Assembly Election: कळमनुरीत रंगणार चौरंगी लढत? संतोष बांगरांना ठाकरेंच्या टारफेंचं आव्हान

सतत वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असलेल्या संतोष बांगर यांच्यापुढे आता तिरंगी आव्हान असणार आहे. त्याबरोबरच कळमनुरीचं जातीय समीकरण नेमकं कसं आहे? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Assembly Election: कळमनुरीत रंगणार चौरंगी लढत? संतोष बांगरांना ठाकरेंच्या टारफेंचं आव्हान
Published On

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय. त्यातच एकनाथ शिंदेंनी कळमनुरी मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगरांना संधी दिलीय. तर ठाकरे गटाने डॉ. संतोष टारफेंना उमेदवारी दिलीय. त्यामुळे कळमनुरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत स्पष्ट झाली असतानाच वंचित बहुजन आघाडीने दिलीप म्हस्केंना रिंगणात उतरवून चुरस वाढवलीय. तर संतोष बांगरांनी कळमनुरी मतदारसंघातील पिढी नासवल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय. मात्र जनशक्ती सोबत असल्याने बांगरांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

कधी काळी डाव्यांचा बालेकिल्ला असलेला कळमनुरी मतदारसंघ आता हिंदुत्वाकडे झुकल्याचं चित्र आहे. 2019 मध्ये काँग्रेसचे आमदार संतोष टारफेंना धक्का देत काँग्रेसचा गट पहिल्यांदाच शिवसेनेने भेदला. मात्र 2019 मधील मतांचं समीकरण कसं होतं? पाहूयात.

2019 मधील मतांचं समीकरण?

संतोष बांगर, आमदार, शिवसेना- 82 हजार515

अजित मगर, वंचित बहुजन आघाडी- 66 हजार 137

संतोष टारफे, काँग्रेस, 57 हजार 544

16 हजार मतांनी बांगर विजयी

2019 मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं घेणाऱ्या अजित मगर आणि संतोष टारफेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे संतोष बांगर यांच्यापुढे मोठं आव्हान निर्माण झालंय. तर माजी खासदार शिवाजीराव मानेंनी जरांगेंची भेट घेत चुरस वाढवलीय.

कळमनुरीत इच्छुकांची भाऊगर्दी?

संतोष बांगर, आमदार, शिंदे गट

संतोष टारफे, उमेदवार, ठाकरे गट

दिलीप म्हस्के, उमेदवार, वंचित

शिवाजीराव माने, इच्छुक, स्वराज्य पक्ष

Assembly Election: कळमनुरीत रंगणार चौरंगी लढत? संतोष बांगरांना ठाकरेंच्या टारफेंचं आव्हान
Pune Assembly Elections : पुण्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट; अनेक मतदारसंघात होणार काटे की टक्कर

कळमनुरी मतदारसंघात जातीय समीकरणांची बेरीज विजयाचा मार्ग ठरवते, असा इतिहास आहे. मात्र कळमनुरीतील जातीय समीकरणं कशी आहेत? पाहूयात.

कळमनुरीचं जातीय गणित

मराठा- 94 हजार

ओबीसी- 95 हजार

मुस्लीम - 33 हजार

एससी- 35 हजार

एसटी- 41 हजार

Assembly Election: कळमनुरीत रंगणार चौरंगी लढत? संतोष बांगरांना ठाकरेंच्या टारफेंचं आव्हान
Eknath Shinde Property: मुख्यमंत्री शिंदेंच्या संपत्तीत २६ कोटींनी वाढ, १५ कोटींचं कर्ज; जाणून घ्या एकूण संपत्तीचा आकडा

वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असलेल्या संतोष बांगर यांची अस्तित्वाची लढाई रंगणार आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाने आदिवासी तर वंचितने धनगर उमेदवार मैदानात उतरवल्याने जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर पडणार? यावर विजयाचं गणित अवलंबून असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com