Nashik News : दोन मैत्रिणींचा जाच असह्य झाला; २३ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Nashik News in Marathi : नाशिकमध्ये २३ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी देखील लिहिली.
 दोन मैत्रिणींचा जाच असह्य झाला; २३ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
Nashik News Saam tv
Published On

तबरेज शेख, साम टीव्ही

नाशिक : नाशिकमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये तरुणींच्या जाचाला कंटाळून २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या केली आहे. नाशिकच्या सिडकोच्या कामटवाडे परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सिडकोच्या कामटवाडे परिसरात एका २३ वर्षीय तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. दोन तरुणींच्या जाचाला कंटाळून तरुणाने जीवन संपवलं. ललित बाळासाहेब कोयटे असे या युवकाचे नाव आहे.

 दोन मैत्रिणींचा जाच असह्य झाला; २३ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
Nagpur Crime: पती- पत्नी अन् २ मुले, घरात आढळले चौघांचे मृतदेह; भयंकर घटनेने नागपुर हादरलं

ललितने आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी देखील लिहिली आहे. या चिठ्ठीत दोन मैत्रिणी आणि एका मित्राचे पैसे मागण्याच्या जाताला कंटाळून आत्महत्या केल्याचे उल्लेख करण्यात आलं आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 दोन मैत्रिणींचा जाच असह्य झाला; २३ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
Chandrapur Crime: धक्कादायक! शाळेमध्येच शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, चंद्रपूर हादरले

ललितने चिठ्ठीत केलेल्या आरोपानुसार, पोलिसांनी दोन मैत्रिणी आणि एक मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. तसेच वेळोवेळी पैशांची मागणी केल्याने मित्र आणि मैत्रिणींचा जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com