Maharashtra Live News Update: रोहित पवार उद्या संध्याकाळी घेणार पत्रकार परिषद

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

रोहित पवार उद्या संध्याकाळी घेणार पत्रकार परिषद

उद्या संध्याकाळी रोहित पवार यांची पत्रकार परिषद

रोहित पवार उद्या संध्याकाळी ४ वाजता मुंबईत घेणार पत्रकार परिषद

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार काय भूमिका मांडणार याकडे राज्याचे लक्ष

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवार काही प्रेझेंटेशन सुद्धा दाखवण्याचा शक्यता

सांगोल्यात शेकाप कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला

सांगोल्यात शेकाप कार्यकर्त्यावर तलवारीने हल्ला...

भाजपचे पराभूत उमेदवार संभाजी आलदर समर्थकांचा हल्ला....

हल्ल्यात शेकापचे कार्यकर्ते गजानन कोळेकर गंभीर जखमी...

हल्ला करून संशयित आरोपी फरार.

या घटनेनंतर शेकापाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व त्यांच्या समर्थकांचा कोळे गावात ठिय्या आंदोलन

आरोपींवर 24 तासात कारवाई करण्याचे पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित..

पालघरमध्ये भरधाव कंटेनरचा भीषण अपघात; हायड्रोक्लोराइड टँकर थेट हॉटेलमध्ये घुसला

मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यात भरधाव कंटेनरचा भीषण अपघात झाला. हायड्रोक्लोराइड लिक्विड वाहतूक करणारा टँकर नियंत्रण सुटल्याने थेट महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये शिरला. हा थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक तपासात टँकर चालक मद्यप्राशन करून नशेत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु; राज्यभरातून १५.३२ लाख विद्यार्थी बसणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा उद्या, १० फेब्रुवारीपासून सुरू होत असून ती १८ मार्चपर्यंत चालणार आहे. ही परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमधून घेतली जाणार आहे. यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण १५,३२,४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी मंडळाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी वेळेवर केंद्रावर हजर राहावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय नेते अमरावतीकरांकडून दिली जाणार श्रद्धांजली....

या श्रद्धांजली कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वपक्षीय आमदार उपस्थित आहे...

अमरावतीच्या सांस्कृतिक भवन मधील मैदानावर या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..

उद्या संध्याकाळी रोहित पवार यांची पत्रकार परिषद

रोहित पवार उद्या संध्याकाळी ४ वाजता मुंबईत घेणार पत्रकार परिषद

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार काय भूमिका मांडणार याकडे राज्याचे लक्ष

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवार काही प्रेझेंटेशन सुद्धा दाखवण्याचा शक्यता

सुनेत्रा पवार उद्या स्वीकारणार उपमुख्यमंत्री पदाचा पदभार

सकाळी १० वाजता मंत्रालयात स्वीकारणार पदभार

सुनेत्रा पवार आज पुण्यात शरद पवारांची भेट घेऊन मुंबईला जाण्याची शक्यता

सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार सुद्धा पुण्यात येण्याची शक्यता

शरद पवार यांना पाच दिवस दिले जाणार अँटिबायोटिक्स, सुप्रिया सुळे यांची माहिती

शरद पवार यांना छातीत कंजेशन झाल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती

शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याचं सुप्रिया सुळे यांनी केलं स्पष्ट

सुप्रिया सुळे यांनी मानले डॉक्टर यांचे आभार

उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगर मध्ये भाजपकडून जल्लोष

- भाजपचे माजी आमदार राजन पाटलांनी थोपटले दंड

- मोहोळ तालुक्यात भाजपला मोठे यश

शिर्डीला पायी रस्त्याने चालणाऱ्या भाविकांना ट्रकने चिरडले

शिर्डी कडे पाई पदयात्रा करत रस्त्यावरून चालणाऱ्या साई भक्तांना ट्रकने चिरडल्याची घटना साक्री तालुक्यातील धवळी विहीर गावालगत पिंपळनेर - दहिवेल रस्त्यावर घडली आहे, या घटनेत ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला असून, रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, या अपघातामध्ये दोन भाविक जखमी झाले असून त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,

मैं हू डॉन " आ. महेंद्र दळवी यांची प्रतिक्रिया

रायगडचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये जिल्हा परिषदेच्या 10 जागांपैकी 9 जागांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी, भाजप, शेकाप सह सर्व पक्ष विरोधात असताना शिवसेनेने हा विजय मिळवला आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना " मैं हू डॉन " अशी प्रतीकिया आ. महेंद्र दळवी यांनी दिली. आधी सर्वांनी गमजा मारल्या पण आता कळल असेल अस दळवी म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करणार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. प्रकृती खालावल्याने उपचारासाठी पुण्यात आणलं जात आहे.

पनवेलमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतमोजणी दरम्यान लाठीचार्ज

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतमोजणी दरम्यान पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

गर्दी अनियंत्रित झाल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

पनवेल मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ

पोलिसांनी सूचना देऊन सुद्धा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केले

मुंबईतील विलेपार्लेमध्ये १३ मजली इमारतीला भीषण आग

मुंबईतील विलेपार्लेमध्ये 'सुविधा पर्ल' या १३ मजली निवासी इमारतीला आज दुपारी भीषण आग लागली.

कोणतीही जीवित हानी नाही

चिकलठाण्यात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, घटना CCTV कॅमेरात कैद

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात

चिकलठाण्यात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

घटना CCTV कॅमेरात कैद

लातूरच्या महापौर पदावर काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे 

लातूर महानगर पालिकेच्या महापौर पदावर, काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे यांची बिनविरोध निवड, तर उपमहापौरपदी ॲड स्नेहल उडगे यांची बिनविरोध निवड, वंचित बहुजन आघाडी करून उमेदवारी अर्ज माघारी.

भाजपचा सुपडा साफ करणारा जन्माला यायचा आहे - माजी आमदार राम सातपुते

भाजपाचा सुपडा साफ करणारी अवलाद अजून जन्माला यायची आहे.

अशी खरमरीत टीका भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

भाजपच्या मंजुषा नागपुरे पुण्याच्या बिनविरोध महापौर

महापौर पदासाठी राष्ट्रवादीच्या शितल सावंत यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे

दिल्लीच्या ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

दिल्लीच्या ९ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

सकाळी ८:३० ते ९:०० च्या दरम्यान बॉम्बच्या धमक्यांचे फोन आले.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली

खलिस्तान नॅशनल आर्मीकडून बोलत असल्याचे धमकीत म्हटले

बदलापूरमध्ये आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण

बदलापूर जवळील चामटोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कोपऱ्याची वाडी या आदिवासी पाड्यावर गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा दुर्भिक्ष निर्माण झालंय. या आदिवासी पाड्यात सुरू असलेल्या राज्य शासनाच्या जलजीवन मिशन पुरता बोजवारा उडालाय. गेल्या दीड वर्षांपासून या जलजीवन मिशन योजनेचं काम अर्धवट अवस्थेत बंद असून नागरिकांच्या घरापर्यंत अद्याप या योजनेची पाईपलाईनही पोहोचलेली नाही. या पाड्यातील पाण्याच्या टाकीचं कामही अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे आदिवासी महिलांना आजूबाजूला असलेल्या फार्म हाऊसवर जाऊन पाण्यासाठी वळवण भटकावं लागतय. आता पाण्यासाठी रस्त्यावर उतरणे शिवाय पर्याय नाही असा इशारा या आदिवासी महिलांनी दिला

नंदुरबारमध्ये वाढत्या अतिक्रमणावर पालिकेचा बडगा

नंदुरबारमध्ये वाढत्या अतिक्रमणावर पालिकेचा बडगा, अतिक्रमणधारकांना नोटिसा

चौफुल्या आणि मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर

अतिक्रमणविरोधी मोहीम सुरूच ठेवण्याची आमदार रघुवंशी यांची अपेक्षा

महाराष्ट्रात ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा शुभारंभ!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नवीन बस दाखल होणार

या नव्या बसना ‘राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्यात आले आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

कराडला मतमोजणी केंद्रावर पोलीस आणि उमेदवारांची बाचाबाची

कराडला मतमोजणी केंद्रावर पोलीस आणि उमेदवारांच्यात बाचाबाची

दहा वाजता आलेल्या उमेदवाराला मतमोजणी केंद्रावर प्रवेश नाकारला

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा केला जाहीर निषेध

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला अडवले

निवडणूक निर्णय अधिकारी मनमानी करत असल्याचा थेट आरोप

गोदा घाट परिसरात बॅरॅकेट पडले पाण्यात

गोदा घाट परिसरात बॅरॅकेट पडले पाण्यात

गोदाई प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बॅरॅकेट काढले बाहेर

पोलिसांनी लावलेले बॅरॅकेट वाहनांच्या धडकेने पडले होते पाण्यात

रामकुंड परिसरात सिंहस्थाचे काम सुरू असल्याने लावण्यात आले होते ब्रॅकेट्स

प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पाण्यात उतरून बाहेर काढले अडकलेले बॅरॅकेट्स

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्ट्रीटलाईटची दुरावस्था

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील मेंढवन घाटात लावण्यात आलेल्या स्ट्रीटलाईट मागील अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराच दुर्लक्ष असल्याच चित्र पाहायला मिळतंय . मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवण घाटात अपघातांची वाढती संख्या पाहून या ठिकाणी काही वर्षांपूर्वी स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या . साधारणतः दोन ते अडीच किलोमीटर वरती या स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या असून ह्या स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्याने वाहन चालक आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .

पुसदमध्ये उभ्या ट्रॅव्हल्सला भीषण आग

उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना पुसद येथील इटावा ट्रॅव्हल्स पॉईंट्स परिसरात घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलाने पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आणली मात्र ट्रॅव्हल्सचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.अंजली ट्रॅव्हल्स ही पुसद ते पुणे प्रवाशी घेऊन जाण्यासाठी पुसद येथील इटावा ट्रॅव्हल्स पॉईंट येथे मध्यरात्री दरम्यान उभी असताना ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागली आग लागतात काही क्षणातच ट्रॅव्हल्स जळून खाक झाली.

उद्योग मंत्री उदय सामंत यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकिवरून उदय सामंत यांनी टोला लगावला आहे

संख्याबळावर ही निवडणूक असते

237 आमदार आमच्याकडे आहेत, समोरच्यांकडे किती आमदार आहेत हे तुम्हाला माहिती आहे

त्यामुळे उगाचच कोणी धाडस करणार नाही, याची पूर्ण कल्पना एक कार्यकर्ता म्हणून मला आहे

पुणे शहरात महानगरपालिकेची मोठी कारवाई

पुणे शहरात महानगरपालिकेची मोठी कारवाई

महापौर निवडी आधीच पालिकेने अतिक्रमणावरती हातोडा

खराडी बोराटे वस्ती येथे सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढत कारवाई

सकाळपासूनच या ठिकाणी सुरू आहे

छत्रपती संभाजीनगरमध्ये कडक बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूने सहा ठिकाणी बेरिगेटिंग करण्यात आलेली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. विधानसभा त्यानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी याच ठिकाणी मोठा गोंधळ आणि राडा झाला होता, त्यामुळे आता प्रशासनाने पूर्ण काळजी घेतली आहे दहा वाजता मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी या परिसरातील रस्ते पूर्णतः बंद करण्यात आले आहेत.

आंगणेवाडी आई भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेला सुरूवात झाली आहे. देवीच्या मंदिराभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. या रोषणाई मुळे मंदिर परीसरात झगमगाट पाहायला मिळत आहे. देवीच्या दर्शनासाठी रात्री पासूनच भाविकांनी गर्दी केली असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नऊ रांगाद्वारे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनासाठी राजकीय नेते व मुंबई नगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक आंगणेवाडी येथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आंगणेवाडी भराडी देवीच्या मंदिर परीसराची डाॅनने टिपलेली ही मनमोहक दृश्य..

Shirur-शिरुरच्या शेतशिवारात दोन बिबट्यांचा मुक्त संचार

उत्तर पुणे जिल्ह्यात ऊसतोड झाल्याने बिबट्याचे वास्तव्य शेतशिवारात मुक्तपणे पहायला मिळत असुन बिबट्याची शेतकरी वर्गात मोठी दहशत वाढत असुन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे

पुणे - नवे महापौर आज ठरणार

शहराचे नवे महापौर उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार असून निवडणुकीत भाजप सह राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरले आहेत महापालिका निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने निवडणुकीत तसेच चुरसही नाही दोन्ही पदांवर भाजपचाच उमेदवार निवडून येणार हे नक्की असल्याने एका परीने ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरणार आहे

Maharashtra Live News Update: रात्री थंडी आणि दुपारी उन्हाचे चटके

सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानात अर्धा ते एक अंशाने घट झाल्याने शहरासह जिल्ह्यातील थंडीचा जोड वाढू लागला आहे प्रामुख्याने हवेली परिसरासह एनडीए शिवाजीनगर खडकवासला आणि पाषाण परिसरातील बारा एक ते 20 यांनी घटला आहे त्यामुळे रात्री थंडीचा जोर वाढला आहे एकीकडे थंडी वाढत असताना दिवसात कमाल तापमानात झालेल्या वाढीमुळे दुपारी उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत

पीएमपी उत्पन्नात 98 कोटींची वाढ,  तिकीट दरवाढीमुळे प्रवासी नऊ लाखांनी घटले

तिकीट दरवाढीनंतर पीएमपीच्या उत्पन्नात वाढ झाली मात्र प्रवासी संख्या घटली असून ती वाढवण्यासाठी पीएमपीएल प्रयत्न करणे आवश्यक आहे 2025 मध्ये तिकीट विक्रीतून पीएमपीला 678 कोटी 89 लाख रुपये उत्पन्न मिळाले

प्रवासी संख्या 1 कोटी 28 लाख इतकी होती 2024 मध्ये 581 कोटी 57 लाख रुपये उत्पन्न मिळाले असून प्रवासी 1 कोटी 37 लाख होती

गतवर्षीच्या तुलनेत यंदा तिकीट दर वाढीमुळे वार्षिक उत्पन्नात 98 कोटींनी वाढ झाली मात्र प्रवासी संख्या नऊ लाखांनी घटल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com