Hingoli News: हिंगोलीत जवानाचा कुटुंबावर गोळीबार, उपचारादरम्यान मेहुण्याचा मृत्यू; मृतांचा आकडा २ वर

Hingoli Crime News: हिंगोलीमध्ये जवाने आपल्याच कुटुंबीयांवर बेछुट गोळीबार केला होता. या गोळीबारात जवानाच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर मेहुण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगा आणि सासूवर उपचार सुरू आहेत.
Hingoli News: हिंगोलीत जवानाचा कुटुंबावर गोळीबार, उपचारादरम्यान मेहुण्याचा मृत्यू; मृतांचा आकडा २ वर
Hingoli Crime Saam tv
Published On

हिंगोलीमध्ये कौटुंबिक वादातून राज्य राखीव पोलिस दलातील जवानाने स्वत:च्याच कुटुंबावर गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या गोळीबारातील मृतांचा आकडा २ वर पोहचला आहे.

जवानाने केलेल्या गोळीबारामध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. तर चिमुकल्यासह २ जण गंभीर जखमी झाले होते. जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हिंगोलीमध्ये कौटुंबिक वादातून विलास मुकाडे या जवानाने स्वतःच्या कुटुंबासह सासूरवाडीत गोळीबार केल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली होती. जवानाने आपल्या कुटुंबावरच बेछुट गोळीबार केला होता.

Hingoli News: हिंगोलीत जवानाचा कुटुंबावर गोळीबार, उपचारादरम्यान मेहुण्याचा मृत्यू; मृतांचा आकडा २ वर
Hingoli Crime: प्रेमाने घात केला, वादाने टोक गाठलं; बॉयफ्रेंडने घरातच गर्लफ्रेंडला संपवलं, परिसरात खळबळ

या घटनेत पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला होता. तर जवानाचा दीड वर्षांचा मुलगा, सासू आणि मेहुणा गंभीर जखमी झाले होते. आता या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या जवानाच्या मेहुण्याचा देखील मृत्यू झाला आहे. योगेश धनवे असे उपचाादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Hingoli News: हिंगोलीत जवानाचा कुटुंबावर गोळीबार, उपचारादरम्यान मेहुण्याचा मृत्यू; मृतांचा आकडा २ वर
Hingoli Crime : भयंकर! प्रॉपर्टीचा वाद जिवावर उठला, मोठ्या भावानं लहान भावालाच संपवलं

या घटनेत गोळीबार करणारा आरोपी पोलिस कर्मचारी विलास मुकाडे याची सासू दीड वर्षांचा मुलगा देखील जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे हिंगोली शहर हादरले होते.

गोळीबारानंतर जवानाने घटनास्थळावरून पळ काढला होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली. कौटुंबिक वादातून जवानाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Hingoli News: हिंगोलीत जवानाचा कुटुंबावर गोळीबार, उपचारादरम्यान मेहुण्याचा मृत्यू; मृतांचा आकडा २ वर
Hingoli Firing : हिंगोली हादरलं! पोलीस कर्मचाऱ्याचा बायको आणि पोराबाळांवर बेछुट गोळीबार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com