Raigad Lok Sabha: सुनील तटकरेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार; रायगडमध्ये आज 'मविआ'ची जाहीर सभा

Sharad Pawar News: राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रायगडमध्ये आज मंगळवारी शरद पवारांची तोफ धडाडणार आहे.
Sharad Pawar Raigad Sabha
Sharad Pawar Raigad Sabha Saam TV

Sharad Pawar Raigad Sabha

राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या रायगडमध्ये आज मंगळवारी शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेसाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.

Sharad Pawar Raigad Sabha
Maharashtra Election: घराणेशाहीबद्दल कोणी बोलायचं? उद्धव ठाकरेंनी भाजपला पुन्हा कोंडीत पकडलं

सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या सभेला शरद पवार यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, शेकापचे नेते जयंत भाई पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर शरद पवार हे सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांना हात घालतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

सध्या संपूर्ण राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष जबरदस्त प्रचार करीत आहेत. महत्वाचे म्हणजे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) रणांगणात उतरले असून महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

सोमवारी (ता. २२) शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात जंगी सभा घेत भाजपसह महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती. ५ वर्षांपूर्वी नवनीत राणांना लोकसभेची उमेदवारी देऊन आपण चूक केली, असं म्हणत शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी देखील मागितली होती.

दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान, आज अनंत गिते यांच्या प्रचारार्थ शरद पवार रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्याविरोधात जाहीर सभा घेणार आहे.रायगड लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्यांक मुस्लिमांची संख्या लक्षात घेऊन या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार आज काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Sharad Pawar Raigad Sabha
Maharashtra Politics: सांगलीत बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटलांवर काँग्रेस करणार कारवाई, नाना पटोले यांनी दिली माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com