MVA Seat Distribution : महाविकास आघाडीच्या २६० जागा फिक्स; २८ जागांवर रस्सीखेच, त्या कोणत्या? VIDEO

Maharashtra Assembly Election News : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीकडून जागावाटपावर आज बैठक होत असून यात जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीचं 260 जागांचं जागावाटप ठरलं असून उर्वरित 28 जागांवर मात्र अद्यापही रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. मात्र आजच महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा बघायला मिळत आहे. जागावाटपाचं गणित काही केल्या सुटत नसल्याचं दिसत आहे. मात्र आजच्या बैठकीत 288 पैकी 260 जागांवर अंतिम जागावाटपावर निर्णय झाला असून उरलेल्या 28 जागांवर अजूनही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. तरीही याबाबत आजच निर्णय होऊन जागावाटप निश्चित होण्याची शक्यता आहे. या महत्वाच्या 28 जागांवर तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात आला आहे. यात मुंबई आणि विदर्भातील जागांचा समावेश आहे. यात छोट्या घटक पक्षांना देखील जागा देण्याबाबत दबाव असल्याने हा तिढा सुटत नसल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र आज अंतिम निर्णय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com