Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: विदर्भासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट, विधान परिषदेच्या निवडणुका, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण, राज्यातील राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update :
Maharashtra Live News Update :Saam Marathi

Amravati: अमरावतीत भाजप आघाडीचा शिक्षक मेळावा

भाजप शिक्षक आघाडी आणि शिक्षक महासंघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांच्या वतीने अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिक्षक मेळावा सत्कार समारोह आणि अनाथ विद्यार्थ्यांना सायकल भेट समारोह पार पडला, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला, यावेळी अनाथ विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी सायकल भेट देण्यात आल्या, यावेळी शिक्षकांच्या विविध मागण्या आयोजक चंद्रशेखर भोयर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडल्या..... तर विरंगुळा म्हणून हास्य कलाकार सुनील पाल यांनी शिक्षकांना हसवून सोडलं

Ratnagiri: रत्नागिरीत उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांवर परिणाम..

उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांवर परिणाम..

जलाशयांमधील पाण्याची बाष्पीभवनाने होतेय वाफ..

जिल्ह्यातील 46 लघु प्रकल्पांमध्ये सध्या 36.94 टक्के पाणीसाठा..

गेल्यावर्षी याच कालावधीपर्यंत या लघु प्रकल्पांमध्ये 41.52 टक्के इतका होता उपयुक्त पाण्याचा साठा होता.

तर 3 मध्यम प्रकल्पांमध्ये 37 टक्के पाणीसाठा..

शीळ धरणामध्ये 41.47% पाणीसाठा

वाढत्या तापमानामुळे जलाशयांच्या पृष्ठभागावरून पाण्याचं बाष्पीभवन होण्याचं प्रमाण वाढलं

अनेक ठिकाणी दररोज जेवढा पाण्याचा उपसा शहर किंवा ग्रामीण भागासाठी केला जातो, जवळपास तेवढंच पाणी वाफेच्या स्वरूपात उडून जात आहे

वाढतं तापमान पाहता अधिक घट होण्याची शक्यता

Amravati: अमरावतीच्या परतवाडा मधील तरुणींचे लैंगिक शोषण प्रकरणी अपडेट

अमरावतीच्या परतवाडा मधील तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा प्रकरण...

आरोपी अयान अहमदला केलेल्या कृत्याचा पश्चातापही नाही; केलेल्या कृत्याची त्याने अजूनही खंत बोलून दाखवली नाही.. पोलीस चौकशीत माहिती उघड..

आरोपी अयान एसआयटी चौकशीत सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती...

मुलींसोबत संवाद कसा साधायचा, त्यांना जाळ्यात कसं ओढायचं याची कबुली पोलिसांना त्यांने दिली आहे...

स्वतःच्या बचावासाठी अमरावतीच्या फ्लॅटवर जे कृत्य झालं ते दोघांच्याही संमतीने झाल्याचा केविलवाणा दावा आरोपी अयांन ने केला आहे..

मात्र पंधरा वर्षाची एक पिडीत समोर आल्याने त्याच्या दाव्याची पोल खोल झाली आहे..

TCS प्रकरणातील दोन आरोपींना आज कोर्टात हजर करणार

TCS प्रकरणातील दोघा आरोपींना आज कोर्टात हजर करणार

शफी शेख आणि रझा मेमनला आज कोर्टात हजर करणार

दोघा आरोपींची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार

दोघांवर धार्मिक भावना दुखावणे, छळाचे गंभीर आरोप, विनयभंग प्रकरणातही दाखल आहेत गुन्हे

SIT सह ATS कडून देखील दोघांची चौकशी

आज दोघा आरोपींना पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी? यावर पुढील तपासाची दिशा ठरणार

Nashik: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

नाशिकरोड न्यायालयात होणार अटकपूर्व जामिनावर सुनावणी

गरोदर असल्याचं कारण देत निदा खानचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

TCS प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान फरार

TCS प्रकरणात आरोपींना मदत केल्याचा आणि पीडित महिला कर्मचाऱ्यांना विशिष्ट धर्माचं आचरण, राहणीमान आणि अन्य बाबींचं ट्रेनिंग दिल्याचा निदा खानवर आरोप

गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांचं पथक निदा खानच्या मागावर

मात्र फरार निदा खानचा ठावठिकाणा पोलिसांना मिळेना

आज निदा खानच्या अटकपूर्व जामिन अर्जावर काय निर्णय होतो? यावर तपासाची पुढील दिशा ठरणार

Nashik: TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी तपासात धक्कादायक बाबी समोर

TCS कंपनीतील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरण

तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती

कॅन्सरग्रस्त पित्याच्या उपचारासाठी पीडित तरुणीने सोसला कॉर्पोरेट जिहाद, सूत्रांची माहिती

कॅन्सरग्रस्त वडिलांच्या किमोथेरेपीसाठी औषधं आणि पैशांची गरज असल्यानं पीडिता मानसिक छळ आणि अपमान सहन करत राहिली, सूत्रांची माहिती

तर दुसऱ्या पीडितेवर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं नोकरीच्या नावाखाली धर्मांतराच्या छुप्या अजेंड्याला बळी पडल्याची सूत्रांची माहिती

आजारपणामुळे वडील अंथरुणाला खिळलेले, घरात अन्नाचा कण नाही, कुटुंबाच्या पोटाच्या भुकेसाठी पीडितीने सर्व सहन केले, सूत्रांची माहिती

राष्ट्रीय महिला आयोगाने देखील जाणून घेतली पीडितांची आपबिती

काल TCS कंपनीत जाऊन देखील पथकाने तब्बल दीड तास केली चौकशी

 Washim: वाशिममध्ये उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअस वर

वाशिम जिल्ह्यात सूर्य मागील आठ दिवसांपासून आग ओकतोय..उन्हाचा पारा 44 अंश सेल्सिअस वर पोहोचलाय..त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत आज पासून जिल्ह्यातील सर्व शाळांची वेळ बदलण्यात आली असून, शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने वाढत असल्यामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला होता.विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळा बसू नयेत आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे....

