

एसटी बस नं दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना भंडारा येथील एसटी डेपोत घडली. या अपघातात दुचाकीवरील बापलेकेंचा घटनास्थळीचं मृत्यू झाला.
- आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज दोन भूमिपूजन मोहन भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले
- नॅशनल हेल्थ केयर इन्स्टिट्यूट आणि भारतदुर्गा मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले
- जिथे शरीराला आरोग्य मिळते त्याचे आणि जिथे मन आत्म्याला शांती मिळेल अश्या भारत दुर्गा मंदिराचे भूमिपूजन दोन्ही कार्यक्रम महत्वाचे
- भारतंदुर्गा मंदिराचा संकल्प मोहन भागवत यांनी केला
- आम्ही अष्टभुजा देवी बघतो पण इथे अठराभुजा भारत दुर्गा असेल जी भक्ती आणि शक्तीची देवी असेल आम्ही भागवत यांचा संकल्प पूर्ण करू
- गरिबांना सेवा कमी किमतीत प्रामाणिकपणे मिळावी यासाठी नॅशनल कॅन्सर रुग्णालय सुरू केलं त्याच प्रमाणे आज नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूट चे भूमिपूजन केले सामान्य नागरिकांसाठी कमी दरात असेल
- देशातील सर्वोत्तम मंदिर आणि सर्वोत्तम रुग्णालय देखील साधू संताच्या आशीर्वादाने तयार होईल
आम आदमी पक्षाच्या सात खासदारांनी पक्षाला राम राम करत भाजपाची वाट धरली आहे त्यावर समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे यांनी सांगितलं की. पक्ष आणी पार्टी टिकण्यासाठी कायदा होणे गरजेचे आहे की आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही सत्ता आणी पैसा यांच्या लालच मध्ये येताच इकडून तिकडे आणि तिकडून इकडे आणि त्यामुळे मनमर्जी प्रमाणे सत्ता बदल काम होतात. म्हणून लोकांनी निवडून देताना चारित्र्यशील लोकं निवडून दिलें पाहिजे हे जे चाललं आहे ते स्वर्थसाठी चालल आहे. सत्तेतून पैसा आणि पैश्यातुन सत्ता आज समाज आणि देश डोळ्यासमोर राहिला नाही
शिवाजी कोण होता? या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे... आज कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली.... शेकडो कार्यकर्त्यांसह रोहित पवार राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले. त्यानंतर तब्बल दीड तासांनी पोलिसांनी गुन्हा दाखल करतो असं आश्वासन दिले... त्याचवेळी राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या बाहेर डाव्या आघाडीतील कार्यकर्त्यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे जाहीर वाचन सुरू केलं.... आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी ती आम्हाला मान्य नाही... त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली... राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये तब्बल दीड तास हा सगळा राडा सुरू होता... संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही पोलीस ठाणे सोडणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.... त्यामुळे अखेर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याचा आश्वासन दिले....
मुंबई पुणे महामार्गावरील खंडाळा घाटात वाहनांच्या रांगात रांगा. आज बारा ते तीन च्या दरम्यान मिसिंग लिंग च्या तिथे मुंबई पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर फुलाला कलरिंग आणि शटरची काम चालू होते. त्याचा परिणाम सध्या मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे खंडाळा घाटात वाहतूक तिन्या गतीने सुरू आहे.
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील श्री संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालयात चार दिवसांपूर्वी शिक्षकांकडून एका निवासी मतिमंद विद्यार्थ्याला अमानुष मारहाण करण्यात आली होती. या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ साम टीव्ही ने लावून धरल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला.
पुण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यावेळी अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. पुण्यातील वारजे परिसरात पावसाळी वातावरणात अचानक वीज पडल्याचीही घटना घडलीये.
