Nanded: बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्या प्रकरणाचा असा सुरु आहे तपास

पोलिसांच्या धरपकड मोहिमेमुळे अनेक गुन्हेगार भुमिगत झाले आहेत.
Sanjay Biyani
Sanjay Biyanisaam tv

नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (sanjay biyani) यांच्या (nanded) येथे झालेल्या हत्ये प्रकरणात एसआयटीने ४५ जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे अशी माहिती एसआयटीचे प्रमुख तथा अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे (vijay kabade) यांनी दिली. (sanjay biyani latest marathi news update)

कबाडे म्हणाले नांदेडमधील हिस्ट्रीशीटर असलेले गुन्हेगार, बंदूक बाळगणारे, बंदूक विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेऊन बियाणींच्या हत्ये मागे कोणती टोळी आहे याचा तपास (investigation) सुरु केला आहे. लवकरच आम्ही आराेपींना ताब्यात घेऊ असा विश्वास कबाडेंनी व्यक्त केला.

Sanjay Biyani
Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या सकाळच्या सत्रातील लढती रद्द

दरम्यान पालकमंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधिक्षकांसमवेत संजय बियाणी यांच्या कुटूंबियांची (बुधवारी) भेट घेतली होती. त्यावेळी कुटुंबियांनी कायदा व सुव्यवस्थाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली हाेती. त्यानंतर मंत्री चव्हाण यांनी बियाणींच्या कुटुंबियांना लवकारत लवकर आराेपी पकडू असे आश्वासित केले. तसेच दुपारी पाेलिस (police) दला समवेत बैठक घेतली. त्यानंतर तपासाला वेग आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Sanjay Biyani
Hottal Mahotsav: नऊ एप्रिलपासून होट्टल महोत्सवाचे आयाेजन : डॉ. विपीन इटनकर
Sanjay Biyani
Nanded: संजय बियाणींच्या पत्नीचा पाेलिसांवर राेष; मारेक-यांना पकडू : अशाेक चव्हाण
Sanjay Biyani
Satara: इथं ओशाळली माणुसकी! ट्रक अपघातात चालक ठार; लाेकांनी पळवली कलिंगडं
Sanjay Biyani
उंदीर मारण्याचे औषध घालून पतीस दिला गुलाबजामुन; पत्नीस अटक, २ दिवसांची काेठडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com