Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन पार पडले

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: महाराष्ट्रात उष्णतेची लाट, अवकाळी पावसाचा इशारा, विधान परिषदेच्या निवडणुका अपडेट, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण, देशातील राजकीय घडामोडी सर्वकाही वाचा एका क्लिकवर
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam

संजय गायकवाड व बागेश्वर बाबा यांच्या वक्तव्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी : माकप

छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे संपादक प्रशांत अंबी यांना अत्यंत वाईटरित्या शिवीगाळ केली आहे व धमक्या दिल्या आहेत. माता भगिनी वरून त्यांनी वापरलेली भाषा कोणत्याही सभ्य माणसाला सहन होणार नाही अशी आहे.

बागेश्वर बाबा यांच्या या विधानाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मोहन भागवत समर्थन करत आहेत काय ? असा प्रश्न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उपस्थित केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन पार पडले

शिरपूर येथील आर सी पटेल फार्मसी कॉलेज मैदानात कार्यक्रमाचं आणि सभेचे आयोजन...

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शैक्षणिक संस्था व औद्योगिक उपक्रमक्रमाची उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ वर्चुअल पद्धतीने..

मंत्री संजय सावकारे, जयकुमार रावळ, आमदार अमरीश पटेल, काशीराम पावरा ,अनुप अग्रवाल ,राम भदाणे यांची उपस्थिती..

सभेला हजारो नागरिकांची उपस्थिती...

बुलढाण्यात तापमानाचा पारा चढला; येलो अलर्टचा परिणाम, खामगावात 43.2°C नोंद

बुलढाणा जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून आज तापमानाने उच्चांक गाठला. बुलढाणा शहरात 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर खामगाव शहरात तब्बल 43.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पश्चिम विदर्भासाठी जारी करण्यात आलेल्या येलो अलर्टचा परिणाम आज जिल्ह्यात स्पष्टपणे जाणवू लागला असून नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे...

अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू

  • शनिशिंगणापूर जवळील हनुमानवाडी येथील घटना

  • रंगनाथ पंढरीनाथ शेटे ( वय 75 ) या शेतक-याचा मृत्यू

  • गेल्या पाच दिवसांपासून रंगनाथ शेटे होते बेपत्ता

  • उसाच्या शेतात उग्र वास येवू लागल्याने स्थानिकांनी केली शोधाशोध

  • ऊसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

  • बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू की घातपात याबाबत चर्चांना उधाण

डोबिंवलीमध्ये जत्रेसाठी बकरा दिला नाही म्हणून कुटुंबियांना मारहाण प्रकरणी दोघांना अटक

डोंबिवलीत जत्रेसाठी बकरा दिला नाही म्हणून एका कुटुंबातील तीन लोकांना काही दिवसांपूर्वी बेदम मारहाण करण्यात आली होती.

जखमींमध्ये एका वयोवृद्ध महिलेच्या देखील समावेश होता. या घटनेच्या व्हिडिओ चांगलाच वायरल झाला होता.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणात सुजल भोसले आणि रोहित ढेंबे या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींच्या शोध सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात आज तापमानाचा पारा पुन्हा वाढला

नाशिक जिल्ह्यात तापमानाचा पारा आज पुन्हा वाढले असून, मालेगावमध्ये तापमानचा पारा 43 अंशाच्या पार गेला आहे. काल 42 अंशावर असलेला पारा आज 43.4 अंशावर पोहोचला असून यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धुळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तपन भाई पटेल मेमोरेल हॉस्पिटलचं उद्घाटन

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या हस्ते शिरपूर येथील तपन भाई पटेल मेमोरेल हॉस्पिटलच करण्यात आले उद्घाटन

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पालकमंत्री जयकुमार रावल त्याचबरोबर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच माजी मंत्री तथा आमदार अमरीश भाई पटेल उपस्थित

जालन्यात वंचित बहुजन आघाडीकडून शिवाजी कोण होता पुस्तकाचं सामूहिक वाचन

जालन्यात वंचित बहुजन आघाडीकडून शिवाजी कोण होता पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आलंय.जालना महानगरपालिकेतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आलं आहे.शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना तडीपार करा अशी मागणी यावेळी जालन्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिरपूर विमानतळ येथे आगमन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिरपूर विमानतळावर आगमन झाले, राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले, यावेळी वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा, राजेश पाडवी, शिरीष कुमार नाईक, अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील, आदी यावेळी उपस्थित होते.

