Maharashtra Politics: नाराज, बंडखोर अन् इच्छुकांची 'सागर' बंगल्यावर भरती, महायुतीच्या नेत्यांची फडणवीसांकडे धाव; मुंबईत काय घडतंय?

Maharashtra Assembly Election: भाजपमधील या नाराज, बंडखोर आणि इच्छुकांची देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
Maharashtra Politics: नाराज बंडखोर अन् इच्छुकांची 'सागर' बंगल्यावर भरती, महायुतीच्या नेत्यांची फडणवीसांकडे धाव; मुंबईत काय घडतंय?
Maharashtra Assembly Election: Saamtv
Published On

गणेश कवाडे, मुंबई

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केल्यानंतर नाराजीनाट्य, बंडखोरी अन् अंतर्गत कुरघोड्यांना ऊत आला आहे. भाजपमधील या नाराज, बंडखोर आणि इच्छुकांची देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या सागर बंगला हे महायुतीचे विधानसभा निवडणुकांचे रणनितीचे केंद्रस्थान होत असल्याचे दिसत आहे.

Maharashtra Politics: नाराज बंडखोर अन् इच्छुकांची 'सागर' बंगल्यावर भरती, महायुतीच्या नेत्यांची फडणवीसांकडे धाव; मुंबईत काय घडतंय?
Maharashtra Politics: मविआच्या नाराजीनाट्यावर पडदा! काँग्रेसचा 'हा' नेता वाद मिटवणार, शरद पवार- ठाकरेंशी चर्चा करणार

नाराज, बंडखोरांची सागर बंगल्यावर गर्दी!

भारतीय जनता पक्षासह महायुतीमधील नाराज, बंडखोर आणि इच्छुकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळपासून रांगा लावल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत नाव नसल्याने माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते हे फडणवीसांच्या भेटीला गेलेत. लोकसभेत पराभव झाल्यानंतर पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेच राम सातपुते यांनी फडणवीसांची भेट घेतली. दुसरीकडे आर्वीचे आमदार दादाराव केचे यांना देखील वेटिंगवर ठेवल्याने ते वेगळ्या विचारात आहेत या ठिकाणी सुमित वानखेडेंना उमेदवारीची शक्यता आहे. त्यांनीही फडणवीस यांची भेट घेतली.

महायुतीचे नेते फडणवीसांच्या भेटीला

पुणे कंन्टोनमेंटमधून सुनील कांबळेंना वेटिंगवर ठेवल्याने माजी नगरसेवक भरत वैरागे यांच्याकडून उमेदवारीची मागणी केली आहे. कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक आपले पुत्र कृष्णराज महाडिकसाठीसाठी उमेदवारीची मागणी करत आहेत. कोल्हापूर दक्षिण मधून अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र उमेदवार अदलाबदल करण्यासंदर्भात धनंजय महाडिक यांनी फडणवीसांची भेट घेतली. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेले तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंतही सागर बंगल्यावर पोहोचलेत. सोलापूर शहर मध्यमधून भाजपकडून मदत मिळावी यासाठी ते फडणवीस यांच्या भेटीला आले होते.

Maharashtra Politics: नाराज बंडखोर अन् इच्छुकांची 'सागर' बंगल्यावर भरती, महायुतीच्या नेत्यांची फडणवीसांकडे धाव; मुंबईत काय घडतंय?
Maharashtra Assembly Election : भाजपला मुंबईत हादरा, तिकीट न दिल्याने मोठा नेता साथ सोडणार, तुतारी फुंकणार?

मुंबईत काय घडलं?

कुलाबा मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्याने भाजप नेते राज पुरोहित नाराज झाले होते. मात्र फडणवीस यांनी नाराजी दूर केल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील नाराज माजी खासदार संजय काकडेही देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेत. काकडे तुतारी हाती घेणार अशी चर्चा होती. अशातच भाजपकडून काकडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होत आहे. बीड जिल्ह्यातील देवराई आणि आष्टी मतदारसंघात अदलाबदल करण्यात यावी यासाठी माजी विधान परिषद आमदार सुरेश धस यांनीही फडणवीसांची भेट घेतली. वडगाव शेरी मतदारसंघातून टिंगरेंना पोर्शे अपघातामुळे महायुतीचा विरोध होत आहे. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक इच्छुक याठिकाणी इच्छुक आहेत.

Maharashtra Politics: नाराज बंडखोर अन् इच्छुकांची 'सागर' बंगल्यावर भरती, महायुतीच्या नेत्यांची फडणवीसांकडे धाव; मुंबईत काय घडतंय?
Nashik News: नाशिकमध्ये भाजपला भगदाड! नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांचे राजीनामे, विधानसभेला सख्खे भाऊ भिडणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com