Maharashtra News Live Update: सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकाच ठिकाणी हॉस्टेल उभारणार- बावनकुळेंची घोषणा

Marathi Breaking Live Headlines Updates : राहुल गांधी आंदोलन, शिवसेना सुनावणी, राज्यातील हवामानाचा अंदाज , महाराष्ट्र दुष्काळ, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी एकाच ठिकाणी हॉस्टेल उभारणार- बावनकुळेंची घोषणा

जाती-पातीच्या भिंती दूर करत विद्यार्थ्यांसाठी उभारणार एकत्रित हॉस्टेल

आदिवासी, एससी, ओबीसी, मराठा तसेच सर्व समाजातील विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी निवासाची सुविधा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय

विभागीय स्तरावर १ हजार, जिल्हा स्तरावर ५०० विद्यार्थ्यांची क्षमता

१३ ऑक्टोबरपर्यंत जागा निश्चित करून प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश

महाज्योतीच्या वसतिगृहांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा

पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचा सौम्य धक्का

संध्याकाळी सात वाजून 16 मिनिटांच्या दरम्यान 3.7 रिश्टर स्केलचा बसला धक्का

तलासरी, धुंदलवाडी, मोडगाव , कासा परिसर हादरला

गेल्या कित्येक वर्षापासून पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात सौम्य , अधिक तीव्रतेचे धक्के बसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

महाड MIDC तील ॲस्ट्रॉईड लाईफ सायन्स कंपनीमध्ये स्फोट

चार कामगार जखमी झालेत. नायट्रेनची प्रक्रिया सुरु असताना स्फोट झाला. महाडमधील खाजगी रुग्णालयात उपचार करता दाखल. पोलीस आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

जालन्यात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडी आक्रमक

विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जालना शहरातील गांधी चमन येथे आंदोलन करण्यात आले.

सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय.

एमपीएससी आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांचा राजकीय स्वार्थ -  शिवेंद्रराजे भोसले

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनामागे दोन वेगळे अजेंडे असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून सरकार त्यावर सकारात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विरोधक आंदोलनस्थळी येऊन राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांऐवजी राजकीय पोळी भाजणे आणि मीडियाचे लक्ष वेधणे हा विरोधकांचा हेतू असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी राजकीय अजेंड्याला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या सूचना; एस. एम. जोशी पूल रिकामा करण्याचे आवाहन

पुण्यात गेल्या आठ दिवसांपासून एस. एम. जोशी पुलावर एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आल्याने पुणे पोलिसांनी विद्यार्थ्यांना पूल रिकामा करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांकडून अनाउन्समेंट करत विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था कायम राखणे महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करून आंदोलनाच्या ठिकाणाहून हटावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रदीप पुणेकर हत्या प्रकरणी महाविकास आघाडीचा उद्या ठाण्यात मोर्चा

प्रदीप पुणेकर हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने उद्या ठाण्यात विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाणे महापालिका कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात होऊन तो ठाणे पोलीस आयुक्तालयापर्यंत जाणार आहे. सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी कल्याणमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. पत्रकार परिषदेत कुंतन पाटील आणि उल्हास भोईर यांनी आरोपींवर तातडीने कारवाईची मागणी केली.

मालेगावमध्ये ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम; तापमान 38.4 अंशांवर

नाशिकच्या मालेगावमध्ये ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम असून, गेल्या चार दिवसांपासून तापमान 38.4 अंश सेल्सिअसवर स्थिर आहे. आजही कमाल तापमानाची 38.4 अंश सेल्सिअस नोंद झाली. सकाळी आणि रात्री हवेत काही प्रमाणात गारवा जाणवत असला, तरी दुपारच्या वेळी उन्हाचे चटके बसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सांगलीत कार विहिरीत कोसळून एकाचा मृत्यू; दोन दिवसांनी मृतदेह सापडला

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथे कार विहिरीत कोसळून धनंजय सुभाष शेटे (४१) यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी कामावरून घरी परतताना चिकुर्डे-करंजवडे मार्गावर रस्त्याचा अंदाज न आल्याने कार विहिरीत कोसळली. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर विहिरीजवळ कारचा आरसा व इंडिकेटर आढळले. पोलिस आणि रेस्क्यू फोर्सने शोधमोहीम राबवून कार व मृतदेह बाहेर काढला. घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

