Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Maharashtra vidhan Sabha Election : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत, त्यामधून त्यांची सपंत्तीचे विवरण समोर येतेय.
संदीपान भुमरे
संदीपान भुमरे - Saam TV
Published On

Maharashtra Assembly Election 2024: पैठण विधानसभा मतदारसंघातून खासदार संदिपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांनी शिवसेनेकडून उमदेवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती ३३ कोटी असल्याचे जाहीर केले. छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांच्यापेक्षा त्यांच्या मुलाची संपत्ती तिप्पट असल्याचे प्रतिज्ञापत्रावरुन समोर आले आहे.

पैठण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विलास भुमरे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांनी प्रतिज्ञापत्रात जंगम व स्थावर मिळून एकूण ३३ कोटी ६१ लाख २९ हजार २६१ रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचे वडील संदिपान भुमरे यांनी १० कोटी ३० लाख रुपये संपत्तीची नोंद केली होती. त्यांच्या तुलनेत मुलगा विलास यांची संपत्ती तिप्पट असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी पुष्यामृताच्या मुहूर्तावर अनेक उमेदवारांनी अर्ज भरले. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रांवरून त्यांच्या संपत्तीचे विवरण समोर आले आहे.

संदीपान भुमरे
Maharashtra Assembly Election : पुण्यात मविआची डोकेदुखी वाढली, ठाकरेंच्या शिलेदाराने पवारांविरोधात दंड थोपाटले, बंडखोरी करणार!

कन्नडचे उबाठाचे आमदार आमदार उदयसिंग राजपूत यांची एकूण स्थावर व जंगम मालमत्ता ४ कोटी ६५ लाख ७० हजार रुपये आहे. त्यांच्या पत्नी पूनम राजपूत यांच्या नावे एकूण जंगम व स्थावर मालमत्ता ७ कोटी, ६६ लाख ६८ हजार ३२५ रुपये आहे. पती पत्नी मिळून एकूण १२ कोटी ३२ लाख ३९ हजार ४६ रुपये आहे. दांपत्यावर एकूण ९४ लाख ६५ हजार रुपयांचे कर्ज आहे. तर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची एकूण संपत्ती २ कोटी ९४ लाख रुपये आहे. त्यांच्याकडे ४२ लाख ३९ हजार रुपयांची जंगम, तर २ कोटी ५२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर एकूण २३ लाख ८८ हजार रुपयांचे कर्ज असल्याचे शपथपत्रात नमूद आहे.

संदीपान भुमरे
Aaditya Thackeray Net Worth : बीएमडब्लू कार, दोन गाळे, कोट्यवधीचे दागिने; किती आहे आदित्य ठाकरे यांची संपत्ती? वाचा...

भाजपने राज्यात २५ हेलिकॉप्टर बूक केले -

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी निवडणूक लागण्यापूर्वीच भाजपने राज्यात उपलब्ध सर्व २५ हेलिकॉप्टर बूक केले. त्यामुळ निवडणूक प्रचारासाठी महाविकास आघाडीने राजस्थान, दिल्ली, कर्नाटक आणि गुजरातहून हेलिकॉप्टर मागवल्याचे महाराष्ट्रातील एव्हिएशन कंपन्या सांगतायत. मागणी वाढल्याने लोकसभेच्या तुलनेत हेलिकॉप्टर सेवेच्या दरात १५ ते २०% वाढ झाली. आहे. जनरल सिव्हील एव्हिएशनच्या डिसेंबर २०२३ च्या आहवालानुसार देशात १९१ हेलिकॉप्टर आहेत. पैकी १९ विविध राज्यांच्या मालकीचे आहेत. महाराष्ट्रातील ७१ हेलिकॉप्टरपैकी ग्लोबल वेक्ट्रा एव्हिएशनचे ३० तर हॅलिगोचे १५ आहेत. या कंपन्या राज्य शासन, ओनएजीसीला सेवा पुरवतात. खासगी मालकी, कंपन्या आणि कॉर्पोरेट्स वगळता फार तर २४-२५ हेलिकॉप्टर प्रचाराला उरतात. भाजपच्या एकगठ्ठा बुकिंगमुळे मविआने राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि दिल्लीहून प्रत्येकी २ तर चंगलुरूजून ४ हेलिकॉप्टर महिनाभरासाठी बुक केल्याची माहिती मुंबईतील एका कंपनीने दिली.

संदीपान भुमरे
Maharashtra Assembly Election : साताऱ्यात महायुतीला मोठं खिंडार, अजितदादांनी मकरंद पाटलांना उमेदवारी दिली, शिंदेंच्या जाधवांचे बंड!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com