Maharashtra News Live Update: यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पावसाळी अधिवेशन अपडेट, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv
Published On

घराची भिंत कोसळून वृद्ध महिलेला जखमी ,येवला तालुक्यातील आडगाव चोथवा येथील घटना

नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव चोथवा भागात संध्याकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे एका घराची भिंत कोसळून वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. रेशमबाई खोकले असे जखमी महिलेचे नाव असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिकांमध्ये या घटनेमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरूवात

यवतमाळ शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. जोरदार सरींमुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून बाजारपेठेत नागरिकांची धावपळ पाहायला मिळाली. दरम्यान, पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आष्टी तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

- विजांच्या कडकडाटासह आष्टी तालुक्यात पाऊस

- जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा

- तालुक्यात पेरण्यांना येणार वेग

उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, स्वागतासाठी नागपूर विमानतळावर ठाकरे गटातील पक्षातील कार्यकर्त्यांची गर्दी

ढोल ताशाच्या गजरात स्वागतासाठी मोठ्या संख्येने ठाकरेंचे शिवसैनिक एकत्र आले आहे.

या ठिकाणी शिवसैनिकांनी हातात फलक घेऊन पोहोचले आहे संकटाशी न डगमगता लढणारा फक्त एकच नेता.

बीड जिल्ह्यात काही भागात पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

बीड जिल्ह्यात यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून बीडच्या काही भागांमध्ये दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे मात्र या झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शेती मशागतीला सुरुवात झाली आहे मात्र काही भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम असून दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केली आहे.

बुलढाण्यात सलग सहाव्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

दिवसभराच्या उकाड्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात सायंकाळी चारनंतर अनेक भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. संग्रामपूर, खामगाव आणि शेगाव तालुक्यांत तासभरापासून जोरदार पाऊस सुरू असून, सलग सहाव्या दिवशी झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतातील कामांनाही वेग येण्याची शक्यता आहे. मात्र, काही सखल भागांत पाणी साचल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

अमरावतीत वीज कोसळून महिला शेतमजुराचा मृत्यू; सहा महिला गंभीर जखमी

अमरावती जिल्ह्यातील कळमजापूर येथे शेतात काम सुरू असताना अचानक वीज कोसळून सुनंदा सहारे या महिला शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य सहा महिला शेतमजूर गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने चांदूर रेल्वे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पावसाळ्यात शेतात काम करताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

केतन अग्रवाल खून प्रकरण; अटकेपूर्वी संशयितांनी मोबाईलमधील मेसेज डिलिट केल्याचा खुलासा

केतन अग्रवाल खून प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. १८ जून रोजी घटना घडल्यानंतर संशयित चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड व एकमेकांशी झालेले सर्व मेसेज डिलिट केल्याचे तपासात उघड झाले आहे. घटनेनंतर तीन दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्या मोबाईलमध्ये परस्परांचे शेकडो मेसेज असल्याचे समोर आले असून, डिलिट केलेला डेटा आणि मेसेज पुनर्प्राप्त करण्यासाठी दोन्ही मोबाईल फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

लोणावळ्यात मुसळधार पावसाला सुरुवात...

लोणावळ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मागील 2 दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आज पुन्हा पावसाच्या जोरदार सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. तर लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना पावसाची पर्वणी मिळाली. ऐन विकेंड ला मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

रत्नागिरीत मांडवी एक्सप्रेसचा तांत्रिक बिघाड दूर; तासाभरानंतर गोव्याकडे रवाना

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकात गाडी सुमारे तासभर थांबवण्यात आली. जनरेटर व्हॅन बंद पडल्यामुळे एसीचा वीजपुरवठा खंडित झाला आणि डब्यांतील वातानुकूलित व्यवस्था बंद पडल्याने प्रवाशांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. रेल्वेच्या तांत्रिक पथकाने बिघाड दूर केल्यानंतर एसी सेवा पूर्ववत करण्यात आली आणि त्यानंतर मांडवी एक्सप्रेस गोव्याच्या दिशेने रवाना झाली.

तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी पुन्हा पावसाची हजेरी

तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी पुन्हा पावसाची हजेरी...

अवघ्या दोन दिवसांत बोरवान नदी पुन्हा दुथडी भरून वाहतेय....

बोरवान ​नदीला पूर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद...

खत आणण्यासाठी गेलेले शेतकरी घराकडे परतताना नदीकाठी अडकले...

बोरवान नदीचा पूर ओसरण्याची प्रतिक्षेत शेतकरी....

नदीला पूर आल्याने 8 ते 10 गाव पाड्यांवर जाण्यासाठी नागरिकांना अडचण....