चाकणमध्ये सराफा दुकानात आयरन कटरच्या साह्याने चोरी, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पिंपरी चिंचवड शहरातील चाकण परिसरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. तीन चोरट्यांनी आयरन कटरच्या साह्याने सराफां व्यापाऱ्याच्या दालनात चोरी केली आहे. 23 एप्रिलला रात्री 3 वाजून 24 मिनिटा दरम्यान खिमत ज्वेलर्स मध्ये ही चोरीची घटना घडली आहे. आता या प्रकरणात चोरी करणाऱ्या चोरट्यांना बेड्या ठोकण्याच मोठ आव्हान चाकण पोलिसांन समोर आहे.

हिमायतनगर रोडवर आयचर - दुचाकीचा अपघात , एक ठार , एक जखमी

नांदेड जिल्हयातील हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी मार्गावर आयकर आणि दुचाकीचा अपघात झाला.यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला , अन्य एक जण जखमी झाला.शासकीय धान्य घेउन आयचर ट्रक सिरंजनीकडे जात होता.समोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिली.यात 55 वर्षीय गणेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.अन्य एक जण जखमी झाला.जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अमरावतीच्या बडनेरा येथील रेल्वे पुलावर वाहतूक जाम 

अमरावतीच्या बडनेरा येथील रेल्वे पुलावर वाहतूक जाम...

गेल्या एक तासापासून वाहतूक जाम झाल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी...

ऐन उन्हाळ्याच्या दिवसात प्रावश्यांचे मोठे हाल...

बडनेरा शहरात एकही वाहतूक कर्मचारी उपलब्ध नसल्याने वाहचालकांचा रोष..

दहिसर राडा प्रकरणी अटक केलेल्या मनसेच्या ११ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

दहिसर राडा प्रकरणी अटक केलेल्या मनसेच्या ११ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

बोरिवली न्यायालयाचा मनसे कार्यकर्त्यांना दिलासा

प्रत्येकी ६ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

अटकेनंतर दाखल जामीन अर्जावर न्यायालयाचा निर्णय

दहिसरमधील गोंधळ प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांची सुटका होणार

न्यायालयाच्या निर्णयानंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबाऱ्यात माकडाची कापड दुकानात एन्ट्री

नंदुरबार जिल्ह्यातील खांडबाऱ्यात माकडाची कापड दुकानात एन्ट्री...

दुकानात माकडाने खरेदी न करताच घेतली माघारी...

माकडाचा एंट्री ने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची एकच धावपळ....

माकडाला बघून ग्राहकांची पळापळ.....

माकडाचा उच्छादाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद...

 pune : पुण्यातील मांजरीमध्ये सोसायटीतून चंदनाच्या झाडांची चोरी

मांजरीमध्ये सोसायटीतून चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे.

चोरटे सीसीटीव्हीत चंदनाची झाडे घेऊन जाताना कैद

पुणे सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका सहकारी गृह रचना सोसायटीतून आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास दोन चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे.

latur : मुरुडमध्ये रुग्ण घेऊन जाताना शासकीय ॲम्बुलन्समध्ये तांत्रिक बिघाड

लातूरच्या मुरुड येथे रुग्णाला घेऊन जाताना शासकीय ॲम्बुलन्स मध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे ॲम्बुलन्स रस्त्यातच बंद पडली. नागरिकांनी ॲम्बुलन्स ढकलून चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र ॲम्बुलन्स चालू होऊ शकली नाही. ॲम्बुलन्समध्ये गंभीर परिस्थितीत असणारा रुग्ण हा पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात येत होता. मात्र रस्त्यातच ॲम्बुलन्स बंद पडल्याने खासगी ॲम्बुलन्सने रुग्णाला हाणवण्यात आल्याची माहिती आहे..

hingoli : मराठवाड्यातील सगळ्यात मोठे हळद मार्केट बंद

मराठवाड्यातील सगळ्यात मोठे हळद मार्केट बंद करण्यात आलं आहे. व्यापाऱ्यांचा माल बाजार समितीत असल्याने बळीराजा वेटिंगवर आहे.

latur : लातूरमध्ये उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू, आतापर्यंत उष्माघाताने लातूर जिल्ह्यात दोन मृत्यू

लातूरच्या औसा तालुक्यातील गोंद्री गावात उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना समोर आली आहे, जिल्हा दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चाललाय, लातूरमध्ये दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या वेळेत ४० ते ४१ अंश सेल्सिअस वर तापमान गेले आहे, चार दिवसापूर्वी औराद शहाजनी येथे साठ वर्षे शेतकऱ्याचा उष्माघातानी मृत्यू झाला होता, तर आज औसा तालुक्यातल्या गोंद्री येथे नऊ महिन्याच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

badlapur : बदलापुरात रिक्षाचलकाचा नागरिकावर वार 

बदलापुरात रिक्षाचालकांनी केले इसमावर वार

रिक्षाचा धक्का लागल्याचा जाब विचारल्यानं वाद

बदलापूर पोलिसांकडून फक्त मारहाणीचा गुन्हा दाखल

संजय गायकवाड यांना समज दिली, त्यांनी माफीही मागितली - एकनाथ शिंदे 

संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे. त्यांनी माफी मागितली. चौडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधता प्रतिक्रिया दिली.

