Maharashtra Politics : बाप-लेकात फूट पडेल, आदित्य ठाकरेही उद्धव ठाकरेंना सोडतील, शिंदे सेनेच्या नेत्याचं भाकीत

Uddhav Thackeray Aditya Thackeray : ठाकरे गटात गेल्या काही दिवसांत आऊटगोईंग सुरू आहे. तोच धागा पकडत शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी ठाकरे बाप-लेकात फूट पडेल असे भाकीत केलेय.
Uddhav Thackeray Aditya Thackeray
Uddhav Thackeray Aditya Thackeray
Published On

भरत नागणे

Uddhav Thackeray Aditya Thackeray : विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून आऊटगोईंग सुरू आहे. कोकण, मुंबईसह राज्यभरातून कार्यकर्ते ठाकरेंची साथ सोडत आहेत. यावरूनच शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी केलेले भाकीत चर्चेत आहे. एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जातील, असे भाकीत शहाजी पाटील यांनी केलेय.

एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जातील, असे भाकीत शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी केले आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश‌ करत आहेत तर आणखी काही नेते वाटेवर आहेत. ठाकरे गटाला लागलेल्या गळतीवर माजी आमदार शहाजी पाटील यांनी ठाकरे पिता- पुत्रामध्येच फूट पडेल असं भाकीत केलं आहे.

Uddhav Thackeray Aditya Thackeray
Plane Crash: आणखी एक विमान अपघात, ८० जणांना घेऊन जाणारे प्लेन लँडिंगवेळी क्रॅश, अनेकजण जखमी

अनेक विरोधी पक्षातील नेते आणि आमदाराच्या चौकशी झाल्या म्हणून त्यांनी पक्ष सोडला नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तव परिस्थिती अशी झाली आहे. तिथे थांबण्यात काही अर्थ नाही, अशी भावना त्यांच्या नेत्यात झाली आहे. त्यामुळे एक दिवस असा उगवेल की उद्धव साहेबांना सोडायची भाषा आदित्य ठाकरेच करतील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकटेच राहण्याची परिस्थिती येऊ शकते, असे ही पाटील यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray Aditya Thackeray
Uddhav Thackeray : कोकणानंतर ठाकरेंना संभाजीनगरातही धक्का, महत्त्वाचा शिलेदार साथ सोडणार

आदित्य ठाकरे यांचे विरोधी पक्षनेता म्हणून नाव पुढे असल्याचा प्रश्न माजी आमदार शहाजी पाटील यांना विचारला असता असं काहीही होणार नाही. कारण ठाकरे गटाकडे संख्याबळ नाही. जरी त्यांना हे पद दिले तरी महाराष्ट्रात अतिशय निकृष्ट काम करणारा विरोधी पक्षनेता म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव गाजेल अशी खिल्ली त्यांनी उडवली.

Uddhav Thackeray Aditya Thackeray
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का बसणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com