Sangli Crime News
Sangli Crime NewsSaam TV

Sangli: युनियन बँकेचं एटीएम फोडणारे तिघे पाेलिसांच्या ताब्यात

या तिघांकडून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Published on

सांगली : सांगलीच्या (Sangli) आपटा पोलीस चौकी रस्त्यावरील युनियन बँकेच एटीएम (ATM) फोडणाऱ्या चेतन जाधव आणि वैभव पाटील या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी (Vishram Baug) ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. तसेच एका अल्पवयीन मुलास ही ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांची पाेलिस (police) कसून चाैकशी सुरु आहे. (sangli latest marathi news)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कॉलेज कॉर्नर ते आपटा पोलीस चौकी रस्त्यावर युनियन बँकेचे एटीएम आहे. मध्यरात्री तीनच्या सुमारास तिघांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान भितीपाेटी त्यांनी एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे पळवून नेले.

Sangli Crime News
ICC Women's World Cup: टीम इंडियाचं स्वप्न भंगलं; No Ball ठरला घातक, WI उपांत्य फेरीत

या प्रकरणाचा तपास करताना विश्रामबाग पोलिसांनी त्यांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनूसार रविवारी तिघांना ताब्यात घेतलं. या तिघांकडून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Sangli Crime News
ट्रकानं फाेडलं तुम्ही, मेंढपाळानं एक नारळ फाेडला तर काय बिघडलं; खाेतांचा शरद पवारांना सवाल
Sangli Crime News
World Cup: स्मृती मानधनाला बाद करण्यासाठी ट्रायॉनची अप्रतिम डाईव्ह (व्हिडिओ पहा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com