मनरेगाच्या प्रलंबित बिलांवरून शेतकऱ्यांचा संताप; जिल्हा परिषदेसमोर मुंडन करून श्राद्ध आंदोलन

परभणीत मनरेगाच्या प्रलंबित बिलांवरून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सन २०२२-२३ पासून सिंचन विहिरी आणि गायगोठ्यांच्या कुशल कामांची बिले थकीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला. स्वखर्चाने कामे पूर्ण करूनही बिले मिळाली नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सर्व प्रलंबित बिले तातडीने द्यावीत, लाभार्थ्यांची गावनिहाय यादी जाहीर करावी आणि बिले का थांबली याची लेखी माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. आठ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना केलेल्या अटकेबाबत आणि दाखल केलेल्या गुन्ह्याच्या विरोधात पुण्यात आंदोलन

काँग्रेसचे पुण्यात आंदोलन

राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना केलेल्या अटकेबाबत आणि दाखल केलेल्या गुन्ह्याच्या विरोधात आंदोलन

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर परिसरात आंदोलन

केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस ची घोषणाबाजी

राहुल-प्रियंका गांधी राजघाटावर पोहोचले

गोकुळ निवडणुकी संदर्भात सतेज पाटील आज समविचारी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करणार

काल महायुतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर सतेज पाटील आज समविचारी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करणार... या पत्रकार परिषदेला राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित आहेत...

सचिन वाझेंच्या जामिनावरील स्थगिती कायम….

सचिन वाझेंच्या जामिनाला दिलेला स्टे कायम ठेवण्यात आला आहे….

१४ ऑक्टोबरला पुन्हा होणार सुनावणी…

३ तास युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाचा निर्णय…

पुण्यातील डोणजे गावात अभिनेते नाना पाटेकर अंत्यसंस्कार होणार 

पुण्यातील डोणजे गावात अभिनेते नाना पाटेकर यांचा अंत्यसंस्कार होणार आहे. त्याची तयारी डोणजे गावातील त्यांच्या जमिनीवर सुरू आहे. अनेक चाहते त्यांच्यासोबत वेळ घालवलेले नागरिक यांच्यासह अधिकारी अभिनेते राजकीय नेते या परिसरात पोहोचले आहेत.

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक उद्या जालना जिल्हा दौऱ्यावर...

जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उद्या सकाळी केंद्राचे पथक उद्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. जालन्यातील बदनापुर तालुक्यातील नानेगाव, किनगाववाडी आणि अंबड तालुक्यातील जामखेड शिवारात पथक मोसंबी, कापूस आणि सोयाबीन पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहे. जालना जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामातील कापूस सोयाबीन करपून गेली असून फळबागांचे देखील नुकसान झाल आहे.या पार्श्वभूमीवर केंद्राचे पथक प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे..

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी दाखल

कॉँग्रेस खासदारांचे आज पुन्हा स्नेहभोजन

दिल्लीत मोठा पोलिस बंदोबस्त

आज पुन्हा निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन होण्याची शक्यता

मल्लिकार्जुन खरगे यांचा मोदी सरकारवर घणाघात

इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर जाणार

त्याठिकाणी धरणे आंदोलन करणार

ज्ञानेश कुमारांचा गुन्हेगारी कट, लोकशाही नष्ट करण्याचे षड्यंत्र

आमचे 300 खासदार आहेत, आम्ही शांततापूर्ण आंदोलन करणार - राहुल गांधी

Nandurbar: अंमली पदार्थाविरोधात नंदुरबार क्राईम ब्रांचची मोठी कारवाई, 1 कोटींचा गांजा जप्त

नंदुरबार -

अंमली पदार्थाविरोधात नंदुरबार क्राईम ब्रांचची मोठी कारवाई

सातपुड्याचा डोंगराळ भागातून तब्बल 1 कोटी 31 लाखांचा 262 किलो गांजा जप्त.

धडगाव तालुक्यात मांडवी परिसरातील गांजाची शेती उघडकीस

वनजमिनीवर गांजा पिकवणाऱ्या आरोपीवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

Mumbai:  मुलुंडमध्ये सुरू असलेल्या PAP प्रकल्पाला भीषण आग 

मुलुंडमध्ये सुरू असलेल्या PAP प्रकल्पात अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे.

