

1 मे पासून महाराष्ट्रात रिक्षाचालका साठी मराठी भाषा अनिवार्य चा निर्णय झाल्या नंतर आता नालासोपा-यात मनसे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.
ओडिशा मध्ये जनगणनेच्या कामात गुंतलेल्या दोन शालेय शिक्षकांचा दोन दिवसात भीषण उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर पुण्यातील शिक्षण संघटनांनी सुद्धा शिक्षकांच्या प्रति भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा अशैक्षणिक कामांचा मोठा डोंगर असल्यामुळे शिक्षक मानसिक तणावाखाली काम करत आहेत. प्रचंड उन्हामध्ये शिक्षकांना जनगणना याची काम देणं वगळले पाहिजे अशी मागणी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर यांनी केली आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात संध्याकाळ च्या सुमारास अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या काढणी करून विक्रीसाठी शेतात साठवून ठेवलेला कांदा पावसामुळे भिजला आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात उकाडा वाढला असतानाच दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम तुमरकोठी गावात अखेर वीज पोहोचली आहे… पोलीस दलाच्या प्रयत्नातून ही महत्त्वाची कामगिरी पार पडली आहे. अहेरी उपविभागातील या गावात 27 एप्रिलपासून वीज सेवा सुरू झाली आहे. दुर्गम परिस्थितीवर मात करत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. वीज आल्यामुळे गावात प्रकाश, पाणी आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यावेळी नागरिकांना बल्ब आणि साहित्याचं मोफत वाटपही करण्यात आलं.
- बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांची रेशीमबाग येथे रामकथा सुरू आहे
- याच रेशीमबाग परिसरात सकल मराठा समाजातर्फे धिरेंद्र शास्त्री विरोधात घोषणाबाजी करण्यात आली
- धिरेंद्र शास्त्री यांनी नागपुरातून परत जावे, सकल मराठा समाजाची मागणी
- हातात काळे झेंडे आणि काळी रिबन लावून निषेध आंदोलन करण्यात आलं
हिंगोलीच्या कळमनुरी शहरात पत्रकाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सौरभ साकळे असे या 35 वर्षीय पत्रकाराचे नाव असून सौरभ साकळे यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सौरभ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केला आहे पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत, मनमिळावृतीचा स्वभाव असलेल्या पत्रकार सौरभ साकळे यांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली होती
गडगेकडील हार्डडिस्कमध्ये पोलिसांना सापडले तब्बल 700 व्हिडिओ...
वडगावपान येथील आश्रम आणि गोडाऊनमधून 99 प्रकाराच्या औषधांचे सॅम्पल जप्त...
निर्मळ आणि गुजर नामक व्यक्तींनी औषधं पुरवल्याचा गडगे याचा पोलिसांना जबाब...
प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे, अधिक तपास गरजेचा...
आरोपी शिवाय तपास केला जाऊ शकत नाही...
पोलिस आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने केला मान्य...
भोंदू गडगे याला दोन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी...
गो वंशाच्या संरक्षणासाठी आज लातूरमध्ये गोवंश घेऊन, रॅली काढण्यात आली, लातूरच्या हनुमान चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली, यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते, गोवंशाच्या संरक्षणासाठी आणि गोमातेला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा यासाठी तहसीलदारांना कार्यकर्त्यांनी निवेदन ही दिल आहे. तर दिवसेंदिवस गोहत्या वाढत चालली, त्यामुळे गोवंशाचे संरक्षण करा असा संदेश देखील यावेळी देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर महाराजबाबत भंडाऱ्यात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेस कमिटीच्या वतीनं बुधवारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. बागेश्वरी महाराजांच्या बॅनरला जोडेमारो आंदोलन करीत त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची हजेरी...
उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा...
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 38 ते 40 अंशावर...
पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा...
अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यात बरसल्या पावसाच्या सरी...
करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदू मनोहर भोसले याचा आश्रम पोलिसांनी सील केला आहे. २७ एकरांवरील विनापरवाना बांधकामांबाबत कारवाईची मागणी सरपंच विलास राऊत यांनी केली होती. पाझर तलावाच्या वादावेळी भोसलेने राजकीय दबाव टाकल्याचा आरोपही राऊत यांनी केला. आश्रमात ये-जा पूर्णपणे बंद करण्यात आली असून परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नाशिकमधील टीसीएस प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. आरोपी निदा खानच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून नाशिकरोड न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या अर्जावर आता २ मे रोजी निर्णय दिला जाणार आहे. गरोदरपणाचे कारण देत निदा खानने जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायमूर्ती के. जी. जोशी यांच्या समोर सुनावणी झाली. बचाव पक्षाकडून राहुल कासलीवाल तर सरकारतर्फे अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. SIT प्रमुख संदीप मिटकेही उपस्थित होते.
