Jalna News: जालन्यातील स्टील कंपन्यांवर GST विभागाच्या धाडी; व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ

Jalna GST Raid: जालना एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन नामांकित स्टील कंपन्यावर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
GST Raid In Jalna Latest Marathi News
GST Raid In Jalna Latest Marathi NewsSaam TV

Jalna Steel Company GST Raid

मागील काही महिन्यांपासून जालना शहरातील व्यापारी कधी आयकर, तर कधी जीएसटी विभागाच्या रडारवर आहेत. वर्षभरात शहरातील अनेक व्यापाऱ्यांवर जीएसटी तसेच आयकर विभागाने धाडी टाकल्याचं समोर आलं आहे. गुरुवारी (१८ जानेवारी) पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा जीएसटी पथकाने जालना शहरात धाडी टाकल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

GST Raid In Jalna Latest Marathi News
Pune Ayodhya Train: पुण्यातून अयोध्यासाठी सुटणार १५ विशेष रेल्वेगाड्या; कधी अन् केव्हा? जाणून घ्या सविस्तर...

एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन नामांकित स्टील कंपन्यावर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असून, अनेकांनी दुकाने बंद करून पळ देखील काढल्याचं समोर आलंय. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, या दोन नामांकित कंपन्याकडून लोखंड निर्मितीसाठी भंगाराची खरेदी करण्यात आली होती. मात्र, भंगार खरेदीचा व्यवहार न दाखवता या कंपन्याकडून GST चुकवण्यात आल्याची माहिती सामोरं आली आहे.

सध्या GST विभागाच्या पथकाकडून या दोन कंपन्याच्या कागदपत्राची तपासणी सुरू असून संपूर्ण अकाऊंट विभागाची कागद कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नागपूर जीएसटी पथकातील 10 ते 12 जणांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.

गुजरात आणि राज्यातील इतर भागातील भंगार व्यवसयिक यांच्याकडून मिळालेल्या बोगस बिलाच्या पावत्या वरून GST विभागाकडून ही कारवाई सुरु असल्याची माहिती सामोरं आली आहे. जीएसटी विभागाने मारलेल्या अचानक धाडीमुळे व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण आहे.

GST Raid In Jalna Latest Marathi News
Pune Lonavala Local: प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकलच्या दोन फेऱ्या वाढल्या; जाणून घ्या वेळ...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com