निकालापूर्वीच ‘विजय निश्चित’चा संदेश; पुणे मार्केट यार्डात सुनेत्रवाहिनींचे पोस्टर्स चर्चेत
मतमोजणीपूर्वीच विजयाचा दावा; मार्केट यार्ड परिसरात सुनेत्रवाहिनींचे बॅनर झळकले
राष्ट्रवादी काँग्रेसचे( शरद पवार गट) आमदार रोहित पवार कोल्हापूरला निघाले असता त्यांना भूक लागल्याने त्यांनी कराड मधील प्रसिद्ध गजानन रेस्टॉरंटमधील मिसळ पाववर ताव मारला. यावेळी कराड नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उन्हाच्या तीव्र झळांनंतर अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला… शिक्रापूर परिसरात काही ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली… तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे
धाराशिव जिल्हा परिषदेच्या लिफ्टमध्ये एक व्यक्ती अडकला आहे. लिफ्ट अचानक बंद पडल्याने एक व्यक्ती गेली दोन तासापासून लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते मानोरा मार्गावर मानोरा घाटात कार चा अपघात झालाय, कारवर कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत पडली.. रस्त्याच्या कडेला असलेले कठडे तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे कार थेट दरीत कोसळली.. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नसली तरी, या रस्त्याच्या कडेला असलेल्या कठडे व्यवस्थित असते तर कार खाली कोसळली नाती त्यामुळे कठड्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
नाशिकमधील TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची नियुक्ती करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी सरकारला पत्र पाठवले आहे. नाशिक पोलिसांकडून यासंदर्भात अधिकृत प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणात सरकारी वकील म्हणून किरण बेंडभर काम पाहत आहेत. अजय मिसर यांनी यापूर्वी अनेक महत्वाचे खटले यशस्वीरीत्या लढले आहेत.
एक नामांकित आणि अनुभवी वकील म्हणून मिसर यांची ओळख असल्याने त्यांच्या नियुक्तीकडे लक्ष लागले आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा ते मानोरा मार्गावर मानोरा घाटात कार चा अपघात झालाय, कारवर कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत पडली.. रस्त्याच्या कडेला असलेले कठडे तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे कार थेट दरीत कोसळली.. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नसली तरी, या रस्त्याच्या कडेला असलेल्या कठडे व्यवस्थित असते तर कार खाली कोसळली नाती त्यामुळे कठड्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे..
अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात दुपारी भीषण आग लागली.
दीड वाजताच्या सुमारास आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली.
दाट लोकवस्ती असल्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
माहिती मिळताच नगरपरिषद अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
फायर टीमच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर वेळेत नियंत्रण मिळवले.
कोणतीही जीवितहानी झाली नाही.. मोठी दुर्घटना टळली.. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झालेल्याच दिवशी उरणमधील चाणजे येथील २० गुंठे जमीन त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या नावावर झाल्याने संशय निर्माण झाला आहे. कल्पना खरात फरार असताना रजिस्ट्रेशन कसे झाले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सही कोणी केली, याचीही चौकशी मागितली जात आहे. काही दिवसांतच फेरफार झाल्याने व्यवहारावर संशय वाढला असून संबंधित अधिकारी आणि तहसीलदारांची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
सावंतवाडी शहराला मध्यरात्री झालेल्या वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला आहे. रात्री अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने मोती तलाव परिसरात मोठी दुर्घटना घडली. मोती तलाव काठावर असलेल्या रामेश्वर प्लाझा इमारतीची शेड अचानक कोसळून समोरच्या SPK कॉलेजच्या इमारतीवर पडली. या घटनेत कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहीती मिळताच आमदार दिपक केसरकर हे सावंतवाडीत दाखल होत त्यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे अशी माहीती दिपक केसरकर यांनी दिली.
शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक आंबी यांच्याशी खालच्या भाषेत संभाषण करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष देखील आक्रमक झालाय. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आमदार गायकवाड यांचा निषेध केलाय. लोकप्रतिनिधींच्या तोंडात ही भाषा शोभत नाही. मुख्यमंत्री आणि गृह विभागाने याची गंभीर दखल घेऊन आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेकापने केलीय.
