Marathi News Live Updates: सगेसोयरे आड नेत्यांकडून भ्रम पसरवण्याचा प्रयत्न: अनिल बोंडे

Maharashtra News Live Updates : आज रविवार, ४ ऑगस्ट २०२४ आजच्या ठळक बातम्या, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे अपडेट एका क्लिकवर वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Maratha Reservation:  सगेसोयरे आड नेत्यांकडून भ्रम पसरवण्याचा प्रयत्न: अनिल बोंडे

मनोज जरांगे पाटील सगेसोयरे आरक्षणाची मागणी करत आहेत. खरोखरच ही मागणी रास्त आहे का, हे कुणीही सांगत नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले ही नेते मंडळी यावर एक शब्द बोलत नाही. सगेसोयरे आड नेत्यांकडून भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा हल्ला भाजपच्या अधिवेशनात खासदार अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चढवला.

Heavy Rain Rajgad:  राजगड तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान; पूल बुडाल्याने ५ गावांचा संपर्क तुटला

गेल्या दहा बारा दिवसांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत असून आज रोजी राजगड तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान सुरू असून दुर्गम भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बालवड येथील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे सर्वात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून बालवड, खोपडेवाडी ,चांदवणे आदी गावांचा संपर्क तुटला आहे.

Pandharpur: उजनी धरणातून भीमा नदीपात्रात ४० हजार क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

उजनी धरण आज रात्रीतून शंभर टक्के भरेल असा अंदाज आहे. आज सायंकाळी पाच वाजता उजनी धरण 91 टक्के भरले होते. आज रात्रीतून धरण शंभर टक्के भरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे उजनी धरणातून आठ वाजले पासून 40 हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. भीमा नदीच्या काठच्या गावांना व रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान वीर धरणातून ही नीरा नदीत 61 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. नीरेचा विसर्ग माळशिरस तालुक्यातील संगम येथे भीमा नदी येतो. त्यामुळे भीमा नदीत एक लाख क्युसेक विसर्गाने वाहणार आहे.

Malegaon Girna Flood : गिरणा नदीला पूर; मालेगाव तालुक्यातील सवंदगावमधील नदीत अडकले १२ ते १३ जण

मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीच्या पाण्यात १२ ते १३ जण अडकलेत. मासे पकडण्यासाठी गेलेले असताना अचानक पाणी वाढल्याने हे अडकले. गिरणा नदीत सकाळी थोडे पाणी आल्याने मासे पकडण्यासाठी गेल्यावर अचानक पाणी विसर्ग वाढल्याने अडकले.

 सीएम एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला रवाना होणार, घेणार पंतप्रधान मोदींची भेट

सीएम एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला रवाना होणार असून ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक घेणार असून त्यात राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला

संध्याकाळी ६ वाजल्यापासून गंगापूर धरणातून ६००० क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढलाय. नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालीय. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गोदावरीला पूर आलाय.

Pune :   पुणे, पिंपरी शहरासह खेड, मावळ आणि आंबेगाव तालुक्यात वीजपुरवठा बंद

संततधार पाऊस व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुणे, पिंपरी शहर तसेच खेड, मावळ व आंबेगाव तालुक्यातील सुमारे ३०५० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करून ठेवण्यात आला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीपात्राच्या परिसरातील डेक्कनमधील पुलाची वाडी व प्रेमनगरातील १००, सिंहगड रस्त्यावरील एकतानगरमधील ७ सोसायट्यांचे ४५०, बालेवाडीमध्ये भीमनगरातील १००, विश्रांतवाडीमध्ये शांतीनगर व इंदिरानगरातील ४००, मंगळवार पेठमध्ये जुना बाजार परिसरातील ४५० तसेच ताडीवाला रोड परिसरातील ४५० अशा अशा सुमारे १९५० वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

Solapur Ujani Dam:  सोलापूरमधील उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ, 

सोलापूरसाठी वरदानी असणारी उजनी धरण साठ्यात 86% पाणीसाठा झालाय. उजनी धरणातून भीमा नदी पात्रात वीस हजार विसर्ग सोडण्यास सुरुवात झालीय. सोलापूर जिल्ह्यातील भीमा काठावरील गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे उजनी धरणात विसर्ग येण्यास सुरुवात झालीय.

