Pune Assembly Elections : पुण्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट; अनेक मतदारसंघात होणार काटे की टक्कर

Maharashtra Election 2024: पुण्यातील कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार मैदानात आहेत त्याची माहिती जाणून घेऊ.
Pune Assembly Elections
Pune Assembly ElectionsSaam TV
Published On

पुण्यातील आठही विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. येथे अनेक मतदारसंघात काटे की टक्कर होणार असे दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांची समोरासमोर लढत होणार आहे. आठ पैकी चार मतदारसंघात मनसेचे उमेदवार देखील रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजप बंडखोर उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरलेत. सद्यस्थितीत आठपैकी पाच ठिकाणी भाजपचे आमदार, दोन ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार, तर एका ठिकाणी काँग्रेस आमदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत हे चित्र बदलणार हा हे पाहावं लागेल.

Pune Assembly Elections
Amravati Assembly Election : अमरावतीमध्ये राजकीय खळबळ, दिल्लीवारी केल्यानंतर दोन आमदारांना पुन्हा तिकीट नाही?

पुण्यातील कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार मैदानात आहेत त्याची माहिती जाणून घेऊ.

कसबा विधानसभा मतदारसंघ

आमदार रवींद्र धंगेकर - काँगेस

हेमंत रासने - भाजप

गणेश भोकरे - मनसे

कमल व्यवहारे,काँग्रेस बंडखोर,स्वराज्य पक्षातून निवडणूक लढवणार

काँग्रेस माजी नगरसेवक मुक्तार शेख अपक्ष निवडणुक लढवणार

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

आमदार सिद्धार्थ शिरोळे,भाजप

दत्ता बहिरट, काँग्रेस

काँग्रेस बंडखोर मनीषा आनंद अपक्ष निवडणूक लढवणार

कोथरूड विधानसभा मतदारसंघ

आमदार चंद्रकांतदादा पाटील,भाजप

चंद्रकांत मोकाटे,उबाठा शिवसेना

किशोर शिंदे,मनसे

अमोल बालवडकर,भाजप बंडखोरी करण्याची शक्यता अपक्ष निवडणूक लढवणार

खडकवासला विधानसभा मतदारसंघ

आमदार भीमराव तापकीर, भाजप

सचिन दोडके,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

मयुरेश वांजळे,मनसे

हडपसर विधानसभा मतदारसंघ

आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

साईनाथ बाबर, मनसे

आनंद अलकुंटे,बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपक्ष निवडणूक लढवणार

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ

आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

पर्वती विधानसभा मतदारसंघ

आमदार माधुरी मिसाळ,भाजप

अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

आबा बागुल, काँग्रेस बंडखोर अपक्ष निवडणूक लढवणार

सचिन तावरे,बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मनोज जरांगे यांच्याकडून निवडणूक लढवणार

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ

आमदार सुनील कांबळे,भाजप

रमेश बागवे,काँग्रेस

Pune Assembly Elections
Assembly Election: संगमनेर तालुक्याचे मालक होण्याचा प्रयत्न करू नका; विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com