विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्वमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी चुरसीशी लढत या मतदारसंघात आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे विरुद्ध काँग्रेसचे लहू शेवाळे अशी लढत होती. त्याचसोबत माजी खासदार इम्तियाज जलीलदेखील उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कोण निवडून येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
भाजपचे अतुल सावे या निवडणुकीत गड राखणार असल्याचे दिसत आहे.या मतदारसंघात मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात अनेकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळेच भाजपचे अतुल सावे निवडून येऊ शकतात.
औरंगाबाद पूर्वमध्ये पुन्हा एकदा विद्यमान आमदार अतुल सावे निवडून येतील, असं चित्र दिसत आहे. अतुल सावे यांचा प्रभाव या मतदारसंघात जास्त आहे. या मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत.सलग दोन वेळा ते मंत्री होते. या काळात त्यांनी या मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात केला आहे. (Sakal Exit Poll)
छत्रपती संभाजी नगरमध्ये हिंदु आणि मुस्लिम मतदारांची विभागणी झाली आहे. या निवडणुकीत मुस्लिम मतदार हे इम्तियाज जलील यांच्या बाजूने आहेत तर हिंदु मतदारांचा कौल अतुल सावे यांच्या बाजूने आहे. त्यामुळे ही लढत फारच चुरशीची होणार आहे. (Aurangabad East Exit Poll)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.