जालना जिल्ह्यात उष्णतेचा कडाका, तापमानाचा पार 42.10 अंशावर
उन्हामुळे रस्त्यावर शुकशुकाट, मोसंबीच्या रसाची मागणी वाढली...
आज आणि उद्या जालना जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट , नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचा आवाहन...
जालन्यात कोट्यावधी रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख उपअधीक्षकांसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली 11 एकर पैकी 5 एकर जमीन हडपण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
कल्याण रामदास वाडी परिसरात गणेश मंदिरातील दानपेटीवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याचे समोर आले आहे.
ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
सलग पाच ते सहा दिवसांपासून धुळे जिल्ह्यामध्ये तापमानाचा कहर सुरूच
आज देखील धुळे जिल्ह्यामध्ये 45.1°© उचांकी तापमानाची करण्यात आली नोंद
तापमान वाढीच्या झळा सोसावा लागत आहे धुळेकर नागरिकांना
दुपारच्या वेळी नेहमी गजबजणारे रस्ते पडले ओस
पुणे जिल्हा परिषदेच्या गोरे बुद्रुक शाळेच्या शिक्षकाची बदली रद्द करा या मागणीसाठी आंदोलन
विद्यार्थी थेट जिल्हा परिषद इमारतीत आंदोलन करत आहेत
रजनीकांत मेंढे असे बदली झालेल्या शिक्षकाचे नाव
दहावीचा निकाल १० ते १५ मे दरम्यान लागण्याची शक्यता
महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची निकाल प्रक्रिया अंतिम टप्प्यात
शिक्षण बोर्डाकडून थोड्याच दिवसात निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली जाणार
mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पहाता येणार निकाल
राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांचा आज पासून बेमुदत बंद सुरू झाला आहे. लातूर जिल्ह्यातील जवळपास 1हजार 450 कृषी सेवा केंद्र चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतलाय. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी हेळसांड होणार आहे. दरम्यान खत आणि, बियाणे विक्री संदर्भातील नियम, तसेच एचटीबीटी बियाणे विक्री, आणि कृषी सेवा केंद्रांना घालून दिलेल्या जाचक अटीच्या विरोधात राज्यातील 85 हजार कृषी सेवा केंद्र चालक त्यांचा आजपासून बेमुदतबंद असणार आहे.
परिवहन मंत्री व स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या काही माणसांनी स्थानिक नागरिकांना मारहाण केल्याची व्हिडिओ सोशल मुद्यावर पोस्ट करत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी केली आहे. व्हिडिओमधे काही लोकांनी चेहऱ्याला रुमाल बांधून मनसे आणि महिला हे स्थानिकांना बांबूच्या साहाय्याने मारहाण करताना दिसून येत आहेत. काही वेळातच मेहता हे घटनास्थळी पोहचत असून नागरिकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर कासारवडवली पोलिस स्थानकाकात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक उच्चांकी तापमान म्हणून नोंदविले गेले असून दशकातील काही उच्चांकी तापमानाच्या नोंदीमध्ये नोंद करण्यात आले आहे. 46 अंशावर पारा पोचला तापमानाची ही लाट हिट वेव्ह 30 एप्रिल पर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
वाशिमच्या मालेगाव शहरात पतीनेच पत्नीची भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्यानं सकाळच्या सुमारास मालेगाव शहर हादरले..पुष्पा विठ्ठल वाघ असे मृतक महिलेचे नाव असून, मालेगावच्या पोस्ट ऑफिस समोरील परिसरात घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम.
नांदेड जिल्ह्यात आज 42 अंश सेल्सिअस डिग्री तापमानाची नोंद.
काल 43 डिग्री सेल्सिअस तापमानाची झाली होती नोंद.