सध्या आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Delhi: इंडिया आघाडीची पुन्हा लंच डिप्लोमसी, राहुल गांधी बैठकीसाठी पोहचले 

दिल्लीत आज पुन्हा इंडिया आघाडीचे आंदोलन होणार

इंडिया आघाडीची पुन्हा लंच डिप्लोमसी

इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांची बैठक

राहुल गांधी बैठकीसाठी हॉटेलवर पोहचले

Pune: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वाहिली नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

पुणे -

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वाहिली नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

अजित दादा आणि नाना पाटेकर यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते

सुनेत्रा पवार यांनी दिली प्रतिक्रिया

CJP Protest: बंगळुरू येथे सीजेपीचे आंदोलन सुरू, आंदोलनात ध्रुव राठी सहभागी

बंगळुरू-

बंगळुरू येथे सीजेपीचे आंदोलन सुरू

या आंदोलनात ध्रुव राठी सहभागी झाला

सीजेपीच्या आंदोलनासाठी मोठी गर्दी झाली आहे

Pune: डोणजे गावात नाना पाटेकरांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार, अंत्यविधीची तयारी सुरू

पुणे -

डोणजे गावात नाना पाटेकरांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

डोणजे गावात अंत्यविधीची तयारी सध्या सुरू आहे

पोलिस अधिक्षक संदीप गिल यांनी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर अंत्यविधी होईल असे सांगितले

अनेक व्हीआयपी, राजकीय नेते आणि सिनेसृष्टी- सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Sindhudurg: राहुल गांधी यांच्यावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसचे आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी व प्रियंका गांधी वड्रा यांनी दिल्लीत आंदोलन केले

या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात मोदी सरकारने केलेल्या दडपशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे प्रतिकात्मक पोस्टर दहन करण्यात आले.

Pimpari Chinchwad: ज्ञानेश कुमारांविरोधात पिंपरी-चिंचवड शहरात इंडिया आघाडीचा मोर्चा

पिंपरी चिंचवड शहरात आज इंडिया आघाडीने केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चा काढला आहे.

आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरापासून निगडी येथील तहसील कार्यालयापर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.

ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करा, SIR रद्द करा, EVM हटवा आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या अशा विविध प्रमुख मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

Amravati: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी अमरावतीत इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अमरावती -

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाच्या मागणीसाठी अमरावतीत मोर्चा

अमरावतीमध्येही इंडिया आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मोर्चात खासदार बळवंत वानखडे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी सहभागी

Thane: ठाण्यात रोडच्या कामादरम्यान हायड्रॉलिक क्रेन कोसळली

ठाणे -

ठाण्यातील सिदेश्वर तलाव परिसराजवळ एमएमआरडीएच्या एलिव्हेटेड रोडच्या बांधकामस्थळी मोठा अपघात

बांधाकमस्थळी काम करणारी हायड्रॉलिक क्रेन अचानक कोसळली

ही घटना सर्व्हिस रोडवर घडली असून क्रेनच्या धडकेत एका ऑटो-रिक्षाचे नुकसान झाले

घटना घडताच परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई; बदललेल्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर

कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई; बदललेल्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोझर

पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांची कारवाई; वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करून आवाज करणाऱ्यांना दणका

नानांना आनंदवनाची श्रद्धांजली

थोर समाजसेवी दिवंगत बाबा आमटे यांच्याशी आणि संपूर्ण आमटे परिवाराशी नाना यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

आनंदवनाच्या अनेक उपक्रमात, कार्यक्रमांत नानांचा प्रत्यक्ष सहभाग रहायचा.

प्रकाश आमटे यांच्या जीवनावरील चित्रपटात नानांनी भूमिका साकारून आमटे परिवारावरील प्रेम सिद्ध केले.

महारोगी सेवा समितीचे कौस्तुभ आमटे यांनी नानांच्या आठवणी जागवतानाच अतिशय शोकाकुल होत श्रद्धांजली अर्पण केली

एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकार चे प्रतिनिधी आज संवाद साधण्याची शक्यता

एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी सरकार चे प्रतिनिधी आज संवाद साधण्याची शक्यता

एम पी एस सी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाचे सरकार मधील प्रतिनिधींशी चर्चा

आज संध्याकाळी सरकार मधील २ प्रतिनिधी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता

एम पी एस सी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस

नाना पाटेकर यांच्या निधनामुळे आज आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांकडून होणारे काही कार्यक्रम रद्द

