Rajapur: रिफायनरीवरुन वातावरण तापलं; आज मंत्री आदित्य ठाकरे राजापूरात

आज मंत्री आदित्य ठाकरे राजापूरात येणार आहेत.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySaam Tv
Published On

रत्नागिरी : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या काेकण (kokan) दौ-यामुळे रिफायनरी प्रकल्प (refinery project) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिफायनरीस समर्थन करणा-यांनी आणि रिफायनरीस विरोध करणा-यांनी राजापूरात (rajapur) लावलेले मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बॅनरमुळे येथील राजकारण ढवळून निघाले आहे. (aaditya thaokan news updates)

राजापूर (rajapur) तालुक्यातील पश्चिम भागात बॅनर झळकत असल्याने मंत्री ठाकरे यांच्या दाै-यापुर्वीच पुन्हा एकदा रिफायनरीचा वाद शिगेला पाेहचला आहे. राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी आणू नका, आदित्य ठाकरे यांना विनंती करणारे बॅनर देखील झळकले आहेत.

Aaditya Thackeray
महानिर्मितीचे कर्मचारी संपावर; काेयनेची वीज निर्मिती ठप्प; पाण्याचाही नदीत विसर्ग

दरम्यान रिफायनरीस विरोध आणि समर्थन अशा दाेन बाजू असल्याने शिवसेनेची (shivsena) भूमिका महत्वाची ठरणार आहे. आजच्या दाै-यात मंत्री आदित्य ठाकरे काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Aaditya Thackeray
Sangli: युनियन बँकेचं एटीएम फोडणारे तिघे पाेलिसांच्या ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com