येत्या तीन मे पर्यंत उष्णतेच्या लाट कायम राहण्याचा वेधशाळेचा अंदाज
संगमनेर तालुक्यातील भोंदू राजेंद्र गडगेची चार दिवसाची कोठडी आज संपणार असून त्याला आज पुन्हा संगमनेर कोर्टात हजर केलं जाणार आहे. मंत्र तंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू नऊ दिवसापासून पोलीस कोठडीत आहे. संगमनेर पोलीसांनी वेगाने तपास करत त्याचा दरबार आणि घरातून अनेक महत्वपूर्ण पुरावे ताब्यात घेतले आहे.. या भोंदूने लोकांची फसवणूक करून कोट्यावधी रूपयांची माया जमा केल्याचंही समोर आलं आहे.
- अशोक खरातला २९ तारीखपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली
- महिला अत्याचाराच्या सातव्या गुन्ह्यात खरातला तीन दिवसांची पोलीस कोठडी
बागेश्वर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा उदगीरमध्ये निषेध करण्यात आलाय. उदगीरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बागेश्वर महाराजांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानकारक विधानामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बागेश्वर महाराजांचा तीव्र निषेध केलाय.
त्तेत आलनंतर आम्ही पिंपरी चिंचवड करांना दर दिवशी 24 तास पाणी पुरवठा करू अस आश्वासन भारतीय जनता पक्षाने 2017 आणि 2026 च्या निवडणुकीत दिलं होतं.
मात्र सत्तेत येऊन जवळपास शंभर दिवस झाल्यानंतरही पिंपरी चिंचवडकरांना दिवसाआड तोही अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातही तहान भागवण्यासाठ पिंपरी चिंचवडकरांना आता टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ ओढवली आहे.
- नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडली लिफ्ट
- मेडिकल कॉलेजमधील महिला कर्मचारी गंभीर जखमी, जखमी महिलेवर उपचार सुरू
- गंभीर घटनेत ज्योती अहिरे नामक महिला कर्मचारी गंभीर जखमी
आपच्या 7 खासदारांना दिलासा
भाजप प्रवेशाला राज्यसभा सचिवालयाची मंजुरी
राज्यसभेत भाजप खासदारांची संख्या आता 113 वर
पुण्यात ड्रग्ज विरोधी कारवाई जोरात
अवघ्या २० दिवसात पकडले राज्य आणि परराज्यातून १९ आरोपी घेतले ताब्यात
१३ गुन्हे दाखल करत ५८ लाखाचा मुद्देमाल केला जप्त
तब्बल २८९ ग्रॅम एमडी,४२२ ग्रॅम गांजा,२६० पावडर केले जप्त
कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या बियाणे,रासायनिक खते व किटकनाशक औषधे विक्री व्यवसायातील कृषिकेंद्र चालकांनी लिंकींग विरोधात बेमुदत संप पुकारला आहे.
मागील 4 ते 5 वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही मात्र कुठलाच तोडगा न निघाल्याने आज पासून यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार 250 कृषी केंद्र चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात कोकण दर्शन करून मुंबईत परतणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर बसचा रविवारी रात्री अपघात झाला.
मुंबईच्या दिशेने जाणारी ही टेम्पो ट्रॅव्हलर बस भोस्ते घाट उतरत असताना तिचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे बसने समोर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हुंडाई एक्स्टर कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात कार महामार्गालगतच्या खड्ड्यात जाण्यापासून थोडक्यात बचावली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तसेच कशेडी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही केली.
वर्धा जिल्ह्याच्या तापमानाचा पारा पुन्हा वाढलाय. तापमानाचा पारा हा 46.4 अंशावर पोहचला असून आज तापमान आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे.
रविवारी जिल्ह्याचे तापमान 46.4 अंशावर होते हा तापमान तीस वर्षानंतर पुन्हा उच्चाक गाठलं आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकताना दिसून येत आहे.एप्रिल महिन्यात तापमानांचे उच्चांक होत आहे काल अमरावतीचे तापमान 46.8 नोंदवण्यात आल्याने वर्षातला सर्वात हॉट दिवस ठरला आहे, तर राज्यात अकोला आणि अमरावती या दोन्ही जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद सुद्धा झाली आहे.तर हा उष्णतेचा पारा 47 अंश डिग्री सेल्सिअस वर जाईल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे.
