहे आणि मोदींनी निर्णय घेतलेले कोणते मुद्दे जनतेला आवडले आहेत. हे या महासर्वेक्षणात समोर आलं आहे.

Sakal-Saam survey On Rahul Gandhi
Sakal-Saam Mahasurvekshan: कसा होता मोदी सरकारचा 9 वर्षांचा कारभार? जनता खुश की नाराज? सकाळच्या 'महासर्वेक्षणा'त समोर आली मोठी गोष्ट

या सर्वेक्षणात विरोधी पक्षातील नेत्यांबद्दलही लोकांना प्रश्न विचारण्यात आले. विरोधकांमधून पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती कोणत्या नेत्याला द्याल? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढल्याचं समोर आलं आहे.  (Latest Political News)

कसा करण्यात आला सर्वेक्षण?

या सर्वेक्षणात एकूण 24 प्रश्न होते. यात संपूर्ण राज्यभरातून 288 विधानसभा आणि 48 लोकसभा मतदार संघात हा सर्वेक्षण करण्यात आला आहे. सकाळच्या 2 हजारांहून अधिक सहकाऱ्यांनी एकूण 49231 लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधून हे सर्वेक्षण केलं आहे.  (Latest Marathi News)

Sakal-Saam survey On Rahul Gandhi
Sakal-Saam Mahasurvekshan: मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण! पंतप्रधानांच्या कामगिरीबाबत लोकांना काय वाटतं?

पंतप्रधान पदासाठी 34.9 टक्के लोकांची राहुल गांधी यांच्या नावाला पसंती

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना प्रश्न विचारण्यात आला की, ''विरोधकांमधून पंतप्रधान पदासाठी सर्वाधिक पसंती कोणत्या नेत्याला द्याल?'' यात 34.9 टक्के लोकांनी पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी यांना आपली पसंती दर्शवली आहे. तर अरविंद केजरीवाल यांना 12 टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे. तसेच ममता बॅनर्जी यांना 4.5 टक्के, नितीश कुमार यांना 4.1 टक्के, के चंद्रशेखर राव यांना 2.9 टक्के आणि एम के स्टॅलिन यांना 1.8 टक्के लोकांनी आपली पसंती दर्शवली आहे. यातच यापैकी एकही नाही असं 23.2 टक्के लोकांचं म्हणणं आहे. तर सांगता येत नाही 16.7 टक्के लोकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, या सर्वेक्षणानंतर राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेसोबतच महाराष्ट्रात काँग्रेसचे स्थान बळकट होत असल्याचं दिसत आहे. मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या लोकप्रियतेचा फायदा काँग्रेसला होणार का? हे पाहावं लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com