Nashik vidhan sabha election 2024 : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आयाराम गयाराम यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विधानसभा लढवण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांनी अनेकांनी आपल पक्ष सोडत दुसऱ्या पक्षात जाण्याचा मार्ग अवलंबलाय. पण यामुळे अनेक गणित बदलली आहेत. याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी पक्षांना बसत असल्याचे चित्र आहे.
नाशिकमध्येही भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असणारे गणेश गिते यांनी भाजपचा साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलेय. त्यांनी तसे संकेत दिले. गणेश गिते यांनी भाजपला रामराम ठोकल्यास विधानसभेला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. गणेश गिते गिरीश महाजन याचे विश्वासू मानले जातात.
गणेश गिते यांच्या रुपाने नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे समोर आलेय. नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते तुतारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिते आज मुंबईत शरद पवारांची भेट घेणार आहेत. त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गिते यांना विधानसभा लढवायची आहे. पण महायुतीमध्ये नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे सध्याचे विद्यमान आमदार ढिकाले आहेत. त्यांचे तिकीट जवळपास निश्चित मानले जातेय. त्यामुळे नाशिक पूर्वमधून लढण्यास इच्छूक असणारे गणेश गिते तुतारी घेण्याच्या तयारीत आहेत. भाजपाकडून उमेदवारी मिळत नसल्याने गणेश गीते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याचे नाशिकमध्ये बोलले जात आहे.
दरम्यान, भाजपचे ११० जागांवर उमेदवार ठरल्याचे समोर आलेय. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील ११० जागांवर भाजपच्या केंद्रीय समितीने शिक्कामोर्तब केलेय. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप १६० जागा लढण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही क्षणी भाजपची उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.