कोल्हापुरात गायकवाडांविरोधात अदखलपात्र दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा रद्द; कारण आलं समोर

मुख्यमंत्र्यांचा नाशिकमधील पुढील दौरा रद्द झाल्याची बातमी समोर आली आहे. कुंभमेळा बैठक, पुरोहित संघाची बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द करण्यात आला आहे.

दहिसर मराठी मुद्दा मनसे कार्यकर्ते अटक प्रकरण

दहिसरमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळ प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. अटक मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना बोरिवली कोर्टात हजर करण्यात आले. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी.

आमदार समाधान आवताडे यांच्याकडून पंढरपुरातील विविध विकास कामांची पाहणी

पंढरपूर शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी आज आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन केली. मागील नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या संत तुकाराम महाराज नामसंकीर्तन सभागृहाच्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.

फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णतः निराधार, बिनबुडाच्या आणि धादांत खोट्या आहेत. ज्या समाजमाध्यम हॅण्डलवरून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, त्यांनाही कायदेशीर नोटीस देऊन कारवाई जाईल.

- नवनाथ बन, मुख्य प्रवक्ता, महाराष्ट्र भाजपा

कल्याण शीळ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

कल्याण शीळ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. एक तासापासून वाहतूक कोंडी असल्याने वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे.

कल्याण डोंबिवलीत मनसेकडून रिक्षांवर मराठी स्टिकर मोहीम

मराठी भाषा आणि स्थानिक अस्मितेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत दिसत आहे. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते.माझ्या रिक्षात बसा अशा आशयाचे स्टिकर शहरातील रिक्षांवर लावण्याची मोहीम मनसे पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.

ठाण्यातील बाजारपेठ परिसरात मामलेदार मिसळची इमारत विकास कामांसाठी जमीनदोस्त

ठाण्यातील बाजारपेठ परिसरात असलेल्या मामलेदार मिसळ चि इमारत विकास कामांसाठी जमीनदोस्त करण्यात येत आहे. मागील 50 वर्षं हून अधिक काळ मामलेदार मिसळ चि चव ठाणेकर नागरिकांच्या रेंगाळत होती. या ठिकाणी आता इमारतीची पुनर्बांधणी होणार असल्यामुळे इमारत तोडण्यात येत आहे. पुढील सहा महिन्यात इमारत पूर्ण होणार आहे

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर, तापमानाचा पारा 43 अंशावर

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर

तापमानाचा पारा चक 43 अंश सेल्सिअसवर

वाढत्या तापमानाचा मानवी जनजीवनावर परिणाम

खबरदारी म्हणून जिल्हाभरात 18 ठिकाणी उष्माघाती पक्षाची स्थापना

तापमानाचा कहर पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचा आवाहन

बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक

बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता.? या पुस्तकाच्या प्रकाशकाला अश्लील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर राज्यभरात आ.संजय गायकवाड हे टिकेचे धनी होत आहेत.

मात्र बुलढाणा मतदारसंघातील मोताळा व बुलढाण्यातही आ. गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत आ. संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाला पोहचतील

मुंबई–बडोदा द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात

पालघर तालुक्यातील नावझे गावाजवळ मुंबई–बडोदा द्रुतगती महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे.

ऍनिमल पास पुलाखाली भरधाव डम्परची जोरदार धडक बसल्याने चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे, महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना अवघ्या दोन महिन्यांत झालेला हा दुसरा अपघात आहे.

त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सहा महिन्यापासून गोशाळा चालवणाऱ्या संस्थांना अनुदान नाही

गोशाळा चालवणाऱ्या संस्थांना शासनाकडून गेल्या सहा महिन्यापासून अनुदान नसल्याने गोशाळा चालवणाऱ्या संस्था अडचणीत.

शासनकडून महाराष्ट्र गोसेवा आयोगा मार्फत नोंदणीकृत गोशाळां मधील देशी गाईंच्या संगोपनासाठी प्रतिदिन प्रतीगोवंश 50 रुपये दिले जाते मात्र सहा महिन्या पासून अनुदान रखडल्यामुळे गोशाळा चालक अडचणीत सापडले

पुण्यात मध्यराञी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना

12.20 वाजता एफ.सी.रोड, हॉटेल रुपाली जवळील गल्ली येथे कपड्याचा साठा असलेल्या पञ्याचा शेडमध्ये आग

पहाटे 4 वाजता डेक्कन कॉर्नर, डेक्कन मॉलमधील आवारात हॉटेलपुढे ठेवलेल्या वस्तु व फॉल सिलिंगला आग.

