सांगली : सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जाणून बुजुन जातीयवादाचे राजकारण करीत आहेत. सांगली जिल्ह्यात आम्ही त्यांची दादागिरी सहन करणार नाही असा इशारा सदाभाऊ खाेत (sadabhau khot) यांनी पालकमंत्री जयंत पाटील (jayant patil) यांना येथे दिला. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या (ahilyadevi holkar memorial) ठिकाणी जाण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांच्यासह हजाराे धनगर समाजातील कार्यकर्त्यांना पाेलिसांनी अहिल्या चाैकात राेखून ठेवले आहे. त्यावर खाेत हे माध्यमांशी बाेलत हाेते. (sangli latest marathi news)
खाेत म्हणाले आजच्या कार्यक्रमाचा सर्वसामान्य माणसाला काेणताही त्रास हाेत नाहीये. सर्वसामान्य माणूस आमच्या समवेत आहेत. चांगल्या कामाला विराेध करायचे नाही हे बराेबर आहे. या कार्यक्रमास त्यांनी (राज्यातील नेत्यांनी) विराेधी पक्ष नेत्यांना का निमंत्रण दिलं गेले नाही असा सवाल सदाभाऊ खाेत यांनी केला.
कडूलिंबाच्या बिया पेरायच्या आणि वर गुलाबाचा फुल येणार म्हणून सांगायचे असा हा प्रकार आहे. अहिल्यादेवी हाेळकर या बहुजन समाजाच्या मार्गदर्शक हाेत्या. या ठिकाणी द-या खाे-यातील लाेक आले आहेत. मेंढपाळाच्या हस्ते लाेकापर्ण व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. सत्तेत असलेल्यांना विशेषत: पालकमंत्र्यांना बहुजनांच्या नेत्यांचा तिरस्कार का?
ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांनी आत्तापर्यंत ट्रकाने नारळ फाेडले असतील तर मग एखाद्या मेंढपाळाच्या हस्ते लाेकार्पण हाेत असेल तर बालहट्ट कशासाठी. तुमच्या पाेटात कळा का सुटताहेत. येथील पालिका, लाेकप्रतिनिधी हे भाजपाचे (bjp) आहेत. त्यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत घेत नाहीत. या गाेष्टी पालकमंत्री जाणून बजुन करीत आहेत. ते जातीयवादाचे राजकारण करीत आहे असेही खाेत यांनी नमूद केले. सांगली जिल्ह्यात आम्ही दादागिरी सहन करणार नाही असा इशारा खाेत यांनी दिला.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.