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील आलिशान वॉटर पार्कजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

तरुणाच्या डोक्याच्या मागील बाजूस एखाद्या वस्तूने वार केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

अनधिकृत स्टॉलवर सावंतवाडी नगरपालिकेची धडक कारवाई

सावंतवाडी शहरातील अनधिकृत स्टॉलवर नगरपालिकेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. याच पाश्र्वभूमीवर शहरातील SPK कॉलेजसमोरील अनधिकृत स्टॉलवर नगरपालिकेने धडक कारवाई करत स्टॉल जप्त केले. या कारवाईनंतर शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

पुण्यातील एस एम जोशी पुलावर विद्यार्थ्यांची संवेदनशीलता

पुण्यातील एस एम जोशी पुलावर विद्यार्थ्यांची संवेदनशीलता

पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे या ठिकाणी लावण्यात आला नाना पाटेकर यांचा फ्लेक्स

नाना पाटेकर यांना विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली

Sangli : दुष्काळात हळदीला सोन्याचा भाव

एकीकडे दुष्काळाचे सावट असताना हळदीने सोन्याचा भाव मिळत आहे.. उत्पादन आणि त्यातच बाजारातील घटती आवक यामुळे हळदीच्या दराला चांगलीच झळाळी आली आहे.

सांगली मार्केट यार्डात बुधवारी राजापुरी हळदीला प्रतिक्विंटल तब्बलं २५ हजार रुपयांपर्यंतचा मिळाला असून, हलक्या प्रतीच्या हळदीलाही १३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

दिल्लीत संसद मार्गाची सुरक्षा वाढवली

दिल्लीत संसद मार्गाची सुरक्षा वाढवली

दिल्लीत आज देखील काँग्रेसचे आंदोलन आहे

हे आंदोलन ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात केले जात आहे

या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे

भिवंडीत इंडिया आघाडी तर्फे लाँग मार्चचे आयोजन

निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलन अधिकच तीव्र होत असताना भिवंडीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी येत्या 9 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता लॉंग मार्च मोर्चाचे आयोजन केले आहे असे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

या पत्रकार परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षांचे भिवंडी शहराध्यक्षां सोबतच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

विद्यार्थ्यांना तातडीने एसएम जोशी पूल परिसर रिकामा करण्याची नोटीस

एमपीएससी विद्यार्थ्यांचा आहे त्याच ठिकाणी आंदोलन करण्याची सुधारित परवानगी पुणे पोलिसांनी नाकारली

आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे आंदोलनांसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी मागण्याच्या सूचना

‘नाना पाटेकर आपल्यातून निघून गेले यावर विश्वास बसत नाही’- उद्धव ठाकरे

नाना पाटेकर आपल्यातून निघून गेले, यावर अजूनही विश्वास बसत नाही. मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट आणि हिंदी सिनेमाच्या पडद्यावर त्यांनी अक्षरशः राज्य केले. हिंदी चित्रपटसृष्टीत नाना म्हणजे मराठी अस्मिता आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते. मराठी म्हणून नानांनी आपला एक दरारा निर्माण केला होता. उत्तुंग प्रतिभेचे ते अभिनेते होते.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा खास स्नेह होता. ते स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेत. ‘अंकुश’, ‘परिंदा’, ‘वेलकम’, ‘नटसम्राट’, ‘प्रहार’ यांसारख्या असंख्य चित्रपटांतील त्यांचा अभिनय गाजला आणि त्यांचे अनेक चित्रपट अविस्मरणीय ठरले.

नानांचे जाणे महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. ठाकरे परिवाराने एक प्रिय स्नेही गमावला आहे. नानांचे स्मरण कायम राहील.

शिवसेना परिवारातर्फे नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

नाना पाटेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी आणि हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पाहता, त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

‘पुरेश्या धक्क्यातून मी सावरलो नाही’; अमोल पालेकर यांची भावुक प्रतिक्रिया

आज सकाळी बातमी कळल्यावर सुन्न झाल्यासारखं होतं आहे. माझी आणि त्याची मैत्री दशकांपासून आहे. छबिलदासमध्ये मी त्यांना पाहिलं होतं, रवींद्र नाट्य मंदिरात गप्पा मारताना असे अनेक क्षणांचा प्रवास अजूनही डोळ्यासमोर आहे. दीड दिवसांपूर्वीच आमचं बोलणं झालं होतं.