सोलापूर-मुंबई विमान सेवा आठवड्यातून फक्त दोन दिवस

सोलापूर-मुंबई विमान सेवा आठवड्यातून फक्त दोन दिवस

१ मेपासून ही सेवा फक्त मंगळवार आणि गुरुवार या दोनच दिवशी उपलब्ध राहणार

हा बदल ३१ मेपर्यंत लागू राहणार

Pune: पुण्यात पाणीटंचाई,पाणी नसल्याने पुणेकर हैरान

पुण्यातील उपनगरात पुणेकरांचे हाल..

पाणी नसल्याने पुणेकर झाले हैराण

गेली तीन दिवसापासून पुण्यातील पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने नागरिकांची गैरसोय...

पुण्यातील मध्यवर्ती भागात तीन दिवसापासून पाणीपुरवठा विस्कळीत महिलांमध्ये नाराजी....

तीन दिवसापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे महिलांचे हाल...

गोखले नगर, वडारवाडी भागात पाण्याची मोठी टंचाई..

Hingoli: हिंगोली बाजार समिती बंद करण्याची प्रशासनावर वेळ

हिंगोली बाजार समिती बंद करण्याची प्रशासनावर वेळ

मराठवाड्यातील सर्वात मोठे हळद मार्केट पुढील पाच दिवस बंद

बाजार समितीमध्ये जागाच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना विक्रीला आणलेला परत घरी घेऊन जाण्याच्या सूचना

हिंगोली ची एपीएमसी सोयीसाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या मुळावर

Pune: वारजे परिसरात गोळीबार करणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात..

वारजे परिसरात गोळीबार करणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात..

गोळीबारासाठी वापरलेली पिस्टल देखील पोलिसांनी केली जप्त..

पूर्ववैमनस्त्यातून गोळीबार केल्या असल्याची पोलिसांची माहिती

गोळीबार करणाऱ्या सहा जणांपैकी प्रीतम ठोंबरे आणि साहिल राऊत दोघांना पोलिसांनी घटनास्थळावरून घेतले ताब्यात...

सहा आरोपींपैकी चार आरोपी अद्याप फरार...

Washim: उष्ण लहरींच्या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना

वाशिम जिल्ह्यात एल निनोच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. उष्ण लहरींचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पशुवैद्यकीय यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या निर्देशानुसार जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून,पशुपालकांनी जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई पालिकेच्या एफ नॉर्थ विभागातील अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

मुंबई पालिकेच्या एफ नॉर्थ विभागातील अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

नवी मुंबईनंतर आता मुंबई महानगर पालिकेतील अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई

विशाल भालचंद्र वाणी असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव

एफ नॉर्थ विभागात दुय्यम अभियंता म्हणून कार्यरत

बांधकाम साईटसाठी जल निष्कासन परवानगीसाठी १० लाखांची लाच मागणी

सापळा रचून एसीबीने कारवाई केली

Mumbai Police: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, २० वर्षांहून अधिक काळ फरार असलेले १८ आरोपी जेरबंद

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई पोलिसांची विशेष मोहीम; १ जानेवारी ते ३१ मार्च २०२६ दरम्यान कारवाई

३६७ वॉन्टेड/फरार आरोपींना अटक

सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले

२० वर्षांहून अधिक काळ फरार असलेले १८ आरोपी जेरबंद

Raigad: वेल्ह्यात वीज कोसळून दोन जनावरांचा मृत्यू

राजगड तालुक्यातील किल्ले तोरणा गडाच्या परिसरात तसेच पानशेत धरण खोर्‍यात शुक्रवार सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी पावसाने थैमान घातले. वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट झाली. तोरणा गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे गावात दोन जनावरांवर वीज कोसळून जनावरे दगावले असल्याचे माहिती स्थानिक नागरिकांनी माहिती दिली.

Vidarbha: विदर्भात उष्णतेची लाट,अकोल्यात सर्वाधिक 45 डिग्री तापमानाची नोंद

विदर्भात उष्णतेची लाट,अकोल्यात सर्वाधिक 45 डिग्री तापमानाची नोंद

विदर्भातील सर्व जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढलेली असून विदर्भातील सहा जिल्ह्यात 44 अंश किंवा त्याहून अधिक तापमानाची शुक्रवारी नोंद

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात 45 डिग्री एवढी करण्यात आली

त्या खालोखाल अमरावती 44.8, वर्धा 44.4, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मध्ये 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली

पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.