Pune: पुण्यातील खेळाडूसाठी हक्काची असलेले 38 क्रीडा संकुले बंद; महापालिकेच्या कारभारावर संताप

शहरातील खेळाडूसाठी हक्काची असलेले 38 क्रीडा संकुले कुलूप बंद महापालिकेच्या कारभारावर संताप

महापालिकेकडे शहरात एकूण 107 क्रीडा संकुल असून 69 कार्यरत आहेत तर 38 क्रीडा संकुले बंद आहेत

खेळाडू विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असताना 38 क्रीडा संकुल बंद असल्याने नेमके विद्यार्थ्यांनी खेळायचे कुठे हा खरा प्रश्न आहे

भाडेकरार कालबाह्य झाल्याने 38 संकुल बंद महापालिकेच्या कारभाराचा विद्यार्थ्यांच्या खेळावर परिणाम

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला दुचाकी खरेदीत वाढ ,चारचाकी मध्ये घट...

विद्युत वाहनांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत असले तरी ग्राहकांची पसंती पेट्रोल डिझेलवर वाहनांनाच असल्याचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी झालेल्या वाहनांवरून स्पष्ट झाले आहे यंदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केवळ 228 दुचाकी आणि 78 चार चाकी खरेदी करण्यात आले असून गेल्या वर्षी हाच आकडा 678 आणि 203 इतका होता पारंपरिक इंधनावरील दुचाकी खरेदी केल्या वर्षापेक्षा वाढ नोंदवण्यात आली आहे.

Pune: पुण्यात मिळकत कर बुडविणाऱ्यांना चाप; वर्षभरात 57 हजार मिळकतींची नोंदणी

पुण्यात सुमारे चार लाख मिळकतींची नोंदणी नसल्याने दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यावर उपाय म्हणून बांधकाम विभागासोबत मिळकतकर विभाग तांत्रिक दृष्ट्या जोडण्यात आला आहे बांधकाम विभागाकडून इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर त्याची ऑनलाईन माहिती मिळकतकर विभागाला मिळत आहे त्यानंतर तात्काळ प्रक्रिया पार पाडून कर आकारणी केली जात आहे गेल्या वर्षभरात याद्वारे 5786 मिळकतींची नोंदणी झाली असून याद्वारे 365 कोटी रुपयांची कर आकारणी झाल्याने कर बुडवेगिरीला चाप लागला आहे.

Pune: विविध मागण्‍यांसाठी ससूनच्‍या परिचारिका २१ एप्रिलपासून संपावर

राज्यातील सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात ‘राज्‍य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती ने २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. यामध्‍ये महाराष्‍ट्र गव्‍हर्नमेंट नर्सेस असोसिएशन (संलग्न फेडरेशन) देखील सहभागी होणार असल्‍याने ससून रुग्‍णालयामधील परिचारिका संपावर जाणार आहेत.

Raigad: ढगांच्या गडगडाटासह रायगडमध्ये रिमझिम पाऊस

रायगडच्या दक्षिण भागामध्ये आज सकाळी रिमझिम पाऊस बसरला. सौम्य आवाजात ढगांचा गडगडाट करीत या अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर पावसाचा शिडकाव झाला. प्रत्यक्ष पाऊस दिसला नसला तरी रस्ते ओले झाले, गाड्यांवर पावसाचे थेंब पडून गाड्या ओल्या झाल्या. उष्णतेच यलो अलर्ट हवामान खात्याने रायगडला दिला आहे. उष्णता वाढण्याची शक्यता असताना रिमझिम पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वातावरणात गारवा पसरला.

Yavatmal: राळेगाव प्रकरणातील संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर जमावाकडून दगडफेक

यवतमाळ-

राळेगाव येथील प्रकरणी संशयित आरोपी मजहर कुरेशीच्याच्या घरावर जमावाने केली दगडफेक

राळेगाव येथील संतप्त जमावाकडून संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर दगडफेक

पोलिसांनी जमावाला पांगविले. संशयित आरोपी कुरेशी त्यांच्यावर पोलिसांनी केली प्रतिबंधात्मक कारवाई

Dhule: धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

धुळे -

धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांच्या झुंजी मध्ये स्थानिक नागरिक गंभीर जखमी

जखमी नागरिकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

बाजारामध्ये मोकाट जनावरांचा हायदोस मोठ्या प्रमाणात वाढला असून, शासनाचे अक्षम्य दुर्लक्षपणामुळे नागरिकांना नाहक सोसावा लागत आहे त्रास...

स्थानीकांतर्फे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com