Laxman Hake vs Jarange: मनोज जरांगे नावाचे वटवाघूळ महाराष्ट्राच्या मानेवर बसलंय; लक्ष्मण हाकेंची घणाघाती टीका

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. उद्या दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार असल्याचं हाके म्हणालेत.
Laxman Hake vs Jarange: मनोज जरांगे नावाचे वटवाघूळ महाराष्ट्राच्या मानेवर बसलंय; लक्ष्मण हाकेंची घणाघाती टीका
Laxman Hake On JarangeSaam Digital
Published On

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

तीन तारखेनंतर मनोज जरांगे इतिहास जमा होणार आहेत. उद्या दूध का दूध पाणी का पाणी हो जायेगा . जरांगे-पाटील बारामतीत मॅनेज झालेत. एक मराठा लाख मराठा मतांचे मूल्य नसतं. मनोज जरांगे आज औकातीवर आलेत. शरद पवारांनी त्यांना डाफरले आहे, अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर टीका केलीय. ते पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी जरांगेवर हल्ला चढवला. विधानसभेच्या निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना रंगणार आहे.

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार आहेत. या उमेदवारांना विशेषत: भाजपच्या विरोधातच उतवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान उद्या ४ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उद्या जरांगे पाटील यांचे उमेदवार माघार घेतील असं दावा हाके यांनी केलाय.

ओबीसी उमेदवारांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करत लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर आज हल्लाबोल केला. मनोज जरांगे हे तुतारीची सुपारी घेऊन तुतारी वाजवत आहेत? जरांगे यांच्या पाठीमागे दलीत आणि मुस्लीम समाज कसा जाईल. जरांगे नावाचे वटवाघूळ महाराष्ट्राच्या मानेवर बसलंय. ते उद्या ३ नंतर इतिहास जमा होईल, अशी टीका हाके यांनी केली.

Laxman Hake vs Jarange: मनोज जरांगे नावाचे वटवाघूळ महाराष्ट्राच्या मानेवर बसलंय; लक्ष्मण हाकेंची घणाघाती टीका
Manoj jarange : मोठी बातमी! मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, उमेदवार अन् मतदारसंघ जाहीर करणार!

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी त्यांनी काही मतदारसंघही निवडलेत. आपल्याला राजकारणाचा जास्त अनुभव नसल्यामुळे उमेदवार निवडण्यासाठी वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या मतदारसंघात उमेदवार नाही तिथे उमेदवार पाडणार, खुन्नस आहे तिथे पाडणार असंही जरांगे म्हणालेत. यावरून बोलतांना लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर हल्लाबोल केला. १३५ उमेदवार पाडणार, एकेकाला बघून घेईल ही भाषा होती. लोकशाहीचे मूल्य काय आहे? एका मताला लाख मोलाची किंमत आहे.

मुस्लीम आणि दलित समाजाच्या प्रमुखांशी चर्चा करून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जरांगे करत आहेत. त्यावरूनही हाके यांनी जरांगेवर टीका केलीय. मनोज जरांगे निवडणुका आल्या की मुस्लिम, दलित आठवतात का? तुम्ही ओबीसी घरं टार्गेट करता, आता हे महाराष्ट्राला कळले आहे. निवडणुका एका जातीच्या आरक्षणावर लढली जात नाही.

एक मराठा एक लाख मराठा घोषणा मुस्लिम, दलित समाजाच्या लोकांच्या मनात धस्स करणाऱ्या होत्या. ज्यांनी त्यांना पैसे दिले, गाड्या दिले त्यांना ओबीसी मतदान करणार नाहीत. जी-जी माणसे जरांगेंना रात्री भेटले त्यांच्या विरोधात जरांगे उमेदवार देणार नाहीत. आमचा रोष ज्या-ज्या माणसांनी जरांगे यांना पाठिंबा दिला त्यांच्यावर आहे. सांगलीचे खासदार प्रतीक पाटील भेटले, लाज वाटते, त्या जतमध्ये किती ओबीसी आहेत, असंही हाके म्हणालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com