Nagar Beed Highway : पुण्याहून नांदेडला निघालेल्या बसला अपघात; 24 जखमी, चार गंभीर

या बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
24 passengers injured 4 serious in a road accident at nagar beed highway.
24 passengers injured 4 serious in a road accident at nagar beed highway.saam tv

Nagar Beed Highway Accident News : नगर- बीड महामार्गावर आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास खासगी बसला झालेल्या अपघातात (accident) 24 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामधील चार प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (beed latest marathi news)

नगर- बीड महामार्गावरील बीडच्या पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी जवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे येथून नांदेडला जाणारी बस क्रमांक (एम.एच.२६.बी.ई‌.३९३०) मेंद्रेवाडी शिवारात पहाटेच्या सुमारास बीडकडे येत होते. मेंद्रेवाडी हद्दीत बस येत असताना डोंगरात वळणावर तिचा अपघात झाला.

हा अपघात चालकाचा ताबा सुटल्याने झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातानंतर पाटोदा पोलिस ठाण्याकडील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती.

Edited By : Siddharth Latkar

24 passengers injured 4 serious in a road accident at nagar beed highway.
Rajapur : उदय सामंतला जाळून टाकू; माझं चुकलं ! वाचा आंदाेलकचा माफीनामा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com