मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर जरांगे पाटील यांच्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल चढवलाय. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेतून माघार घेतलीय. निवडणुकीतून माघार घेऊन जरांगेंनी घरंदाज मराठ्यांच्या दबावातून रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिल्याची टीका आंबेडकर यांनी केलीय.
वंचित बहुजन आघाडीने आज त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरक्षितता देण्यात येणार असल्याचं म्हटलंय. तर आपले सरकार आल्यास महिलांना ३५०० रुपयांचं मासिक वेतन देण्यात येईल. त्याचबरोबर शेतमाल हमीभाव कायदा करणार असल्याचं देखील वंचितने आपल्या जाहिरनाम्यात म्हटलंय. जाहीरनामा जाहीर केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यात बोलतांना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.
जरांगे पाटील यांचा विधानसभेतील रोल संपला असं आम्ही मानत नाही. सत्तर टक्के जागा ओबीसी समाजातील इच्छुकांना देण्यात आलेत. हे पाहता मराठा समाजाचे मतदान एकतर्फी होऊ शकतं. तसेच ओबीसीचे मतदान ही एकतर्फी होईल, अशी परिस्थिती आहे. ओबीसी समाज वंचितकडे वळाला आहे, असा आमचा दावा आहे. आम्ही त्यांच्यासाठी लढतोय, त्यामुळं हा वर्ग आमच्यासोबत येईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
आमचे १५ आमदार निवडून आले तरी येणाऱ्या सत्तेत आम्ही भागीदार राहू, असा असेही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या सभांना ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ९ नोव्हेंबरला सोलापूर येथून सभांना सुरुवात करतोय. माझ्या तब्येतीबाबत बऱ्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या. त्या सर्वांचे आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी प्रचार करेन , असंही आंबेडकर म्हणालेत.
सत्तेत सहभागी झाल्यानंतर आम्ही सोयाबीन आणि कापूसला योग्य मोबदला मिळावा, यासाठी आम्ही ५०० रुपये प्रति क्विंटल बोनस द्यायला लावणार आहे. राज्याची लोकसंख्या 13 कोटीच्या घरात आहे, त्यामुळं आता दोन लाख रोजगार निर्मितीची गरज आहे. उंबरठे झिजवणारा वर्ग संपवायला हवा. तेंव्हा घराणेशाहीचं राजकारण संपुष्टात येईल.
माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात काकाला मतदान दिलं काय अन पुतण्याला मतदान दिलं काय? सत्ता ही कुटुंबात राहणार आहे. त्यामुळं एक खूणगाठ बांधून यातील किती लायक अन् किती नालायक आहेत. याबाबत स्पष्टता करून कोणाला मतदान करायचं नाही, हे जाहीर करायला हवं.
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेऊन घरंदाज मराठ्यांच्या दबावातून रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. दरम्यान राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत होणार आहे. सत्तर टक्के जागा ओबीसी समाजातील इच्छुकांना देण्यात आलेत. तेथे मराठा समाजाचे मतदान एकतर्फी जाण्याची शक्यता प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.