Pune Traffic :  पुणे महानगरपालिकेच्या नवीन इमारती समोरील टिळक पूल  वाहतुकीसाठी बंद

महानगरपालिकेच्या नवीन इमारती समोरील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. सुरक्षिततेच्या कारणामुळे पूल बंद केलाय. खडकवासला धरणातून ५ वाजता पाणी विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्या पार्श्वभमीवर पुणे महापालिकेसमोर असणारा पूल वाहतूक करण्यासाठी बंद करण्यात आला आहे.

Raigad : रायगड ब्रेकिंग; कुडपण रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली

पोलादपुर तालुक्यातील कुडपण आणि क्षेत्रपाल या दोन गावांचा संपर्क तुटला. क्षेत्रपाल गाव हद्दीत दरड कोसळली. मोठमोठ्या दगडी रस्त्यावर आल्याने पोलादपुर कुडपण रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय.

Nashik Gangapur Dam: नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरस्थिती

गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये 4000 क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे गोदाकाठी असलेल्या दुकानदारांना प्रशासनाकडून हलवण्यात येत आहे तर गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवण्यात येणार आहे आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पूर बघण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे.

Girna River :  नाशिकमधील गिरणा नदीला मोठा पूर

नाशिकच्या कळवण तालुक्यातील गिरणा धरणातून व पुनंद धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसाने गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे देवळा तालुक्यातील सवकी-विठेवाडी पुलावरून पाणी वाहू लागल्याने या दोन्ही गावांचा संपर्क सध्या तुटलाय. या परिसरातील नागरिकांना लांबचे अंतर कापत अन्य मार्गाने जावे लागत आहे.

Ahmednagar Accident : नगर-कल्याण महामार्गावर लक्झरी बस आणि कारचा अपघात; २ महिलांचा मृत्यू

नगर कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा येथे लक्झरी बस आणि कारचा अपघात झाला. या अपघात २ महिलांचा जागीच मृत्यू झालाय. आळेफाट्यावरुन कल्याणच्या दिशेने जाणा-या बसची समोरुन येणा-या कारला समोरासमोर धडक झाली या भिषण अपघातात कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यु झाला रिया गायकर,कुसुम शिंगोटे असे अपघात मृत्यु झालेल्या महिलांची नावे आहेत.

Nashik News: नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला, गंगापूर धरणातून विसर्ग वाढला

नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला. तर त्र्यंबकेश्वर परिसरात देखील मुसळधार पाऊस सुरूच आहे. गंगापूरसह नांदूरमधमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. गंगापूर धरणातून ४००० क्यूसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Nashik News:  नाशिकच्या बागलाण तालुक्यात तुफान पाऊस, हरणबारी धरण ओव्हर फ्लो

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसाने धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी मोसम नदी पात्रातून वाहू लागले आहे. अवघ्या काही दिवसांत बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात बरसत असलेल्या पावसाने धरण 100 टक्के भरून वाहू लागल्याने बागलाणमधील शेतकरी सुखावला.

Nashik News: नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिकच्या गंगापूर डॅममधून ४ वाजता ४००० क्युसेसने पाण्याच विसर्ग करण्यात येणार आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. गंगापूर धरणातून विसर्ग केलेल्या पाण्याने गोदावरी नदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.

Pune Rain: पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अशातच मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. मात्र, दरड कोसळल्यानंतर सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Pune News: रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांचा   शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश

आमदार सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का

रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश

रयतक्रांती पक्षाचे प्रदेश ‌अध्यक्ष आमदार सदाभाऊ‌ खोत यांचे जेष्ठ सहकारी भानुदास शिंदे यांनी पुणे येथे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या उपस्थीतीत प्रवेश

नामदेव ताकवणे यांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या निवासस्थानी केला प्रवेश

Pune Rain: भारतीय लष्कर दलातील १०५ जवान पुण्यातील एकता नगर भागात तैनात

भारतीय लष्कर दलातील १०५ जवान पुण्यातील एकता नगर भागात तैनात करण्यात आले आहेत. भारतीय लष्कर दलाकडून या ठिकाणी होडी देखील आणण्यात आलीय. सध्या खडकवासला धरणातून 35 हजार 36 पाण्याचा विसर्ग होत असल्याने खबरदारी म्हणून भारतीय लष्कराला या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

