Maharashtra politics : महायुती, मविआनंतर राज्यात तिसरी आघाडी, बच्चू कडूंसह दिग्गज नेत्यांची बैठक!

Maharashtra politics : युती आघाडीच्या राजकारणात अजुन एका नव्या प्रयोगाची नांदी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी संभाजी छत्रपतींनी पुढाकार घेतला आहे.
Bacchu Kadu
Bacchu KaduSaam TV
Published On

Maharashtra politics : राज्यात पुढील दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यआधी युती आणि आघाडीच्या बैठका आणि रणनिती सुरु आहेत. आता त्यातच आता छोट्या पक्षांनीही एकत्र येण्याबाबत विचार सुरु केले आहेत. बच्चू कडू (bacchu kadu) आणि संभाजी छत्रपती (Sambhaji Raje) यांनी याबाबतचा पुढाकार घेतला आहे. आज मुंबईत याबाबतची बैठक पार पडली आहे. त्यामुळे युती आघाडीच्या राजकारणात अजुन एका नव्या प्रयोगाची नांदी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी संभाजी छत्रपतींनी पुढाकार घेतला आहे.

वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली . स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर व इतर छोट्या पक्षांची मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Bacchu Kadu
Maharashtra Politics: भाजपला ६२, काँग्रेसला ८५; विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, सर्व्हेचा अंदाज

बैठकीनंतर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मविआ असो किंवा महायुती असो जे राजकारण सुरु आहे ते महाराष्ट्राला आवडणारं नाही. बच्चू कडू परखड व्यक्तीमत्व आहेत. आम्ही एकत्र यायला लागलोय चर्चा सुरु आहे. मनोज जरांगेशी पण भेट घेतली सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्राला एक चांगला पर्याय महाराष्ट्राला देण्यासाठी चर्चा सुरु आहेत. मी कोणाच्या सोबत नव्हतो. सगळ्यांसाठी आमची दार उघडी आहेत. कॉमन मिनिमम अजेंडा घेऊन आमच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आमचं अस्तित्व आगामी विधानसभा निवडणुकीत असेल."

Bacchu Kadu
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने डाव टाकला; राज्यातील १२५ जागांसाठी आखली विशेष रणनीती, VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com