Washim: रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अडोळ प्रकल्पात केवळ 15 टक्के जलसाठा शिल्लक

वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अडोळ प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्याने घटत असून,प्रकल्पात केवळ 15 टक्के जलसाठा शिल्लक राहिलाय, या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या रिसोड शहरासह प्रकल्प शेजारील गावांनाही पाणीटंचाईचा फटका बसत आहे. सध्या आठ ते नऊ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असून उपलब्ध पाणी अत्यंत मर्यादित आहे. अजून दीड महिना उन्हाळा शिल्लक राहिलाय, त्यामुळं पुढील काळात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

गोदा ते नर्मदा जल यात्रा अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होणार

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ देखील जल यात्रेत होणार सहभागी

29 मे ला ही यात्रा मध्यप्रदेशातील महेश्वरला पोहचल्यानंतर होणार यात्रेचा समारोप

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल यात्रा त्र्यंबकेश्वर आणि चौंडी या दोन ठिकाणाहून निघणार

जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जन सहभागातून प्रभावी करण्याचा यात्रेचा उद्देश

Pune: पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची आजही शक्यता

गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवामानात मोठे बदल होत असून पुणेकरांना कधी रणरणते अंतर कधी पाऊस अशी दुहेरी वातावरणाचा सामना करावा लागत आहे शुक्रवारी शहराचा पारा 40°c वर पोहोचल्याने उघड्यात वाढ झाली होती मात्र सायंकाळी पावसाच्या हलक्या श्रेणी हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला दरम्यान आज शहरात मेक गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे त्यामुळे शहराला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरातवर ८ कोटी ७६ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दखल

भोंदू अशोक खरातवर ८ कोटी ७६ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दखल

सीए ललित पोफळे यांच्याकडून मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्याने पैसे उकळले

आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतारपूजेचा बनाव

सरकारवाडा पोलिस ठाण्यात उशिरा रात्री गुन्हा दाखल

पोफळे हे खरातच्या ट्रस्टचे विश्वस्त, खरातच्या आर्थिक व्यवहारांची त्यांच्याकडे माहिती

प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारांचे मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता

Pune: पुण्यात अघोषित पाणी बाणी....

शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार असताना पुणेकरांनी अघोषित पाणी कपातीची रंगीत तालीम अनुभवली गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद होता पण शुक्रवारी हा पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित असताना देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत न संपल्याने पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आज पाणी येईल याबरोबर बसलेल्या नागरिकांना दिवसभर पाणी मिळाले नाही अनेकांच्या घरात तर सकाळचे विधी रोखण्यासाठी देखील पाणी नव्हतं पिण्यासाठी जार विकत घेण्याची नामस्की पुणेकरांवर ओढवली या पाणीबाणी सदृश्य स्थितीचे पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही पडसाद उमटले.

Pune: विश्रांतवाडी येथे पुणे पॅंथर सेनेकडून Donald Trump यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

विश्रांतवाडी परिसरात पुणे पॅंथर सेनाच्या वतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी भारताबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी भारताचा उल्लेख “Hell-holes” (नरक) असा करत केलेली टिप्पणी ही अत्यंत अपमानास्पद व वर्णद्वेषी असल्याची भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “भारत देश हा आम्हाला अत्यंत प्रिय असून अशा प्रकारच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे सांगत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत भारत देशाचा जयजयकार केला.

Pune: पुण्याच्या स्वारगेट चौकात उघड्या सळ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा थरार कॅमेऱ्यात कैद.

पुण्यात पुन्हा एकदा वाहतूक नियमांचे धिंडवडे उडाले आहेत. स्वारगेट सारख्या वर्दळीच्या चौकात रात्रीच्या सुमारास एका ट्रकने (MH 04 EJ 9276) सर्व नियम धाब्यावर बसवून लोखंडी गजांची वाहतूक केली.ट्रकच्या बाहेर ४ ते ५ फूट लांब लोखंडी सळ्या बाहेर आलेल्या होत्या.रात्रीच्या अंधारात या सळ्या दुचाकीस्वारांना दिसणे अशक्य होते, ज्यामुळे मोठा अपघात होऊ शकला असता.'स्टॉप सिग्नल' लिहिलेल्या ट्रकवरच वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.

पुणेकरांनी विचारला सवाल- "प्रशासनाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का?" स्वारगेट पोलिसांना आता या 'चालत्या फिरत्या मृत्यू'वर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com