नुकताच राज्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येण अनिवार्य केल्यानंतर राज्यभरामध्ये याचे पडसाद उमटताना दिसून येत आहे अशातच ठाण्यातील घोडबंदर वाहिनीवर पाटलीपाडा ब्रिजचे उतरणीवर रिक्षा क्रमांक MH04 KX 7139 याने विरुद्ध दिशेने रिक्षा चालवून वाहतुकीस अडथळा केल्याबाबत सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाला होता, चक्क परप्रांतीय रिक्षा चालकाची मजुरी इतकी की त्याला समजून देखील तो गाडी मागे घ्यायला तयार नव्हता? शेवटी मुजोर परप्रांतीय रिक्षा चालकांनी आपल्या प्रवाशांना खाली उतरवला आणि गाडी घेऊन पुन्हा मागे गेला.
सलग दोन दिवस अझहर पठाण नामक कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. यामध्ये पहिल्या रेकॉर्डिंग मध्ये तो वाल्मीक कराडच्या गॅंग कडून आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचे सांगत आहे. तर दुसऱ्या रेकॉर्डिंग मध्ये वाल्मीक कराड यांना बदनाम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, म्हणून मी तसं बोललो असं म्हणत आहे. यानंतर आता बीड कारागृहातच कैदी असलेल्या सनी आठवले याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्याने वाल्मीक कराडचा जेलमध्ये दबदबा आहे, तो अझहर पठाण वर दबाव आणत आहे, त्याला मारहाण झाली आहे, त्याचा खुबा उपसला आहे असे सांगत आहे. तर या संदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे अशी त्याने या कॉल रेकॉर्डिंग मधून मागणी केली आहे.
अशोक खरात प्रकरणात सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकर अटकेत
खरातशी संबंधित बनावट खात्यांद्वारे आर्थिक व्यवहार केल्याचा संशय
३२ संशयास्पद खात्यांचा तपास SIT कडून सुरू
सिन्नर पोलिसांची कारवाई, तपासाला नवे वळण
न्यायालयाकडून कांडेकरला एक दिवसाची पोलीस कोठडी
आर्थिक रॅकेटचे आणखी धागेदोरे उघड होण्याची शक्यता
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल शांततेत मतदान पार पडले.. आता ईव्हीएम मशीन हे राहुरी महाविद्यालयात बनवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेत.. 4 मे रोजी मतमोजणी याच परिसरात होणार आहे.. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिलीये..
सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातला ०३ दिवसांची पोलीस कोठडी
२६ एप्रिलपर्यंत अशोक खरातचा मुक्काम असणार पोलीस कोठडीत
सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातवर बलात्कार आणि विधीच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप
पाण्यात मिसळलेले गुंगीकारक औषध, खायला दिलेले पदार्थ आणि आर्थिक फसवणूकीबाबत तपास करण्यासाठी झाली होती पोलीस कोठडीची मागणी
तेच पेढे, तेच पाणी पुन्हा पुन्हा तोच तपास का? आरोपीला SIT समोर बसून ठेवण्यात आनंद मिळतो का? असा घेतला आक्षेप
विदर्भासाठी नागपूर वेध शाळेने परत एकदा उष्णतेच्या लाटेचा एलो अलर्ट जाहीर केला आहे.
पुढची चार दिवस अकोला, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यात तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या घरात राहणार असल्याचे नागपूर वेध शाळेने सांगितले आहे
त्यामुळे नागरिकांनी दुपारला घराबाहेर पडतांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे आज सकाळी साडे नऊच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या निधनानंतर दहाव्याच्या विधीसाठी स्वयंपाक सुरू असतानाच ही दुर्घटना घडली. या आगीत दोन घरे आणि घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्यात आला आहे.