महाराष्ट्र मध्ये आज पासून कृषी केंद्र चालकांनी सरकारच्या विरोधात आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आजपासून बेमुदत संप पुकारला, त्यामुळे खरिपाच्या हंगामाची तयारी करणाऱ्या बळीराजासाठी हा संप मोठा अडचणीचा ठरला आहे, माफदा अर्थात महाराष्ट्र फर्टीलायझर सीड्स डीलर्स असोसिएशन या संघटनेने या बंदची हाक दिली आहे, या संघटनेच्या संपाला देशातील फर्टीलायझर असोसिएशनने देखील एक दिवसाचा पाठिंबा दिला आहे, दररोज सकाळी उघडणारी खताची औषधाची दुकाने बंद झाल्याने पहिल्याच दिवशी हिंगोली मध्ये मात्र शेतकऱ्यांना औषधे खरेदी न करताच रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे.
संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर..
चार दिवसाची पोलीस कोठडी आज संपणार...
भोंदू गडगे 9 दिवसांपासून पोलिस कोठडीत...
मंत्र तत्राने कॅन्सर तसेच दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू गडगे झालाय गजाआड..
अंनिसच्या तक्रारीनंतर भोंदू गडगे गजाआड...
आज पुन्हा गडगेला न्यायालयात करणार हजर...
पोलीस आज आणखी वाढीव कोठडी मागणार...
संगमनेर जिल्हा सत्र न्यायालय पोलीस कोठडी देणार, की न्यायालयीन? याकडे लक्ष...
तर गडगेचा बॉस डॉ.मोहन पुरी, मुलगी ज्ञानेश्वरी गडगे आणि सुरज शिंदे हे तिघे आरोपी अद्यापही फरार..
मुंबईतील मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात
दोन दुचाकींचा अपघात
तिघांटा जागीच मृत्यू
नीटचा अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
विद्यार्थ्यांना ऑनलाइन हॉल तिकीट मिळायल होणार सुरुवात
२७ तारखेपासून १० वाजल्या पासून ऑनलाइन मिळणार हॉल तिकीट
जवळपास २२ लाख विद्यार्थ्यांनी केली आहे परीक्षेसाठी नोंदणी
एनटीए ने दिली माहिती
जालन्यात दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.भोकरदन तालुक्यातील नळणी-राजूर मार्गावर हा काल रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नळणी येथील सुभाष साठे, विकास साठे यांचा मृत्यू झाला आहे तर बरंजळा साबळे येथील अनिल बोराडे या तरुणाचा मृत्यू झाला असून समाधान कोरके हा तरुण गंभीर जखमी झाला आहे ..
वाशिममध्ये सध्या उन्हाचा तीव्र प्रकोप जाणवत असून वाशिम जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे,काल रविवारी तापमानाने विक्रमी 44.6 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. दुपारी १ वाजल्यानंतर तापमानात आणखी वाढ होत असून या काळात रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या कमी होत आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
राज्यातील रुग्णालयात पुन्हा आरोग्य समित्या स्थापन करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यात रुग्ण कल्याण समिती जन आरोग्य समिती महिला आरोग्य समिती ग्राम आरोग्य पोषण या आरोग्य समिती असतात
या समितीमधील लोकप्रतिनिधीचा आणि एनजीओच्या सदस्याचा सहभाग असणार आहे
राज्यातील आरोग्य सेवा प्रभावीपणे दिल्या जातात का नाही यातील त्रुटी प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा काम या समित्या करत असतात.
राज्यातील आरोग्य समित्या पुन्हा सक्रिय करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिले आहेत
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुधारण्यासाठी महापालिकेच्या ७०० कोटींची केंद्राकडे मागणी
महापौरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट
रस्ते, उड्डाणपूल व महामार्ग रुंदीकरणासाठी निधीची गरज
गडकरींकडून सकारात्मक संकेत, प्राधान्य कामांची यादी घेऊन दिल्लीत येण्याचे निमंत्रण
द्वारका सर्कल ते दत्त मंदिर रस्ता रुंदीकरण प्रकल्प रखडला
कुंभमेळ्यापूर्वी पायाभूत सुविधा उभारणीसाठी महापालिकेची धडपड
रविवारी वर्षभरातील सर्वाधिक तापमानाची नोंद लोहगाव कोरेगाव पार्क तापमान 43 अंशावर
तापमान 43 अंशावर गेल्याने यावर्षीच्या सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे
या अगोदर चार वेळा तापमान 43 अंशावर गेल्याची नोंद हवामान विभागाकडे आहे
30 एप्रिल 1897 रोजी 44.4 अंशाचा सर्वाधिक तापमानाचाविक्रम मात्र आणखी कायम आहे
हवामान विभागाने शहराला उष्णेतेचा येल्लो अलर्ट दिला आहे तर पाऊस संपल्याने तापमान आणखी वाढण्याची शक्यता
बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या जिगाव प्रकल्पाच्या पीव्हीसी पाईप साठवणूक केंद्राला भीषण आग.