Mumbai News: रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात शरद पवार गट आक्रमक, मुंलुंडमध्ये आंदोलन

मुंबईच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे. मुलुंड येथील एलबीएस मार्गावर राष्ट्रवादी पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले आहे. हातात फलक घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे सचिव गुरुज्योत सिंग यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. राष्ट्रवादी चे आंदोलक एलबीएस मार्गावर रस्ता रोको करण्याची शक्यता आहे.

MNS News: भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक!

भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक!

शासन निर्णयानुसार स्थानिक मुलांना 80% नोकरीत प्राधान्य दिलंच पाहिजे, असे म्हणत मनसेचा एल्गार केला आहे. MIDCमध्ये मराठी मुलांना नोकरी देण्यासाठी मनसेची आक्रमक भूमिका घेतली असून स्थानिक भूमिपुत्रांना चळवळीत सामील होण्याचं मनसेचे आवाहन.

Pune News: अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे शरद पवारांच्या भेटीला

अजित पवार गटाचे माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजितसिह शिंदे शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत. पुण्यात मोदी बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दोघेही पिता पुत्र पोहोचले आहेत.

Baramati Rain: धरणातील पाणीसाठ्यात वाढ; अजितदादांनी प्रशासनाला दिल्या सतर्कतेच्या सुचना

मागील काही दिवसात धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. आज अजितदादा बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.. पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेवून नागरीकांना तशा सुचना द्याव्यात, तसेच नागरीकांना पाण्याच्या विसर्गाबद्दल माहिती व्हावी या अनुषंगाने विविध माध्यमातून माहिती देवून सतर्क राजण्याबाबत कळवण्याच्या सुचना यावेळी अजितदादांनी दिल्या.

Pune Crime: सोन्याच्या दुकानावर दरोडो टाकणारे अटकेत 

पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पळालेले चोरीतील तीन आरोपी आंबोली पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. ते गोवा येथून आंबोली घाट मार्गे पुणे येथे स्विफ्ट डीझायर गाडीतून जात असल्याची गोपनीय माहिती आंबोली पोलीसांना मिळाली होती त्या आधारे आंबोली घाटातील 'पुर्वीचा वस' या ठिकाणी त्यांना शिताफीने पकडण्यात आले.

Nashik Gangapur Dam: नाशिककरांना दिलासा! गंगापूर धरण ८० टक्के भरलं

- नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस.

- नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार गंगापूर धरण 80% भरलं

- थोड्याच वेळात गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करणार

- सुरुवातीला गंगापूर धरणातून 500 क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाणी सोडले जाणार

- दुपारी तीन वाजेनंतर 1000 क्युसेक पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार

- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला ना नाशिक मध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता

- रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

PuneRain News:  माळीण परिसरात तुफान पाऊस, पसारवाडीतील डोंगराला भेगा

पावसाळा आला की पुण्यातील माळीणवासीयांचे डोळे पाणावतात, आता माळीणप्रमाणेच त्या लगतच्या पसारवाडीत भूस्खलनाची भीती व्यक्त केली जात आहे. गावातील डोंगराला भेग पडली आहे, अशातच प्रचंड पाऊस पडतोय. त्यामुळं नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. या डोंगराच्या वर पाच-सहा कुटुंब राहतायेत. हे रहिवाशी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र ते होत नसल्यानं त्यांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय. माळीण लगतच्या पसारवाडी गावातील डोंगराची माती हळूहळू वाहत आहे, डोंगराची कडा सैल होत असल्याचं दिसून येतंय.