अतिशय गुणी कलावंत, स्वतःला सतत तासून बघणारा, पुन्हा पुन्हा नव्याने शोधणारा अभिनेता आणि एक अत्यंत दिलदार माणूस. आमचा सगळा प्रवास इतक्या वर्षांचा आहे, याबद्दल काय बोलायचं? एका चित्रपटात माझ्याकडून त्याने भूमिका भांडून घेतली. ज्या नेटाने त्याने स्वतःला अंतर्बाह्य बनवलं, ते अविस्मरणीय आहे.

जेव्हा जेव्हा मी त्याला हाक दिली, तेव्हा धाकट्या भावासारखा तो माझ्या पाठीशी उभा राहिला. इतका फिट माणूस, रोज व्यायाम करणारा; घरी त्याची जिम होती. माझ्यासारख्याचं जाणं हे पटू शकतं, पण त्याच्यासारख्या माणसाचं जाणं...

आम्ही कडकडून मिठी मारायचो. माझा ‘ऐवज’ या प्रकाशन सोहळ्याला तो आला होता. फोन करून भरभरून बोलला होता. नेहमीच सुखी होता, आताही सुखी होता. नीलू आणि मल्हार यांना ताकद मिळो, हीच प्रार्थना.

नानांची अकाली ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी- मुख्यमंत्री

ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्व आणि समाजकारणाची मोठी हानी - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच भारतीय कलाविश्वाने एक हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

​आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. 'नटसम्राट', 'क्रांतिवीर', 'परिंदा' यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर उमटवलेली अमीट छाप रसिकप्रेक्षकांच्या मनात सदैव कायम राहील."

​नाना पाटेकर आणि पवार कुटुंबातील आपुलकीच्या संबंधांचा उल्लेख करताना त्या भावूक झाल्या. "नानांचे आदरणीय अजितदादांशी अतिशय जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि स्नेहाचे संबंध होते. कौटुंबिक सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात ते नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत वैयक्तिक आणि विशेष दुःखद आहे," असे त्या म्हणाल्या.

निफाड मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी तिहेरी संकटात, नुकसानभरपाईची मागणी

नाशिकच्या निफाड तालुक्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे,गेल्या दीड ते दोन महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकाला पाण्याची गरज असताना एकीकडे उन्हाचा पारा वाढला आहे,त्यातच सोयाबीनवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकरी २५ ते ३० हजार रुपयांचा उत्पादन खर्च होत असल्याने खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून उत्पादन खर्च भरून निघेल इतकी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सोयाबीन उत्पादक शेतकरी करत आहे

चारचाकी वाहन थेट चढले दुभाजकावर; अमरावती–वलगाव रोडवर रजनी मंगलमजवळ अपघात

अमरावती–वलगाव रोडवरील रजनी मंगलम कार्यालयाजवळ चारचाकी वाहनाच्या अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेले एक चारचाकी वाहन थेट रस्त्यावरील दुभाजकावर (डिव्हायडर) जाऊन चढले. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने आणि अंधारात किंवा अनपेक्षितपणे दुभाजकाचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचा पुढील भाग चकनाचूर झाला आहे...या मार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे अपघात होत असल्याचे सांगत, प्रशासनाने त्वरित योग्य उपाययोजना आणि दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

नागपुरात निवडणूक आयुक्त विरोधात इंडिया आघाडी कडून जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा

- सकाळी दहा वाजता नागपूरच्या व्हेरायटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार भव्य मोर्चा

- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करण्यात येणार.

- या मोर्चामध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्ष होणार सहभागी.. त्यामुळे मोर्चा अधिक आक्रमक होण्याची शक्यता.

Pune : अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स ची लोणावळामध्ये कारवाई

अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्स ची लोणावळा मध्ये कारवाई

७४.१५ लाख रुपयांचे कोकेन जप्त, एक आरोपी ताब्यात

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त होण्याची शक्यता

Yavatmal : बोटोणी येथील आश्रम शाळेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

यवतमाळच्या मारेगांव तालुक्यातील बोटोणी येथील शासकीय आश्रम शाळेला जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अचानक भेट देऊन शाळेची पाहणी केली

यावेळी त्यांनी आश्रम शाळेतील विविध सोयी सुविधांबाबत शाळा प्रशासनाची झाडाझडती घेत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.