आगीत साठवून ठेवलेले कोट्यावधी रुपयाचे पीव्हीसी पाईप जळून खाक.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी बंदिस्त पाईप लाईनद्वारे शेतीसाठी पाणी देण्यासाठी टाकण्यात येणार होती पाईपलाईन.
जलंब ते माटरगाव दरम्यान असलेल्या तात्पुरत्या साठवणूक केंद्रात पीव्हीसी पाईपांना ही आग लागली.
आगीच कारण अस्पष्ट. खामगाव आणि शेगाव अग्निशमन दलाकडून आदीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.
नाशिक शहरात उष्णतेचा कहर, तापमान ४१.४ अंशांवर
यंदाच्या हंगामातील उच्चांक, उष्णतेची तीव्र लाट कायम
दुपारच्या वेळेत रस्ते ओस, गरज असेल तरच नागरिकांनी बाहेर पडण्याचं आवाहन
सलग १०-१२ दिवसांपासून तापमान ३९ अंशांच्या पुढे
किमान तापमानही वाढले, रात्रीही उकाडा कायम
पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज
भोंदू अशोक खरात सातव्या गुन्ह्यात अटकेत, ४० दिवसांपासून तुरुंगात
सहाव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, लगेचच एसआयटीकडून नव्या गुन्ह्यात ताबा
खरात विरोधात आतापर्यंत नाशिकमध्ये १२ गुन्हे दाखल, १४ वेळा न्यायालयात हजेरी
पीडितांना गुंगीकारक पदार्थ दिल्याचा आरोप, खरात तपासात सहकार्य नाही
स्मृतिभ्रंशाचे नाटक करत असल्याचा सरकारी पक्षाचा दावा
आज पुन्हा न्यायालयात सुनावणी, खरातला व्हीसीद्वारे हजर करणार
TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी
नाशिकरोड न्यायालयात सुनावणी पार पडणार
गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार, मुंब्र्यामध्ये एसआयटीच्या धाडीपूर्वीच निदा खान निसटली
गर्भवती असल्याचे कारण देत निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज
पहिल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद, आज सरकारी पक्ष मांडणार बाजू
धार्मिक भावना दुखावणे आणि विशिष्ट धर्माचे ट्रेनिंग दिल्याचा निदा खानवर गंभीर आरोप
नाशिक विमानतळावरील प्रवासीसंख्येत २४ टक्क्यांची मोठी वाढ
२०२५-२६ मध्ये ४.२१ लाख प्रवाशांनी केला हवाई प्रवास
तर कार्गो निर्यातीत तिप्पट वाढ, ४७० टनांपर्यंत झेप
मार्च महिन्यातच ४० हजारांहून अधिक प्रवाशांची हवाई प्रवासाची नोंद
नाशिक विमानतळावरून दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, गोवा, हैदराबादसाठी सेवा उपलब्ध
आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याच्या मागणीला जोर
दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या एका महिला पोलीस अंमलदारालाच सासरच्या जाचाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला अंमलदार यांनी आपल्या सासू, पतीसह सासरच्या 6 जणांविरुद्ध छळ आणि मारहाणीची तक्रार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे
शहरात सध्या पाणीटंचाई सहन करावी लागत असताना, बी. टी. कवडे रस्ता परिसरात मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेल्याची घटना आज सकाळी घडली. या वाहिनीतून गळती होत असल्याची पाणीपुरवठा विभागाला माहिती देऊनही कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुर्घटना घडली आहे.
शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने विवाह सोहळ्याच आयोजन. उद्योगमंत्री उदय सामंत यांची विवाह सोहळ्याला हजेरी.
सामूहिक विवाह सोहळ्यात गरीब कुटुंबातील 29 जोडप्यांचा विवाह. अँकर:-शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
नांदेडच्या हदगाव येथे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं.
या विवाह सोहळ्याला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हजेरी लावली.या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात गरीब कुटुंबातील 29 जोडपी विवाह बंधनात अडकली.
दरम्यान आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी वधू-वरांना संसार उपयोगी साहित्यासह विवाह सोहळ्याचा संपूर्ण खर्च करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.