Raj Thackeray: शहराचा विचका ‌झालाय, यायला दीड तास लागला; रस्त्यांच्या परिस्थीतीवरून राज ठाकरेंची बोचरी टीका

Raj Thackeray: घाटकोपर येथील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी शहरात वाढलेले नागरिकांचे लोंढे आणि शहराचं विद्रुपीकरणावर भाष्य केलं.
Raj Thackeray: शहराचा विचका ‌झालाय, यायला दीड तास लागला; रस्त्यांच्या परिस्थीतीवरून राज ठाकरेंची बोचरी टीका
Published On

सभांमध्ये नवीन काय बोलणार, उद्या गुहागरला ‌जाणार आहेत मात्र महाराष्ट्रात विषयांची काही कमतरता नाहिये. शहराचा अख्खा विचका ‌झालाय. मला इथं यायला दीड तास लागला. किती माणसे येत आहेत. रस्ते कमी पडत आहेत. रेल्वे स्टेशनवर माणसांची गर्दी झाल्याचं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शहराकडे येणाऱ्या लोंढे आणि रस्त्यांच्या स्थितीवरून सरकारवर टीका केलीय.

सभेला येताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली कामे आणि आंदोलनाची माहिती वाचली. परंतु दुसऱ्या कोणत्याच एखाद्या राजकीय पक्षाकडे हिंमत नाही ते अशी केलेल्या कामांवर पुस्तक काढतील. परंतु आपल्या कामांविषयी प्रश्न केली जातात. मात्र इतर पक्षांना विचारलं जात नसल्याचा आरोप देखील राज ठाकरेंनी केला.

घाटोकपर येथील प्रचार सभेत बोलताना शहात वाढलेल्या लोंढ्यावर भाष्य केलं. शहरात किती लोकं येत आहेत, किती वाहनं येत आहे. रस्ते, पूटपाथ अपूर्ण पडत आहेत. मात्र आम्ही हा सर्व भार सोसत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. सभेला येताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली कामे आणि आंदोलनाची माहिती वाचली. परंतु दुसऱ्या कोणत्याच एखाद्या राजकीय पक्षाकडे हिंमत नाही ते अशी केलेल्या कामांवर पुस्तक काढतील. परंतु आपल्या कामांविषयी प्रश्न केली जातात.

Raj Thackeray: शहराचा विचका ‌झालाय, यायला दीड तास लागला; रस्त्यांच्या परिस्थीतीवरून राज ठाकरेंची बोचरी टीका
Raj Thackeray News :...तर मशिदीचे भोंगे बंद करु; राज ठाकरे पुन्हा आक्रमक

मात्र इतर पक्षांना विचारलं जात नसल्याचा आरोप देखील राज ठाकरेंनी केला. मुलाखत घेतांना आम्हाला धारदार प्रश्न केली जातात. मात्र इतर पक्षाच्या नेत्यांसोबत हास्य विनोद चालत असतो अशी टीका राज ठाकरे यांनी केली. त्याचबरोबर त्यांनी मनेसची कामे दाखवली जात नसल्याची आरोपही त्यांनी अप्रत्यक्षपणे केला.

Raj Thackeray: शहराचा विचका ‌झालाय, यायला दीड तास लागला; रस्त्यांच्या परिस्थीतीवरून राज ठाकरेंची बोचरी टीका
Raj thackeray : नोकऱ्या नाहीत अन् आरक्षणासाठी भांडत आहेत, राज ठाकरेंचा हल्लाबोल

पक्ष स्थापन झाला होता त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विकासाचा आराखडा आणेल असं सांगितलं होतं. त्यानंतर २०१४ मध्ये आम्ही ब्लू प्रिंट आणली, त्यावर खूप प्रमाणात काम केलं. मनसेने खूप आंदोलने केली, त्याचे परिणाम दाखवली. तरीही आपल्याला कामे विचारली जात असल्याचं राज ठाकरे म्हणाले. मनसेच्या आंदोलनामुळे आज मुंबईतील एन्ट्री पॉईंटवरील टोलनाके बंद झाली आहेत.

तर त्याआधी राज्यातील ६५ टोलनाके मनसेच्या आंदोलनाने बंद झाल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. हे टोलनाके बंद झाले त्याचे श्रेय आम्हाला कोणी देत नसल्याची खदखद त्यांनी बोलून दाखवली. दुकानवरील पाट्या देखील मराठी भाषेत करण्यात आल्या. तर मोबाईल फोनवर आधी फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेत रेकॉर्डि ऐकून यायचं आता मराठी भाषेत येत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com