Dhananjay Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

Dhananjay Munde Health Update : माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जनता दरबारात नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती.
Dhananjay Munde Health Update
Dhananjay Munde Health Update Saam tv news marathi
Published On

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Dhananjay Munde Health News: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. उपचारासाठी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Dhananjay Munde latest health update today)

आज सकाळी नेहमीप्रमाणे परळी येथील शासकीय विशेष अतिथीगृहात धनंजय मुंडे यांच्या 'जनता दरबारा'चे आयोजन करण्यात आले होते. मात्र, जनता दरबार सुरू झाल्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने अतिथीगृहाशेजारील रुग्णालयात नेण्यात आले.

Dhananjay Munde Health Update
महावितरणचा मोठा झटका! वीज बिल थकलं तर घरात लगेच अंधार; नव्या नियमाने उडाली खळबळ

रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील उपचार सुरू केले आहेत. डॉक्टर सध्या त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच समर्थक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Dhananjay Munde Health Update
Cabinet Decisions : २५ मोठ्या योजनांचं काय होणार? वर्षभरात ठरणार; फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

धनंजय मुंडे सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत असून, उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, असे समजते. सध्या डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com