Madha Constituency : शहाजी बापूंची सुपारी फुटली मुंबईत अन् हळद लागली गुवाहाटीत, जानकरांचं उत्तर, Video

उत्तम जानकर हे फडणवीस यांच्या भेटीसाठी विशेष विमानाने नागपूर येथे गेले होते. यावेळी आपणही सोबत होतो. जानकरांच भाजपशी लग्न जुळत आले होते. पण नवरदेवाने हुंडा जास्त मागितला अशी टीका शहाजी पाटील यांनी केली हाेती.
uttam jankar criticised shahajibapu patil
uttam jankar criticised shahajibapu patilSaam Digital

Madha Lok Sabha Election :

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (shahajibapu patil) आणि राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्यात चांगलं वाकयुद्ध रंगले आहे. आमदार शहाजी पाटील यांची सुपारी फुटली मुंबईत आणि हळद लागली गुवाहाटीत असे प्रतित्यत्तर उत्तम जानकर (uttam jankar) यांनी आज (शुक्रवार) करमाळ्याच्या जाहीर सभेत पाटलांना दिले.‌ (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

माढा मतदारसंघात गुरुवारी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी उत्तम जानकर यांच्यावर टिका करताना नवरदेव असणाऱ्या जानकर यांनी फडणवीस यांना मोठा हुंडा मोठा मागितला असा आरोप केला होता. आज आमदार पाटील यांच्या आरोपाला उत्तम जानकर यांनी त्यांच्या शब्दांत उत्तर दिले.

uttam jankar criticised shahajibapu patil
Vinayak Raut Vs Narayan Rane: पक्षप्रमुखांचा रस्ता रोखणारे अजून जन्माला आलेला नाही; विनायक राऊत नारायण राणेंवर बरसले

उत्तम जानकर म्हणाले आमदार शहाजी बापू पाटील यांची मुंबईत सुपारी फुटली आणि गुहाटीत हळद लागली. येत्या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा 50 हजार मतांनी पराभव होईल असा दावा ही जानकर यांनी केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

uttam jankar criticised shahajibapu patil
Sangli Lok Sabha Election: चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील आले आमने-सामने; दोघांनी एकमेकांशी काय संवाद साधला? पहा Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com