Rajan Salvi House Raided by ACB
Rajan Salvi House Raided by ACB SAAM TV

Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घराची ACB कडून झाडाझडती

Rajan Salvi News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी एसीबी पथक पोहोचले आहे.
Published on

ACB raids Rajan Salvi house :

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील घरी एसीबी पथक पोहोचले आहे. अधिकाऱ्यांकडून घराची झाडाझडती सुरू आहे.

एसीबीचे अधिकारी चौकशीसाठी राजन साळवी यांच्या घरी पोहोचले आहेत. अधिकाऱ्यांकडून घराची झडती घेण्यात येत आहे. या सर्व घटनेनंतर राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चौकशीला सामोरे जायची माझी तयारी आहे. छापा नाही. या चौकशीला मी घाबरत नाही. ज्या दिवशी पहिली नोटीस आली त्याच दिवशी मला चौकशीला सामोरे जावे लागणार याची मानसिक तयारी झाली होती आणि मी चौकशीला सामोरे जाणारच, असे राजन साळवी म्हणाले.

Rajan Salvi House Raided by ACB
Jalna News: जालन्यातील स्टील कंपन्यांवर GST विभागाच्या धाडी; व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ

राजन साळवींच्या चौकशीच्या प्रकरणावर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य पातळीवर यंत्रणा काम करत असताना यंत्रणांना काही सापडल्यास त्या कारवाया करत असतात. अशा वेळी अधिकचा तपास करायला त्यांना मुभा असते. जे सहकार्य करायचं आहे ते केलं पाहिजे. तपास यंत्रणा दीर्घकाळ काम करत आहेत, असे तटकरे म्हणाले.

Rajan Salvi House Raided by ACB
Kalyan Police News: दारू सोडा.. दूध प्या, दररोज इतके होतात अपघात? कल्याण पोलिसांनी वेधलं लक्ष

महाराष्ट्रात सुरू असलेली लढाई उद्धव ठाकरेंची नसून, महाराष्ट्र विरुद्ध गुजरातच्या व्यापाऱ्यांची लढाई आहे, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप आणि शिंदे गटाच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे. विधानसभा अध्यक्षांनी कायदा धाब्यावर बसवून जो निर्णय दिला त्या विरोधात आता जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे जनतेच लक्ष विचलित करण्यासाठी काल युवासेना सचिव सूरज चव्हाण यांना अटक झाली, तर आज राजन साळवी यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. हा प्रसंग आमच्यावर देखील येईल. मात्र कितीही दबाव टाकला तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत ठाम असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com