Pawar vs Pawar : फक्त पवार साहेबांना साथ द्यायची, काकाविरोधात अर्ज भरल्यानंतर युगेंद्र पवार काय म्हणाले?

Ajit Pawar vs yugendra Pawar : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. विधानसभेसाठी आज अजित पवार आणि युगेंद्र पवार यांनी बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
Ajit Pawar vs Sharad Pawar
Ajit Pawar vs Sharad PawarSaam Tv
Published On

Baramati Ajit Pawar vs yugendra Pawar : बारामतीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेय. शरद पवार यांनी पुतण्याला शह देण्यासाठी अजित पवार यांच्या पुतण्याला मैदानात उतरवलेय. बारामतीमध्ये काका आणि पुतण्याची लढत होणार आहे. अजित पवार यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवार अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांनी साधेपणाने अर्ज दाखल केला. युगेंद्र पवार यांच्यासोबत अर्ज भरताना आजोबा शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर युगेंद्र पवार भावूक झाले होते. शरद पवार माझे रोल मॉडेल आहेत. फक्त त्यांना साथ द्यायची आहे, अशी भावनिक साद त्यांनी मतदारांना यावेळी घातली.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना युगेंद्र पवार भावूक झाले होते.यावेळी त्यांनी काका अजित पवार यांना खोचक टोला लगावला. बारामतीमध्ये आव्हान असेल का नसेल, त्यावर मी आज विचार केला नाही. मला फक्त साहेबांना साथ द्यायची आहे, असे युगेंद्र पवार म्हणाले.

काय म्हणाले युगेंद्र पवार?

शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे, माझे आई वडील, कार्यकर्ते यांचे आभार मानतो.

आज माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द राहिलेले नाहीत (काहीसे भावूक). ते नेहमी मार्गदर्शक, गुरू राहिले आहेत. आपण लहान असताना रोल मॉडेल, आदर्श म्हणून बघत असतो, माझ्यासाठी पवार साहेब नेहमी रोल मॉडेल राहिलेत.

हा क्षण माझ्या आयुष्यातील मोठा दिवस आहे.

मी नेहमी बारामतीकरांसाठी काम करत राहील.

साहेबांचे विचार घेऊन मी दिवस रात्र जोपर्यंत माझ्यासाठी शक्य आहे, तोपर्यंत बारामतीकरांसाठी काम करत राहील.

ज्या पद्धतीने बारामतीकर यांनी ५५ वर्ष शरद पवारांना आशीर्वाद दिला, तसा आशीर्वाद मला द्या.

एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्यात असेल.

पवार साहेब फार मोजके बोलतात, ते सल्ले आणि कानमंत्र देत नाहीत, पण ते जे सांगतात त्याचं आपण ऐकलं पाहिजे.

आव्हान असेल का नसेल, त्यावर मी आज विचार केला नाही. माझ्यासमोर इथले मोठे उमेदवार असतील तरी माझ्यासोबत पवार साहेब आहेत.

मी उमेदवार, काका असं मी समोर बघत नाही. मला फक्त पवार साहेबांना साथ द्यायची आहे.

मी ४ वेळा बारामती पिंजून काढली आहे.

दादा बदलायचा आहे का नाही? मला बदलण्याची भाषा करणं योग्य वाटत नाही.

माझ्या जवळचे जे आहेत, त्यांच्यासाठी मी शरद पवारांकडे जाणं आश्चर्यकारक नव्हतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com