किल्ले रायगड परिसरात पावसाची संततधार

किल्ले रायगड परिसरात पावसाची संततधार

गड आणि परिसरातील डोंगरावरील झरे प्रवाहित

28 जून पर्यंत रायगड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट

- मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड

रेल्वेतील एसी बंद पडल्याने प्रवाशांना त्रास

पाऊण तासापासून गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर थांबून

मुंबईत गाडी सुरु झाल्यानंतर एसी कमी होता मात्र माणगाव दरम्यान एसी पुर्ण बंद झाला

प्रवासादरम्यान प्रवाशांना मोठा त्रास

छत्रपती संभाजीनगरमध्ये जूनअखेर सरासरीच्या केवळ 60.9 टक्के पाऊस

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांत पावसाचा तुटवडा, धाराशिव सर्वाधिक, लातूर सर्वात कमी, गेल्या वर्षाच्या तुलनेतही मोठी घट

मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अपेक्षित वेगाने पाऊस बरसत नसल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 60.9 टक्के पाऊस झाला आहे. विभागाची जून महिन्याची सरासरी 116.1 मिमी असताना प्रत्यक्षात केवळ 70.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 96 मिमी पाऊस झाला होता. जिल्हानिहाय पाहता धाराशिवमध्ये सर्वाधिक 94.8 मिमी (86.2%) पाऊस झाला आहे.त्यापाठोपाठ बीडमध्ये 80.7 मिमी (72.5%) पाऊस नोंदविण्यात आला आहे. तर लातूरमध्ये सर्वात कमी 59.8 मिमी (51%), परभणीत 61.9 मिमी (49.2%), नांदेडमध्ये 71 मिमी (52.7%), हिंगोलीत 76.2 मिमी (52%), छत्रपती संभाजीनगरमध्ये 63.1 मिमी (58.2%) आणि जालना जिल्ह्यात 66.9 मिमी (58.2%) पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाने अनेक भागात उघडीप दिल्याने खरीप पिकांच्या पेरण्या, उगवण आणि पुढील शेतीकामांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पिकांसह पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जून महिना संपत आला तरी मराठवाड्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही.विभागातील आठही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.

केतन अग्रवाल खून प्रकरण; सिया गोयलच्या भावाची चौकशी होणार

केतन अग्रवाल खून प्रकरणी सिया गोयल च्या भावाची चौकशी

साहिल गोयल ची पुणे ग्रामीण पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

वादग्रस्त पवना धरण बंदिस्त पाईप लाईनचा अंतिम निर्णय येत्या 3 जुलै ला सुटणार : महेश लांडगे भाजपा आमदार

पिंपरी चिंचवड शहरासाठी अतिशय महत्त्वाची समजली जाणारी पवना धरण बंदिस्त पाईप लाईनचा प्रश्न मागील एक दशका पासून प्रलंबित असून. या प्रश्नावर आता अंतिम तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या तीन जुलैला अधिवेशन चालू असताना मुंबईत एक महत्वाची बैठक आयोजित केली आहे.

धडगाव शहरात कोल्ड्रिंक मशीनची टँक फुटल्याने विस्फोट..

नंदुरबार फ्लॅश...

धडगाव शहरात कोल्ड्रिंक मशीनची टँक फुटल्याने विस्फोट...

कोल्ड्रिंक मशीनमधील गॅस आणि पाण्याच्या टँकचा अचानक ब्लास्ट...

गॅस आणि पाण्याचा दबाव वाढल्याने कोल्ड्रिंक मशीनचे झाले तुकडे तुकडे...

स्फोटावेळी मशीनजवळ कोणीही नसल्याने जीवितहानी टळली...

​विस्फोट एवढा भयानक होता की मशीनचे नळ थेट छताच्या पत्र्यामध्ये जाऊन अडकले...

अचानक झालेल्या प्रचंड आवाजामुळे धडगावातील व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण...

टँकमध्ये गॅसचा अतिरिक्त दबाव निर्माण झाल्यानेच हा स्फोट झाल्याचा अंदाज...

सुदैवाने स्फोटाच्या वेळी दुकानात किंवा मशीनजवळ कोणीही उपस्थित नव्हते...

केतन अग्रवाल प्रकरणात उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून करावी नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली लोहगड खून प्रकरणाची दखल घेतली आहे. विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते.

संबंधित प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून करावी नियुक्ती, मुख्यमंत्री यांचे विधी व न्याय विभागाला आदेश

ketan agarwal pune
ketan agarwal pune

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन

धुळे शहरात आज सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एका अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; 26 जुलैला मतदान , 28 जुलैला मतमोजणी 

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला.राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने नांदेड जिल्हा बँकेचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.23 जागांसाठी ही निवडणुक होणार आहे.30 जून पर्यन्त नामांकन दाखल करण्याची मुदत आहे.16 जुलै पर्यंत अर्ज माघे घेता येणार आहे.

