Rais Shaikh: भिवंडीच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट; राजीनाम्यानंतर काही तासांतच समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची घरवापसी

Bhiwandi Politics: राजीनाम्यानंतर काही तासांतच समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची घरवापसी झाली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच राजीनामा मागे घेतला आहे.
Bhiwandi Politics
Rais ShaikhSaam Tv

सचिन गाड साम टिव्ही, मुंबई

राजीनाम्यानंतर काही तासांतच भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख (MLA Rais Shaikh) यांची घरवापसी झाली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच राजीनामा मागे घेतला आहे. त्यामुळे भिवंडीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भिवंडीच्या लोकांच्या आग्रहाखातर राजीनामा मागे घेत असल्याचं रईस शेख यांनी जाहीर केलं (Bhiwandi Politics) आहे.

भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आपला राजीनामा मागे घेताना रईस शेख यांनी पक्षातील दलालांवर निशाणा साधला आणि त्यांना हटवण्याची मागणी केली आहे. हे दलाल (Rais Shaikh Withdrawn Resignation) पक्ष कमजोर करत असल्याचा आरोप रईस शेख यांनी केला आहे. रईस शेख यांचा राजीनामा हा महाविकास आघाडीसाठी भिवंडीत एक झटका मनाला जात होता. तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात मैदानात आहेत.

राज्यातील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामा २० एप्रिल रोजी दिला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे अखिलेश यादव यांच्यासाह महाविकास (Rais Shaikh Resignation) आघाडीला मोठा धक्का बसला होता.

रईस शेख समाजवादी पक्षाचे भिंवडीचे आमदार आहेत. रईस शेख यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना पक्षातल्या अंतर्गत कलहामुळं राजीनामा दिला असल्याचं सांगितलं (Maharashtra Lok Sabha Election) होतं. राजीनामा दिल्यानंतर रईस शेख लवकरच अजित पवार गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण रईस शेख यांनी राजीनामा मागे घेतला आहे.

Bhiwandi Politics
Maharashtra Politics: 'शिवसेनाप्रमुख शब्दांचे पक्के, त्यांनी हयातभर खोटारडेपणा केला नाही'; देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

रईस शेख भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते नगरपरिषद आणि समाजवादी पक्षाचे गटनेते देखील राहिले आहेत. रईस शेख यांनी २०१२ मध्ये गोवंडी आणि २०१७ मध्ये नागपाडा येथून (Maharashtra Politics) बीएमसी निवडणूक लढवली आणि जिंकली होती. मुंबई मिररच्या सर्वेक्षणानुसार शेख मुंबईतील टॉप १० नगरसेवकांमध्ये होते.

Bhiwandi Politics
Maharashtra Politics: 'बहिणीचे जे हाल झाले, तेच भावाचे होणार', अंबादास दानवे यांचा महादेव जानकर यांना खोचक टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com