Pune Assembly constituencies : पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वच पक्षाचे शहराध्यक्ष एकत्र; कोणत्या मुद्द्यावर रंगली चर्चा?

Pune Assembly Constituencies : पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वच पक्षाचे शहराध्यक्ष एकत्र आले आहेत. एकत्र येत त्यांनी निवडणुकीबाबत त्यांच्या मनातील विचार व्यक्त केलेत.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका
Teacher And Graduate ConstituencySaam Tv
Published On

Pune Assembly Constituencies News: विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. आता या निवडणुकीत सर्वच पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळणार आहे. अशातच या आरोप प्रत्यारोप सुरू होण्यापूर्वीच पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वच पक्षाचे शहराध्यक्ष एकत्र येत नाश्ता करत गप्पा मारताना पाहायला मिळालेत. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका
Assembly Election 2024 : वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्याची तयारी, भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक मैदानात?

दीपक मानकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

मराठा समाजाने मला उमेदवारी मिळावी यासाठी ठराव केलाय तो मान्य आहे. मला समाजाचा अभिमान आहे त्यामुळे मी पक्षाच्या विरोधी काम करणार नाही आणि समाजाला ही नाराज करणार नाही. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असं वाडेश्वर कट्ट्यावर दीपक मानकर यांनी सांगितलं.

शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे

शहरात दोन जागांवरती आम्ही दावा केलेला आहे दोन जागा शिवसेनेला सुटतील. 29 तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल. अनेक कार्यकर्ते मुंबईला चालत गेलेले आहेत. उमेदवारी मिळो ना मिळो मी तयारी केली आहे लढत मैत्रीपूर्ण होते की विरोधात होते हे 29 तारखेला सांगतो, असं नाना भानगिरे म्हणालेत.

धीरज घाटे भाजप

शहरात तीन ठिकाणी उमेदवार जाहीर झालेत दोन जागांवरती उमेदवार लवकर जाहीर होतील मोठा विश्वास आहे. मी कसबामधून इच्छा व्यक्त केली आहे. उमेदवारी मिळेल अशी आशा आहे, असं धीरज घाटे म्हणालेत.

संजय मोरे शिवसेना

शहरात कोथरूड आणि हडपसर मतदार संघ शिवसेनेने मागितला आहे मोठी ताकद शिवसेनेचे आहे सर्व तयारी शिवसेनेने केली आहे असा विश्वास संजय मोरे यांनी व्यक्त केला.

अरविंद शिंदे काँग्रेस शहराध्यक्ष

सर्व तयारी काँग्रेसची झालेली आहे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ असेल शिवाजीनगर आणि कसबा या ठिकाणचे उमेदवार आमच्याकडे आहेत. आम्ही हडपसर मतदारसंघ ही मागितला आहे. काही उमेदवार बदलतील मी माझा अहवाल वर पाठवला आहे. काही ठिकाणी चेहरे बदलतील असा विश्वास आहे असं त्यांनी सांगितलं.

मनसे साईनाथ बाबर

सर्वसामान्य घरातील मुलाला उमेदवारी दिली याचा आनंद आहे. मी हडपसर मतदारसंघात अनेक काम केले आहेत. त्यामुळे पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे. मनसे ही पूर्ण तयारीत आहे. मी दुसऱ्यांदा हडपसरमधून मनसेकडून उमेदवारी करतोय याचा मला अभिमान आहे.

प्रशांत जगताप राष्ट्रवादी

हडपसरमधून इच्छुक आहेत. तीन मतदारसंघ राष्ट्रवादीने मागितले आहेत.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका
Assembly Election 2024 : वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्याची तयारी, भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक मैदानात?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com