Nashik Rain News: चणकापुर धरणातून गिरणा नदी पत्रात पाण्याचा विसर्ग

नाशिकच्या कळवण तालुक्यातील चणकापुर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने धरण 70 टक्के भरले असून आज सकाळी धरणातून 10500 क्यूसेस पाणी गिरणा नदी पात्रात सोडण्यात आल्याने गिरणा नदीला महापूर आलाय,त्यामुळे धरण परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले असून पीक पाण्याखाली गेली आहे,दरम्यान पाऊस असाच सुरू राहिल्यास टप्प्या टप्प्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार असल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

DCM Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार सुरू,

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत सकाळी शहरातील विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे अजित पवार यांचा जनता दरबार सुरू आहे या जनता दरबाराला नागरिकांनी गर्दी केली आहे

Akola Accident: अकोल्यात बोलेरो- ट्रकचा भीषण अपघात, ७ जण जखमी

अकोल्यात बोलेरो वाहन आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. अपघातात सात जण गंभीर स्वरूपात जखमी झालेअकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील शिवनी परिसरात राष्ट्रीय महामार्गावर हि घटना घडली आहे. अपघातामुळे ट्रकमधील पॅकिंग पेपरचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.. हा अपघात इतका भीषण होता की ट्रक आणि बोलोरो वाहन रस्त्यावर पलटी झाले.. सातहि जखमी रुग्णांवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.. अपघाती वाहनांना रस्त्याच्या बाजूला करत वाहतुकीचा मार्ग सुरळीत केलाय..

CM Eknath Shinde On Pune Flood: 'पूर रेषेच्या आतील नागरिकांचे स्थलांतर करा', CM शिंदेंचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याआधीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालिन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशा फोनवरून चर्चा केली आणि ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूररेषाच्या आत रहाणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे दिले आदेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व स्थलांतरीत नागरिकांच्या दोन्ही वेळ जेवणाची, रहाण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश.

Sudhir Mungantiwar News: युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत राज्यातील १२ गडकिल्ल्यांचा समावेश होणार

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत राज्यातील १२ गडकिल्ल्यांचा समावेश होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. युनेस्कोचे प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्यात पाहणी करणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जागतिक स्तरावर पोहचणार आहे.

Jalna News: जालना शहरात रस्त्याची चाळण, नागरिकांचा संताप

जालना शहरातील रेल्वे स्टेशन ते मुक्तेश्वरद्वार या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालीये. या रस्त्यावरून वाहन तर सोडाच माणसांनाही चालणं कठीण झालय. ऐन पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साचत असल्याने परिसरात साथीचे आजारही उद्भवण्याचा धोका निर्माण झालाय. विशेष म्हणजे महानगरपालिका आयुक्तांची कार याच रस्त्याने जात असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. दरम्यान परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

DCM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्राचे लाडके भाऊ',देवेंद्र फडणवीसांचे सोलपूरात बॅनर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र राज्याचे 'लाडका भाऊ' असा उल्लेख असणारे बॅनर्स झळकले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी सोलापूर शहरातील महत्वाच्या चौकात ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

DCM Ajit Pawar: लाडकी बहीण योजनेची झारखंड सरकारकडून नक्कल

झारखंडमधील महाविकास आघाडी सरकारनं लाडकी बहीण योजनेची नक्कल केली आहे हे सपशेल दिसतंय. भक्कम अर्थव्यवस्था आणि महसुलाच्या बाबतीत महाराष्ट्र हे भारतातील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. आम्ही योजना दीर्घकाळ राबवूच. मात्र महाविकास आघाडीनं झारखंडमध्ये ही योजना प्रभावीपणे कशी राबवता आणि टिकवता येईल याची काळजी करावी.

Temghar Dam: टेमघर धरण भरले 

टेमघर धरणं पूर्णपणे भरले आहे. गेल्या वर्षी केवळ 80 टक्के भरले होते. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने 100 टक्के भरले आहे. पुण्यातील पहिलं धरण आहे की पाणी सोडत नाही. ओव्हर फ्लो झालं की पाणी बाहेर येते.

Mumbai Congress Meeting: मुंबईतील जागांवर काँग्रेसचे लक्ष; आज महत्वाची बैठक

मुंबईच्या विधानसभेच्या जागांसंदर्भात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबत मुंबई कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक होत आहे. काँग्रेसचा आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईवर फोकस केला आहे. मविआत मुंबईच्या जागावाटपासाठी तयार केलेल्या मुंबई काँग्रेसच्या नेत्यांसोबत प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबत बैठक. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख बैठकीला पोहोचले.