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगच्या विरोधात साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील व्यक्तींकडून आज हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
साताऱ्यातील शिवतीर्थावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चात मोठ्या संख्येने शिवप्रेमी,संघटना उपस्थित होत्या.
छत्रपती घराण्यातील वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता
ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाने तारु उद्यान ही नवी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय. याचा पहिला प्रकल्प ताडोबाच्या भामडेळी गावात सुरू करण्यात आला.
ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्या संकल्पनेतून 'तारू उद्यान' ही संकल्पना समोर आली.
यात लहान मुलांना खेळण्याचे उद्यान व वृध्द व्यक्तींना चर्चा करण्याचे ठिकाण मिळेल. भामडेळी गावात ताडोबातील पहिले 'तारू उद्यान तयार करण्यात आले.
- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई
- मुंबई ते सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस मध्ये होणाऱ्या दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
- दरोडाच्या प्रयत्नात असणाऱ्या संशयित नऊ महिला आरोपींना पोलिसांकडून अटक
- बुधवारी कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर सीपीडीएस पथकाने केली कारवाई
- सदरची महिलांची टोळी सोलापूर व पुणे विभागात सक्रिय असल्याची शक्यता
- पुढील कारवाईसाठी आरोपींना लोहमार्ग पोलीस कुर्डूवाडी च्या ताब्यात देण्यात आल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहेत
कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस
छतावर अनधिकृत कबुतरखाना आणि अंमली पदार्थांचे सेवन,
रहिवाशांची पोलिसांत धाव
कबुतराची ढाबळ पोलिसांनी तोडली
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे कृषी विभागाने मोठी कारवाई करत एक लाखांहून अधिक किमतीचे अवैध एचटीबीटी बोगस कापूस बियाणे जप्त केले आहे.
गुजरातमधून बेकायदेशीररीत्या आणून विक्रीसाठी ठेवलेले हे बियाणे जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्यांची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बीडच्या आष्टी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे
आष्टी तालुक्यातील जामगाव ते हरिनारायण आष्टा या रस्त्यावर एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील बांधावरचे गवत पेटवून दिले होते.
या शेतापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाखाली एक कार उभी करण्यात आली होती त्या कारपर्यंत ही आग पोहचली.
परंतु त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने या कारलाही आग लागली.
आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला परंतु तोपर्यंत गाडीचे मोठे नुकसान झाले होते.
या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी विशेष मोहीम राबवत काळ्या काचा, फेन्सी नंबर प्लेट व कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेंसर असलेल्या वाहनांवर कारवाई केली.
गेल्या चार दिवसांपासून नाकाबंदी करून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यावेळी वाहनांवरील काळे फिल्म व फेन्सी नंबर प्लेट चालकांकडून काढून घेण्यात आले.
या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांमध्ये धाक निर्माण झाला असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.
कोंढवा बुद्रुक येथील अश्रफनगर परिसरातील गौतम बुद्ध सोसायटीमध्ये रात्री अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत अनेक चारचाकी वाहनांची केली तोडफोड
या घटनेत गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून काही वाहनांमधील महागडे टेप/साऊंड सिस्टीम चोरीस गेल्याच्या तक्रारी
ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी.सकाळी वाहनांची अवस्था पाहून रहिवाशांमध्ये भीती वातावरण.
पोलिसकडून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे
यवतमाळ -
मयुद्धजन्य परिस्थितीने आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय
तेलाच्या दरात वाढ झाल्याने सरकीची मागणी वाढलीये क्रुड ऑइल महागल्याने पाॅलस्टर 30 ते 35 टक्क्यांनी महागले
त्यामुळे रूईच्या गाठींची मागणी वाढलीये परिणामी कापसाचे दर आठ हजार सातशे रूपये क्विंटलवर पोहचले
असून यवतमाळच्या राळेगांवातील उच्चांकी दर मिळविण्यासाठी दोन हजार क्विंटलची आवक बाजारात झाली आहे.
