Manoj Jarange News : कोणाला पाडायचे, कुणाला निवडून आणायचे? मनोज जरांगे आज फैसला सांगणार!

Maharashtra Election : आमचा लढा आरक्षणाकडे न्यायचा आहे. हा लढा जिवंत राहणे गरजेचे होते त्यामुळे राजकारणाच्या नादात पडलो नाही. राजकारण हा काही आमचा धंदा नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
Manoj Jarange Patil :
Manoj Jarange Patil :Saam tv
Published On

अक्षय शिंदे, साम टीव्ही प्रतिनिधी

Manoj Jarange on Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला पाडायचे आणि कुणाला निवडून आणायचे याबाबतचा निर्णय आज मनोज जरांगे पाटील सांगणार आहेत. सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. आमचा लढा आरक्षणाकडे न्यायचा आहे. हा लढा जिवंत राहणे गरजेचे होते त्यामुळे राजकारणाच्या नादात पडलो नाही. राजकारण हा काही आमचा धंदा नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

समाजाने आता ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. हा सर्वस्वी समाजाचा निर्णय आहे. मात्र त्या संदर्भात माझा निर्णय मी १० नोव्हेंबर रोजी देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍याला आम्ही पाडणार असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे हे कोणा कोणाला पाडा पाडणार याची नावे सांगणार का? त्याबद्दल त्यांची भूमिका काय असेल हे आज समजेल.

Manoj Jarange Patil :
Maharashtra Election: १५०० रुपये घेणारी लाडकी बहीण काँग्रेसच्या रॅलीत दिसली तर..., भाजप खासदाराच्या वक्तव्यानं राजकारण तापलं

जरांगेंच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष

मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे या विधानसभेमध्ये मराठा समाजाने काय करायचं याबाबत आज दहा वाजेच्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला आवाहन करणार आहे .दरम्यान आज मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे.

Manoj Jarange Patil :
Pune Crime : पुणे हादरलं! हडपसरमध्ये महिलेला मारलं अन् पलंगात ठेवलं, नवरा घरात आल्यावर....

विधानसभा निवडणुकीतून माघार

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा ,मुस्लिम, दलित समीकरण जुळवून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती.मात्र ऐनवेळी मुस्लिम आणि दलित समाजाची उमेदवाराची यादी आली नाही म्हणत मनोज जरांगे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली. दरम्यान निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत असताना मराठा समाजाने नेमकी या निवडणूकीत काय करावं याबाबत त्यांनी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील काय घोषणा करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे..

Manoj Jarange Patil :
Viral Video: AC ट्रेनमध्ये ही अवस्था; प्रवासी कोंबले, दरवाजाही लागेना! प्रत्येक प्रवाशाचे दुःख सांगणारा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com