Assembly Election 2024 : वडिलांच्या पराभवाचा बदला घेण्याची तयारी, भाजपच्या मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक मैदानात?

Sandeep Naik vs Manda Mhatre : बेलापूरमधून तिकीट नाकारल्यामुळे संदीप नाईक बंड करण्याच्या तयारीत आहेत, आज ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार असल्याचे बोलल जातेय.
sandeep naik likely join ncp sp
sandeep naik likely join ncp spsandeep naik likely join ncp sp
Published On

Maharashtra Assembly Election 2024 : बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी उभारलेले बंडाचे वारे नेमक्या कोणत्या दिशेने वाहणार याचा फैसला मंगळवारी सकाळी होण्याची चिन्हे आहेत. (Denied ticket Navi Mumbai BJP chief Sandeep Naik sandeep naik likely join ncp sp)

बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी उभारलेले बंडाचे वारे नेमक्या कोणत्या दिशेने वाहणार याचा फैसला अखेर झाला. मंगळवारी सकाळी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संदीप नाईक हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे..

भाजपनं रविवारी 99 जणांची पहिली यादी जाहीर केली. यादीनंतर नवी मुंबईतील तिढा सुटण्याऐवजी वाढलाय. बेलापूर आणि ऐरोली, असे दोन मतदारसंघ मिळण्यासाठी गणेश नाईकांनी ‘फिल्डिंग’ लावली होती. मात्र, बेलापूरमधून पुन्हा मंदा म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे संदीप नाईकांनी पवारांच्या पक्षातून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. मात्र वडील गणेश नाईक यांनी संदीपचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

sandeep naik likely join ncp sp
Maharashtra Assembly Election : भाजपला मुंबईत हादरा, तिकीट न दिल्याने मोठा नेता साथ सोडणार, तुतारी फुंकणार?

वडील भाजपात, मुलाच्या हाती तुतारी?

साधारण वर्षभरापुर्वी पक्षाने संदीप यांच्याकडे भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पद सोपवलं होते. त्यानंतर भाजपच्या जिल्हा कार्यकारणीवर त्यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावली होती. तरीही या पार्श्वभूमीवर बेलापूरची उमेदवारी म्हात्रे यांना जाहीर होताच संदीप नाईकांनी हाती तुतारी घेण्याचा निर्धार केलाय.शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजून नवी मुंबईत आपले पत्ते उघड केलेले नाहीत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ऐरोली उद्धव ठाकरेंकडे तर बेलापूर शरद पवारांकडे असण्याची शक्यताय..त्यामुळे नाईकांच्या भूमिकेवर नवी मुंबईची राजकीय दिशा ठरणार आहे.

sandeep naik likely join ncp sp
Maval: मावळ मतदारसंघात महायुतीमध्ये रस्सीखेच; राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची नरमाईची भूमिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com