Raj thackeray Speech In Latur : आरक्षणावरुन राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. आरक्षण फक्त सरकारी नोकरीसाठीच लागते. खासगी ठिकाणी आरक्षण लागत नाही. सरकारी नोकऱ्याच नाहीत आणि आपण आरक्षणासाठी भांडत आहोत, हे दुर्देवी आहे, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. लातूरमधील रेणापूरमध्ये राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना ठाकरेंनी सत्ता द्या असे आवाहनही केले. एकमेकांकडे आता जातीच्या द्वेषाने पाहत आहोत. असं चित्र महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात कधीच नव्हतं. या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा इथल्या तरुणांना बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, याचा विचार केला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
मराठवाड्यातले तरुण बेरोजगार होऊन पुणे, मुंबईला रोजगारासाठी जात आहेत. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. इथला तरुण बाहेर का जातोय? याचा विचार केला का? आजपर्यंत त्याच त्या लोकांना निवडून दिले. आता बदल करा.
दिवसेंदिवस राजकारण खराब होत चाललं आहे. नोकऱ्या नाहीत, नोकऱ्याचं आरक्षण फक्त सरकारी ठिकाणीच मिळणार, खासगी ठिकणी मिळत नाही. जिथे नोकऱ्याच उपलब्ध नाहीत, तिथे आपण एकमेकांसाठी भांडत आहेत.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे नोकऱ्या नाहीत.
गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे पोलीस भरती होत नाही.
एकमेकांकडे आता जातीच्या द्वेषाने पाहत आहोत. असं चित्र महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात कधीच नव्हतं. या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा इथल्या तरुणांना बेरोजगारांना नोकरी मिळाल्या पाहिजे याचा विचार केला पाहिजे.
राज ठाकरेंच्या हातात एकदा सत्ता देऊन पाहा. सत्ता न पाहिलेला माणूस नाही. मी सत्ता पाहिली आहे.
माझा जाहीरनामा लवकरच येईल. जाहीरनामामध्ये मी तेवढ्याच गोष्टी टाकत आहेत, जे मला शक्य आहे.
जे पुढारी, नेते तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून सांगतायेत, त्यांना विचारा नेमकं कसं देणार आरक्षण. मागे मुंबईला आल्यास देखील मुख्यमंत्री यांनी आरक्षण दिलं सांगितले. नेमकं कसं दिलं ते सांगा.
राज्यातला शेतकरी आत्महत्या करत आहे, कुणाचेचं लक्ष नाही. राज्यात आणि मराठवाड्यात सर्वात जास्त प्रमाण महिलांना पळवून नेण्याचं आहे. कुठल्याही महत्त्वाच्या विषयात तुमचं लक्ष जाऊ नये, म्हणून जातीपातीचे राजकारण तुमच्यासोबत आलेलं आहे. ज्या लातूरने दोन दोन मुख्यमंत्री दिले तिथे रस्ते देखील चांगले नाहीत. शिवराज पाटील चाकूरकर देशाचे गृहमंत्री राहिले लोकसभेचे सभापती राहिले. त्यांच्याच चाकूर गावात मी सभेसाठी गेलो तिथं अंधार होता. सभा देखील जनरेटर केली. इतकी वर्ष सत्तेत राहून काय विकास केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.