अभिजित देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी
व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना कल्याण क्राईम ब्रँचने सापळा रचत बेड्या ठोकल्यात आहेत. अनिल भोसले, अंकुश माळी, लक्ष्मण पाटील, अशी तिन्हीआरोपींची नावे आहेत. हे तिन्ही आरोपी पनवेल येथील राशीवासी असल्याची माहिती मिळत आहे.
त्यांच्या जवळ सुमारे 6 कोटी 20 लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. त्यांनी व्हेल माशाची ही उलटी कुठून आणली, ते कुणाला याची विक्री करणार होते, याचा तपास कल्याण क्राईम ब्रँच करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हेल माशाची उलटी ही अत्यंत दुर्मिळ असून, ती अत्तर किंवा सुगंधित उत्पादन बनवण्यासाठी वापरतात. नैसर्गिकरित्या जास्त काळ टिकणाऱ्या अत्तरासाठी या उलटीचा वापर केला जातो. यामुळे बाजारात व्हेल माशाच्या उलटीला कोट्यावधी रुपयांची किंमत आहे.
तसेच ही उलटी काही औषधांमध्येही वापरली जाते. त्यामुळे व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे प्रकार वाढले आहेत. यातच व्हेल माशाची उलटी अनधिकृत रित्या विक्रीसाठी काही इसम एका कारमधून बदलापूर पाईप लाईनरोडवर येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रँच च्या पथकाने बदलापूर पाईप लाईन रोड वर सापळा रचला.
संशयित गाडी दिसताच गाडी थांबवून गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये व्हेल माशाची उलटी आढळली. कल्याण क्राईम ब्रँचच्या पथकाने तात्काळ गाडीमधील अनिल भोसले, अंकुश माळी, लक्ष्मण पाटील या तिघांना ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी सुमारे सहा कोटी 20 लाखांची उलटी व कार जप्त केली. या तिघांनी उलटी कुठून आणली, कुणाला विक्री करण्यासाठी आणली, याचा तपास कल्याण क्राईम ब्रँचचे पथक करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.