तुळजाभवानी मंदिरात भाविकात फ्रीस्टाइल हाणामारी

तुळजाभवानी मंदिरात भाविकात फ्रीस्टाइल हाणामारी

हाणामारीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद

सलग चार दिवस सुट्ट्या आल्यामुळे तुळजापुरात भाविकांची तुफान गर्दी

व्हीआयपी पास काढण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती

गर्दी वाढल्याने मंदिर संस्थान गर्दीचे करत आहे काटेकोर नियोजन

व्हीआयपी पासवर देखील मंदिर संस्थांने गर्दीचा अंदाज पाहता आणले आहे निर्बंध

राजकारणात प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचे अधिकार आहे - उद्योगमंत्री उदय सामंत 

ऑन ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुत्रांशीबोलताना सांगितलं की,   सुधीर भाऊ काय बोलले मला माहिती नाही. राजकारणात प्रत्येकाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचे अधिकार आहेत. शिवसेना शिंदे गट मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचे साक्षीदार आपण सगळे आहोत.

अनसिंग बसस्थानकावर भरदिवसा चोरी; महिलांच्या टोळीला रंगेहाथ पकडले 

वाशिमच्या अनसिंग बसस्थानकावर भरदिवसा प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल आणि रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना नागरिकांनी रंगेहाथ पकडले. चोरीचा प्रकार उघड करणाऱ्या एका वृद्ध महिलेवर हल्ला झाल्याचा आरोप असून, पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

'सारथी'च्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Live

रोजगाराची संधी असलेलं शिक्षण दिलं गेलं

५०६ कोर्सेसमधून विद्यार्थ्यांना ५० टक्के फी सवलत दिली गेली.

लहान वयातील मुलांमध्ये अशी सुडबुद्धी कशी सुचते?- मुख्यमंत्री फडणवीस

केतनची अग्रवाल मृत्यू प्रकरण धक्कादायक

अशी सुदबृद्धी लहान वयातील मुलामध्ये आणि चांगल्या घरातील लोकांमध्ये कशी सुचते?

समाजाला विचार कऱण्याची गरज

नसरापूर प्रकरणात पोलिसांचा तपास योग्य- देवेंद्र फडणवीस

बीडमध्ये माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर जिल्हा परिषद शाळेला पहिल्याच पावसात तलावाचे स्वरूप

पाहिल्याच पावसात माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर जिल्हा परिषद शाळेच्या परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. या शाळेत पाच वर्गांसाठी केवळ दोनच खोल्या उपलब्ध असल्याने एकाच खोलीत दोन ते तीन वर्ग भरवावे लागत आहेत. शाळेच्या इमारतीची दुरवस्था, स्वच्छतागृहांचा अभाव आणि साचणाऱ्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोलापूर महापालिकेच्या निवडणूक खर्चात वाढ ; स्थायी समिती सभापतींकडून बिलावर आक्षेप

नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर महापालिका निवडणुकीत झालेल्या खर्चावरून मोठा वाद निर्माण झालाय. निवडणुकीतील विविध कामासाठी देण्यात आलेल्या मूळ मक्त्याची किमत 1 कोटी 70 लाख असताना मक्तेदाराने पालिकेला चक्क 6 कोटी 70 लाख रुपयांची बिलं सादर केली आहेत.मूळ मकतापेक्षा तब्बल 4 पटीने बिलांची रक्कम वाढल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थितीत

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था शिवाजीनगर (सारथी) देणार भेट

त्यानंतर गणेश कला क्रीडा मंच येथे सारथी संस्थेतून यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याला राहणारा उपस्थितीत

गडचिरोलीत अवैध वाळू उपशाचा बळी; सिंड्राई रेतीघाटावर मजुराचा मृत्यू

देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा परिसरातील सिंड्राई रेतीघाटावर अवैध वाळू उपशादरम्यान ३४ वर्षीय मजूर विलास महादेव देवढगले राहणार जुनी वडसा यांचा यंत्राखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २५ जून रोजी सकाळी घडली.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 14 मिलिमिटर पाऊस,

रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त 49 मिलिमिटर पाऊस

आज कोकणासाठी पावसाचा यलो अलर्ट

कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधीक असण्याची शक्यता

किनारपट्टी भागात ताशी 30 ते 40 किलोमिटर वेगाने वारे वाहणार

शेतकऱ्यांचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव; युरिया तुटवडा की काळाबाजार? पवन मावळातील बळीराजा संतप्त!"