Mumbai News: धारावी परिसरात छावणीचा स्वरूप

धारावीमध्ये अरविंद वैश्य नावाच्या तरुणाच्या मृत्युमुळे संवेदनशील स्थिति निर्माण झाली होती. दोन समाजात तेढ दिसून आली होती. आज अरविंद वैश्यच्या श्रद्धांजली निषेध सभेचं आयोजन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आलंय. त्यामुळे धारावी परिसरात छावणीचा स्वरूप बघायला मिळतंय.

Pune News:  पुण्यात मुसळधार पाऊस, सोसायटीमध्ये अडकलेल्या चिमुकल्याला अग्निशमन दलाच्या जवानाने बाहेर काढलं

पुण्यात अग्निशमन दलातील जवानाने एका लहान मुलाला सोसायटीमधून बाहेर काढलंय. एकता नगर परिसरातील द्वारका सोसायटीमधील पार्किंगमध्ये पाणी शिरलं. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सोसायटीमधील नागरिकांना खाली येण्याचे आवाहन केलंय.

Mumbai News : सराईत गुन्हेगारांकडून 59 मोबाइल जप्त, ओशिवरा पोलिसांची कारवाई

मुंबईत मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात 26 जून रोजी दोन मोबाईल आणि रोख रक्कम 85 हजार रुपयांची चोरी झाल्याची तक्रार फिर्यादीने दिली.

या तक्रारीनुसार पोलिसांनी कलम ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली.. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अफजल मुस्ताक शहा,(१९ वर्षे), साबीर इरफान खान (३० वर्षे) उर्मिला प्रकाश मोर्या उर्फ पिंकी (३५ वर्षे) या सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 59 मोबाईल हस्तगत केले ज्यांची अंदाजे किंमत तीन लाख पंधरा हजार रुपये इतकी आहे.

Mumbai News : चिकन-मटण घेण्यासाठी मुंबईतील दुकानांवर तुफान गर्दी

आज गटारी अमावस्या असल्याने मुंबईकरांना चिकन मटन खरेदीसाठी सकाळपासूनच दुकानांवर मोठी गर्दी केली आहे.

मुंबईत नॉनव्हेजचे भाव काय?

  • बॉयलर - १७० रुपये किलो

  • देशी - ३०० रुपये किलो

  • नेट चिकन - २६० रुपये किलो

  • इंग्लिश - १५० रुपये किलो

  • कलेजी - २४० रुपये किलो

  • मटण - ७४० रुपये किलो

Mumbai Rain News : मुंबईकरांनो सावधान! पुढील काही तासांतच मुसळधार पाऊस कोसळणार

मुंबईत पुढील काही तासांतच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

Nashik News : नाशिकच्या रामकुंड, गोदाघाटावर पूरसदृश्य परिस्थिती

नाशिकच्या रामकुंड, गोदाघाटावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रामकुंड आणि गोदाघाटावरील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय. त्यामुळे मंदिरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. प्रशासनाकडून गोदाकाठ परिसरातील दुकाने हलवण्यास सुरुवात केली आहे.

Nashik Rain News : सुरगाणा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. पावसाची संततधार सुरु असल्याने तालुक्यातील नार,पार,तान, मान आणि अंबिका नद्यांना महापूर आलाय. त्यामुळे अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय. रस्ते पाण्याखाली गेल्याने काहीजण धोकादायक पद्धतीनं पुराच्या पाण्यातून प्रवास करताहेत.

Nashik News : नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट

नाशिक जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने संपूर्ण जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता असल्यानं नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Pune News : भाटघर धरण १०० टक्के भरलं, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भाटघर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून धरण १०० टक्के भरले आहे. नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ करुन आज सकाळी विद्युत निर्मिती केंद्राद्वारे १ हजार ६६१ आणि सांडव्याद्वारे १७ हजार ५०० क्युसेक असा एकूण १९ हजार १३१ क्युसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे. नदीच्या काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलंय.

IMD Rain Alert : पुढील ३-४ तासांत रायगड, पालघर, पुणे, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

भारतीय हवामान खात्याने पुढील ३-४ तासांत रायगड, पालघर, पुणे, ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. मुंबई पुण्यात रविवारी सकाळपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाची संतधार सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com