Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

2024 Maharashtra Legislative Assembly election : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळेल, असा दावा शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून करण्यात आलाय.
Maharashtra Politics 2024
NDA Party Member Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSaam Digital
Published On

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रामध्ये काही दिवसात विधनासभा निवडणुका होणार आहे. युती -आघाडीसोबत प्रत्येक पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडूनही आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात आली आहे. जागावाटपावर चर्चा सुरु आहे. कोणत्या मतदारसंघात आपल्यासाठी पोषक आहे, याचा सर्व्हेच्या माध्यमातून आढावा घेण्यात आलाय. शिवसेनेच्या सर्व्हेमध्ये महायुतीसाठी २०९ जागांसाठी अनुकूल वातावरण असल्याचं समोर आले आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार, असा दावा करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील २०९ जागांवर महायुतीला अनुकूल वातावरण असल्याचा आकडा शिवसेनेच्या अंतर्गत सर्वेक्षणात समोर आला आहे. शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे यांनी साम टिव्हीशी बोलताना याबाबतची माहिती दिली. दरम्यान, महायुतीचे जागावाटप दोन आठवड्यात पूर्ण होईल, असे समोर आले आहे.

महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण -

विधानसभा निवडणूक आता अवघ्या २ महिन्यांवर येऊन ठेपली असून त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभांचा आढावा घेतला जातोय. याच अनुषंगाने शिवसेनेने आपल्या समन्वयकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांचा आढावा घेतला. यामध्ये २०९ जागांवर महायुतीला पोषक आणि अनुकूल वातावरण असल्याचं समोर आल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनी दिली. मात्र या २०९ पैकी ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार सध्या आहेत, तसेच ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा स्ट्राइक रेट किंवा विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त आहे, त्यानुसारच जागावाटप होईल आणि महायुतीचे नेते याबाबतचा अंतिम निर्णय घेतील. महायुतीत जागा वाटपाबाबत कोणताही वाद नाही, अशीही माहिती किरण सोनावणे यांनी दिली आहे.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

विधानसभा निवडणुका कधी ?

आगामी विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होतील, असा अंदाज वर्तवला होता. तर महायुतीमधील काही नेत्यांच्या मते, १५ दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदाच्या विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com