पुणे -
पुण्यात भाजपच्या महिला मोर्चाचे आंदोलन
काँग्रेस पक्षाविरोधात भाजपकडून पुण्यात आंदोलन
महिला विधेयकाला विरोध केल्यानंतर भाजप महिला मोर्चा पुण्यात आक्रमक
काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलनाला सुरुवात
नंदुरबार -
जैन समाजाला कुठलंही आरक्षण नको जैन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ललीत गांधीनीची भूमिका
आम्हाला आर्थिक सक्षमता, शिक्षणाच्या सोई सुविधा मिळाव्या इतकीच आमची माफक अपेक्षा
मेरीटवरच विद्यार्थ्यांना शिक्षणात संधी मिळावी अशी जैन समाजाची भुमिका
आरक्षणासंदर्भात फक्त जैन समाजाची भूमिका आहे अल्पसंख्यांकाची भूमिका मांडण्याचा माझ्या अधिकार नाही
नाशिक -
- नाशिकच्या इंदिरानगर परिसरात भीषण अपघात
- नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर अपघात
- दारूच्या बाटल्यांनी भरलेली कार अपघातग्रस्त, अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
- गाडीत एवढ्या दारूच्या बाटल्या कोणाच्या आणि कशासाठी याचा शोध सुरू
- पोलिसांकडून गाडी मालकाचा तपास सुरू, स्थानिकांमध्ये खळबळ
नाशिक -
- नाशिकच्या सातपूरच्या जाधव संकुल परिसरात दिवसाढवळ्या चैन स्नॅचिंग
- सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुकानात शिरून महिलेची पोत लांबवली
- दुकानात वस्तू खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी दुकानदार महिलेची पोत चोरून केला पोबारा
- चेंज स्नॅचिंग करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर
वाशिम -
वाशिममध्ये शॉर्ट सर्किटमुळे विद्युत पोलवर आग
खाली साचलेल्या कचऱ्यालाही आग लागली
वाशिम शहरातील पालेश्वर मंदिरासमोर मध्यरात्री घडली घटना
पोलवर जळणाऱ्या केबलमधून ठिणग्या आणि आगीचे गोळे खाली पडत होते
या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते
नाशिक -
- शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती
- धुळे जिल्ह्याची जबाबदारी दादा भुसे यांच्याकडे
- आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीला वेग
- नाशिक जिल्ह्यातील १२ ग्रामीण विधानसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करणार
- ३० एप्रिलला उदय सामंत यांचा नाशिक दौरा, बैठकीची तयारी
- पक्षात फेरबदल आणि नवीन नियुक्त्यांची शक्यता
अमरावती -
27 एप्रिलपासून अमरावती जिल्ह्यातीलही कृषी विक्रेत्यांनी दिला बेमुदत बंदचा इशारा
खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली असतानाच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी येत्या 27 एप्रिलपासून बेमूदत बंदचा इशारा दिला आहे.
शासनाने या विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या अद्यापही पूर्ण न केल्याने राज्यस्तरीय बंदचे आवाहन महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टीसाइड, सीडस् डीलर्स असोसिएशनने केले असून त्यास अमरावती जिल्हा कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेने समर्थन देत सहभाग जाहीर केला आहे.
कंपन्यांकडून खतांचे लिंकिंग कृषिनिविष्ठा विक्रेत्यांवर करण्यात येत असून कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना होणारे कंपनीस्तरावरील लिंकिंग बंद करणे.