एकीकडे उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे, तर दुसरीकडे २६६ रुपयांची युरियाची बॅग ३०० ते ३५० रुपयांना विकली जात आहे, कृत्रिम खतटंचाई निर्माण केल्याचा आरोप पवन मावळातील शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी सेवा केंद्रावर युरिया उपलब्ध असूनही तो दिला जात नसल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी थेट कृषी अधिकाऱ्यांनाच घेराव घालत जाब विचारला.

Mayank Murder Case : मयांक लोहार हत्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुटुंबीयांना दिलासा

मयांक लोहार हत्याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुटुंबीयांना दिलासा

मयांकला न्याय मिळवून देऊ" – एकनाथ शिंदे यांची वडिलांशी फोनवर चर्चा

Sindhudurg : स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे सेनेची महावितरण कार्यालयावर धडक

कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने धडक देत स्मार्ट वीज मीटर, वाढीव वीज बिले आणि धोकादायक भूमिगत वीज वाहिन्यांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याशी झालेल्या चर्चेत स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, अशी मागणी करण्यात आली.

Dharashiv : बोगस खते-बियाणे विक्रेत्यांवर 'मकोका'ची मागणी - आमदार प्रवीण स्वामी

बोगस खते-बियाणे विक्रेत्यांवर 'मकोका'ची मागणी

बोगस खते-बियाणे उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात कडक कायद्याची ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामींची विधानसभेत मागणी

Virar Fire : विरारमध्ये अग्नितांडव! पुष्प प्लाझा इमारतीमधील पहिल्या माळ्यावर भीषण आग

विरार पूर्व स्टेशन जवळील पुष्प प्लाझा इमारतीमधील पहिल्या माळ्यावर एका ऑफिस मध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली

गुरुवारी रात्री साडे अकरा च्या सुमारास ही आग लागली असून, आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जाणांनी घटनास्थळावर पोहचून काही तासातच आगीवर नियत्रण मिळवले

Accident : वाशिममध्ये नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सचा अपघात

वाशीम शहराजवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ खुराणा ट्रॅव्हल्सच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रॅव्हल्स भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.

डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या काठावर असलेल्या टिन पत्र्यांच्या दुकानांचा चुराडा करत खाली उतरली.

Nashik : नाशिक जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर यंदा कडक निर्बंध

- नाशिक जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर यंदा कडक निर्बंध

- विशेषतः त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पर्यटनस्थळांवर असणार कडक निर्बंध

- नियमभंग करणाऱ्यांवर वन विभागाची होणार कारवाई

Yavtmal : मंदिरातून चांदीसह चार लाखांचा मुद्देमाल लंपास

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मानकी आंबा येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत उद्धवबाबा मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजा तोडून प्रवेश करत साडेपाच किलो चांदीच्या वस्तू आणि दानपेटीतील ६० हजार रुपये असा एकूण अंदाजे चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून,चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दारव्हा पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात सर्वात मोठी जुगारविरोधी कारवाई

धाराशिवच्या कळंब शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कळंब पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठी धाड टाकली.

या कारवाईत जुगार खेळताना अनेकांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण ५९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळावरून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि अन्य 19 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Sangali : सांगली महापालिकेच्या शाळेत जाऊन महापौरांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

सांगली महापालिका क्षेत्रातल्या शाळांच्या महापौरंकडून पाहणी करण्यात आली आहे.

मिरजेतील महापालिकेच्या शाळेमध्ये महापौर धीरज सूर्यवंशी यांनी अचानक जाऊन भेट दिली.

यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा आढावा थेट विद्यार्थ्यांच्याकडूनच महापौर धीरज सूर्यवंशी यांनी घेतला.

राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त फलक रेखाटन करत त्यांना अभिवादन

समाजातील सर्व घटकांना प्रगतीची समान संधी उपलब्ध व्हावी म्हणून सामाजिक समतेसाठी आरक्षणाचा कायदा करणारा पहिला राजा.शिक्षण,संस्कृती,कला,क्रिडा या श्रेष्ठ गोष्टींना राजाश्रय देणारा व अंध्दश्रध्दे वर प्रहार करणारा लोकांचा राजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त चांदवडच्या कला शिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूंच्या माध्यमातून फलक रेखाटन करत त्यांना अभिवादन केले आहे.

MPSC News : एमपीएससी कडून परीक्षार्थींना कागदपत्रासाठी मुदतवाढ 27 जून पर्यंत संधी

एमपीएससी (MPSC Exam) कडून परीक्षार्थींना कागदपत्रासाठी मुदतवाढ 27 जून पर्यंत संधी

एमपीएससी कडून सेवेतील पदभरतीसाठी वैद्य प्रमाणपत्र कागदपत्र सादर न केलेल्या उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे

27 जून पर्यंत कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे अन्यथा भरती प्रक्रियेसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com