Nashik News : चिंचखेड चौफुलीवरील एटीएम केंद्रातून 28 लाख लंपास, पाेलिस घटनास्थळी दाखल

चार चाेरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
nashik, hdfc atm center
nashik, hdfc atm centersaam tv
Published On

- अजय सोनवणे

pimpalgaon baswant news : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ही मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. या ठिकाणी शनिवारी पहाटेच्या सुमारास चिंचखेड चौफुलीवरील एटीएम फोडून तब्बल 28 लाख रुपये चोरून नेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Maharashtra News)

nashik, hdfc atm center
Sharad Pawar In Kolhapur: शरद पवारांचे 'ते' वक्तव्य हसन मुश्रीफांना बाेचले? नेत्याच्या भेटीला सीमा भागातील शिष्टमंडळ दाखल

चिंचखेड चौफुली हा अत्यंत गजबजलेला परिसर आहे. या ठिकाणची एचडीएफसी बँकेचे एटीएम केंद्र आहे. या केंद्रातील एटीएम मशिन कटरच्या साह्याने फोडण्यात आल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार महागड्या कारचा वापर करून चोरट्यांनी ही चोरी केली आहे. या ठिकाणी चार चोरटे आले हाेते. ते सर्वजण सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com