नाशिक -
- भोंदू अशोक खरात याला आज कोर्टात हजर करणार
- महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात काल अशोक खरातला सुनावण्यात आली होती न्यायालयीन कोठडी
- महिला अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात एसआयटीने पुन्हा घेतला अशोक खरातचा ताबा
- सहाव्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आज पुन्हा कोर्टाकडे पोलीस कोठडीची मागणी केली जाणार
नाशिक -
- अशोक खरातच्या जमीन व्यवहारावर गंभीर प्रश्न
- उरणमधील चाणजे येथे ५८.५० लाखांत जमीन खरेदी
- बाजारभाव ३ ते ४ कोटी असतानाही स्वस्तात व्यवहार
- अटकेच्या दिवशीच म्हणजेच १७ मार्चला व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध
- कोठडीत असतानाही महिनाभरात १३ एप्रिलला फेरफार नोंद झाली मंजूर
- प्रस्तावित तिसऱ्या मुंबईवर होता अशोक खरातचा डोळा
धाराशिव -
तुळजापुरातून धक्कादायक बातमी, पुरातत्व विभागाचे नियम डावलत तुळजाभवानी देवीची सहावी सिंहासन पूजा
तुळजाभवानी देवीची सहावी सिंहासन पूजा घालणाऱ्या पुजाऱ्याला पाच वर्ष मंदिर प्रवेश बंदी
सुरक्षा निरीक्षक,सुरक्षारक्षक असताना प्रकार,सुरक्षा कंपनीला एक लाखाचा दंड,लेखी खुलासा ही मागितला
ऑनलाइन बुकिंग नसताना अधिकारी कर्मचाऱ्यांना मॅनेज करत सहावी सिंहासन पूजा घातल्याचा संशय
पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार दररोज सकाळी होतात पाचच सिंहासन पूजा, तर सायंकाळी दोन सिंहासन पूजा
देवीच्या मूर्तीची झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या सूचनाचे केलं जातं पालन
धाराशिव -
धाराशिवच्या भूम शहरातील गोलाई चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांवरून निर्माण झालेला वाद अखेर सामंजस्याने मिटला
दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित,शहरातील तणावाचे वातावरण निवळले
शिवप्रेमी आणि भीम अनुयायांनी सकारात्मक चर्चेतून प्रश्न सोडवला
पुतळे हलविताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता
सिंधुदुर्ग -
सिंधुदुर्गातील सावंतवाडीत काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली
सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह सावंतवाडी शहरात आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळला
पावसाचा आणि वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की संपूर्ण सावंतवाडी शहराची बत्ती गुल झाली होती
तर अनेक ठीकाणी झाडे मोडून रस्त्यावर पडली.
ही झाडे रस्त्यावरून हटविण्यात आली असून नागरीकांची मात्र गैरसोय झाली होती
दरम्यान अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बुलडाणा -
बुलडाण्यात रेती माफीयांचा हैदोस
तहसीलदारावर तहसील कार्यालयात येऊन दालनात घुसून फिल्मी स्टाईल हल्ला.
नांदुरा तहसीलदार अजित जंगम यांच्यावर जीवघेना हल्ला, थोडक्यात बचावले.
जखमी तहसीलदार अजित जंगम यांच्यावर उपचार सुरु.
हल्लेखोरांचे बिना नंबरच्या क्रेटा गाडीतून फिल्मी स्टाईल पलायन.
नवी मुंबई -
सभागृह नेते सागर नाईक यांनी भर सभेत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना सुनावले खडेबोल
आयुक्तांनी जर प्रस्ताव शासनाकडे पाठवलाच नसता तर जे ६० वयोमर्यादा होती ती चालू राहिली असती,
फक्त आयुक्त ही सध्या महानगर पालिका नाही, आयुक्तांनी कुठल्या कुठल्या बाबतीत पत्रव्यवहार करायचं ते नमूद आहे -
अशा प्रकारे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचा अधिकार आयुक्त या संस्थेला नव्हता, तरी देखील आपण मंजुरीसाठी पाठवला.. - सभागृह नेते
शासनाने सेवानिवृतीचा ठराव नामंजूर नाही, तर निलंबित केल आहे - सागर नाईक
सेवानिवृत्ती ठरावा वरून नवी मुंबई पालिकेच्या महासभेत सत्ताधारी व पालिका आयुक्त आमने सामने पाहायला मिळाले
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.